सागर भस्मे

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील ऊर्जा संसाधनांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील जलसिंचन व्यवस्था कशी आहे? तिचे प्रकार कोणते? याबाबत जाणून घेऊ. महाराष्ट्राच्या शेतीला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण- राज्यातील ९४ तालुके अवर्षणग्रस्त आहेत. महाराष्ट्रातील एकूण शेतजमिनीपैकी सुमारे १५ टक्के जमिनीस जलसिंचनाच्या सोई उपलब्ध आहेत आणि उरलेल्या प्रदेशात शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू स्वरूपाची आहे.

Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Seven stalled projects on track soon speed up land acquisition process in five projects
रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग
How is census of population conducted
जनगणना कशी होते? प्रगणकांना कोणते अनुभव येतात?
ngo voting awareness
मुंबई: बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध खाजगी संस्थांचा पुढाकार
Zopu scheme, MHADA developer, MHADA,
‘झोपु’ योजनेत म्हाडा विकासक, पहिल्यांदाच जबाबदारी; चार प्रस्ताव प्राधिकरणाकडे
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण

पर्जन्याचे स्वरूप विचारात घेऊन पाण्याची कितपत आवश्यकता आहे हे पाहिले असता, जास्त पर्जन्य पडणाऱ्या प्रदेशात पाण्याची आवश्यकता अत्यंत कमी असते. कारण- त्या ठिकाणी मुळातच पावसाचे प्रमाण भरपूर असते. अशा प्रकारचे प्रदेश महाराष्ट्राच्या पूर्व भागात व कोकण किनारपट्टीवर आहेत. काही प्रमाणात सह्याद्रीच्या पायथ्यावर पाण्याची आवश्यकता फारशी असत नाही. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणाऱ्या प्रदेशात पाण्याचा साठा साधारण स्वरूपाचा असतो. असा भाग मावळच्या पूर्व भागात आहे; तर द्वीपकल्प पठारावरील कोरड्या व निमकोरड्या विभागात, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत पाण्याची आवश्यकता जास्त असते; तर काही भागांत अतितीव्रतेने पाण्याची जरुरी भासते.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील विमान व जलवाहतूक; सागरमाला प्रकल्प अन् वैशिष्ट्ये

निश्चित पाऊस व अवर्षणप्रवण क्षेत्र :

महाराष्ट्रात निश्चित पर्जन्याच्या प्रदेशामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यांत, तसेच विदर्भात बुलढाणा वगळता जवळजवळ संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील परभणी व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो. अवर्षणग्रस्त क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, अहमदनगर पूर्णतः तर सांगली, सातारा, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगावचा काही भाग, तर मराठवाड्यातील बराचसा भाग येतो.

महाराष्ट्रातील जलसिंचनाचे कमाल क्षेत्र

महाराष्ट्रात पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात अनेक मोठे व लहान पाटबंधारे प्रकल्प उभारलेले आहेत. त्यांच्या साह्याने पिकांना पाणीपुरवठा, तसेच शहरी व ग्रामीण भागातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते. महाराष्ट्रात जास्तीत जास्त किंवा कमाल सिंचनक्षमता सुमारे ७१ लाख हेक्टर आहे. त्यापैकी भूपृष्ठावरील जलसंपत्तीचा वाटा ५३ लाख हेक्टर आणि भूगर्भ जलसंपत्तीचा वाटा १८ लाख हेक्टर असून, भूपृष्ठावरील पाण्यापासून सिंचन करता येईल, असा अंदाज बांधला जातो. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे ३,०७,७१३ चौरस किलोमीटर असून, म्हणजेच ३.०७ कोटी हेक्टर असून, त्यापैकी २.११ कोटी हेक्टर जमीन शेतीखाली येऊ शकते. एकूण शेतजमिनीपैकी जलसिंचनाचे प्रमाण फक्त २६% पर्यंत करता येईल.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?

महाराष्ट्रात प्रचलित असलेले जलसिंचनाचे प्रकार पुढीलप्रमाणे :

१) विहीर जलसिंचन : विहिरींद्वारा जलसिंचनाचे सर्वांत जास्त क्षेत्र (१५ ते १७ लाख हेक्टर) आहे. अहमदनगर, नाशिक, पुणे हे महाराष्ट्रातील जिल्हे विहीर जलसिंचनामध्ये अग्रेसर आहेत.

