सागर भस्मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Indian Monsoon In Marathi : भारतीय मान्सून हा विविध वायुमंडलीय आणि सागरी घटकांमधील परस्परसंवादाचा परिणाम आहे. ज्यात जमीन आणि समुद्राची भिन्नता, हिमालयाची उपस्थिती आणि आंतर-उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्राच्या (ITCZ) हालचालींचा समावेश आहे. या घटनेमागील प्राथमिक प्रेरक शक्ती म्हणजे भारतीय उपखंडातील भूभाग आणि लगतच्या हिंदी महासागरातील तापमानातील फरक. उन्हाळ्यात भूभाग सभोवतालच्या महासागरापेक्षा अधिक वेगाने गरम होतो, ज्यामुळे भारतावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. यामुळे हिंद महासागरातून वारे भारतीय भूखंडाकडे वाहतात, ज्यामुळे पर्जन्यवृष्टी होते.
भारतीय मान्सूनची विभागणी दोन भागांमध्ये केली जाते.
- नैऋत्य मान्सूनची अरबी समुद्र शाखा
- बंगालचा उपसागर शाखा
नैऋत्य मान्सूनची अरबी समुद्र शाखा
नैऋत्य मान्सूनच्या अरबी समुद्र शाखेमुळे सुरवातीला केरळमधील मलबार किनारपट्टीवर पाऊस पडते. १ जून रोजी मलबार किनारपट्टीवर अरबी शाखेमुळे पाऊस पडतो, तेव्हा त्या घटनेला ‘मान्सूनचा विस्फोट’ असे म्हणतात. यानंतर अरबी समुद्राच्या शाखेमुळे गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण पश्चिम किनारपट्टीच्या मैदानावर पाऊस पडतो.
नैऋत्य मोसमी पावसामुळे होणारा पाऊस प्रामुख्याने डोंगर आणि टेकड्या सारख्या भूभागावर अवलंबून असतो, कारण टेकड्या आणि डोंगरावर प्रामुख्याने प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : कोपेनचे हवामान वर्गीकरण आणि विभागणी
प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय?
जेव्हा नैऋत्य मान्सून डोंगरावर आदळतो व त्यामुळे पर्वताच्या उताराच्या दिशेने वारे वर जातात आणि वर येताना हवेचे तापमान कमी होत जाते, याला एडियाबेटिक उष्णता रास असे म्हणतात. या एडियाबेटिक हीटिंगमुळे हवेचे तापमान इतके कमी होते किंवा वारे त्यांची सर्व आद्रता टेकडीच्या उतारामध्ये सोडून देतात यालाच प्रतिरोध पर्जन्य म्हणतात.
पश्चिम घाटामुळे मान्सून वारे अडवली जाऊन ते उर्ध्वमुखी बनतात व थंड हवेमुळे त्यांच्यातील बाष्पाचे सान्द्रिभवन होऊन त्यामुळे पश्चिम घाट उतारावर प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो. पश्चिम घाटावरील पाऊस पश्चिमेकडून उत्तरेकडे कमी होतो, म्हणजे पश्चिम किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिण भागात जास्त पाऊस पडतो आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारी मैदानात कमी पाऊस पडतो कारण पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टेकड्या तुलनेने उंच आहेत.
अरबी समुद्राची शाखा उत्तरेकडे वाहते व गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील गिर व मांडव टेकड्यावर आदळते आणि सौराष्ट्र प्रदेशात पाऊस पडतो, हेच कारण आहे की गुजरातचा बहुतांशी भाग दुष्काळग्रस्त असला तरी सौराष्ट्र प्रदेशातील टेकड्या हिरव्यागार जंगलांनी व्यापलेल्या आहेत, पण अरबी समुद्राच्या शाखेमुळे संपूर्ण अरवली पर्वतरांगेमध्ये पाऊस पडत नाही, कारण अरवली पर्वतरांगेचा विस्तार अरबी समुद्राच्या शाखेच्या वाऱ्याच्या समांतर असून वारे अरवली पर्वतरांगेला समांतर वाहतात, त्यामुळे राजस्थान मध्ये पाऊस पडत नाही.
बंगालचा उपसागर शाखा
नैऋत्य मान्सूनची दिशा दक्षिण-पश्चिम ते उत्तर-पूर्व अशी असते त्यामुळे अरबी समुद्राची शाखा पश्चिम घाटावर आदळते, पण बंगालच्या उपसागराची शाखा पूर्व घाटाला समांतर होऊन उत्तरेकडे वाहते आणि यामुळे पूर्व किनारपट्टीवरील मैदानी प्रदेशात या काळात पाऊस पडत नाही.
पूर्व घाटाला समांतर उत्तरेकडे वाहणारी बंगालच्या उपसागर शाखा प्रथम मेघालयाच्या शिलॉंग पठारावर आदळते. त्यामुळे शिलॉंग पठारावर गारो, खासी, आणि जैतिया टेकड्यावर पाऊस पडतो. यापैकी खासी टेकडीवर सर्वाधिक पाऊस पडतो. खासी टेकडीवरील चेरापुंजी आणि मौसीनराम येथे सुमारे १०८० सेंटीमीटर पेक्षा जास्त वार्षिक पाऊस पडत असून हा जगातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, निर्मिती आणि विस्तार
बंगालच्या उपसागर शाखा मेघालयाच्या शिलॉंग पठारावर आदळल्यानंतर आसामच्या सुरमा खोऱ्यातून आसाममध्ये प्रवेश करते आणि ब्रह्मपुत्रा खोऱ्यात पोहचते. ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेडलेले असल्याने बाष्पयुक्त वारे अडवले जाऊन ते झपाट्याने वरच्या दिशेने वाहत आणि तापमानात घट ब्रह्मपुत्रा खोऱ्यात भरपूर पर्जन्य वृष्टी होते. याच वेळेस बंगालच्या उपसागराची दुसरी शाखा हुबळी नदीच्या मुखाजवळ उत्तर भारताच्या मैदानात प्रवेश करते आणि कलकत्ता, पाटणा, प्रयागराज आणि कानपूर मार्गे दिल्लीला पोहोचते आणि दिल्ली हे बंगालच्या उपसागराच्या शाखेने पाऊस पडणारे शेवटचे ठिकाण आहे.