२) ठिबक सिंचन : नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद (संभाजीनगर) हे महाराष्ट्रातील जिल्हे ठिबक सिंचनामध्ये अग्रेसर आहेत.

३) तलाव जलसिंचन : महाराष्ट्रात फारसे तलाव आढळत नाहीत. विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात अनेक लहान तळी असल्याने या प्रदेशाला महाराष्ट्राच्या तलावांचा प्रदेश, असेही म्हटले जाते. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचा चंद्रपूर जिल्ह्यातील पश्चिम भागात ताडोबा तलाव आहे. ते पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. तसेच घोडझरी तलाव व असोलामेंढा तलाव आहेत. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात रामटेकजवळ रामसागर तलाव आहे, तर भंडारा जिल्ह्यात बांदलकसा तलाव व नवेगाव तलाव, भीमा नदीच्या खोऱ्यात दिसापूर तलाव आढळतो.

लोणावळ्याजवळ वळवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात धामापूर सरोवर आहे. अजिंठा टेकड्याच्या दक्षिण उतारावर बुलढाणा जिल्ह्यात लोणार हे वर्तुळाकृती सरोवर आहे. त्याची साधारण खोली १०० मीटर, तर दोन कि.मी.चा परिसर व्यापलेला आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा जलाशय आहे. महाराष्ट्रात नद्यांवर धरणे बांधण्यात आलेली आहेत. तेथे बऱ्याच प्रमाणात पाणी साठविले जाते. उदाहरणार्थ- कोयना धरणाचा शिवाजी सागर (शिवसागर), गोदावरीचा जायकवाडी प्रकल्पाचा तलाव (नाथसागर) ही त्याची उदाहरणे सांगता येतील. मुंबई शहराला ज्या तलावांमुळे पाणीपुरवठा होतो अशा तानसा, विहार, वैतरणा या तलावांचाही यामध्ये उल्लेख करावयास हरकत नाही. त्याशिवाय पुणे जिल्ह्यात भाटघर, खडकवासला, मुळशी, पानशेत, आंध्र, व्हिक्टोरिया ही सरोवरे आहेत. नगर जिल्ह्यात ऑर्थर हिल सरोवर आणि भंडारदरा व नाशिक जिल्ह्यात गंगापूर हे तलाव आहेत.

४) तुषार सिंचन : जळगाव, अमरावती, बुलढाणा हे महाराष्ट्रातील जिल्हे तुषार सिंचनामध्ये अग्रेसर आहेत.

५) उपसा जलसिंचन : पंप आणि इतर उपकरणांच्या साह्याने खालच्या पातळीपासून वरच्या पातळीवर पाणी उचलले जाते, त्याला उपसा सिंचन म्हणतात. उपसा सिंचनामुळे उच्च पातळीवर सिंचन शक्य झाले आहे. अशा प्रकारच्या सिंचनामध्ये भूसंपादनाची समस्या कमी आहे. तसेच पाण्याचे नुकसानसुद्धा कमी आहे. त्यामध्ये मनुष्यशक्ती कमी वापरली जाते. महाराष्ट्रातील ८ टक्के सिंचन या पद्धतीने होते. राज्यातील सर्व उपसा सिंचन प्रकल्प सौरऊर्जेवर चालविण्याचे शासनाचे धोरण आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पहिला सौरऊर्जेवर चालणारा उपसा सिंचन प्रकल्प भंडारा जिल्ह्यात साकारला जात आहे.

६) कालवे सिंचन : महाराष्ट्रात जलसिंचन प्रकारात विहिरींखालोखाल कालव्यांद्वारे सुमारे २३ टक्के क्षेत्र सिंचनखाली आणले गेले आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून दख्खनच्या पठारावर कृष्णा, गोदावरी, भीमा आणि त्यांच्या उपनद्यांच्या क्षेत्रात पाटबंधारे योजना अमलात आणून कालव्याद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला जातो.

हेही वाचा – UPSC-MPSC : अपरंपरागत ऊर्जासंपत्ती म्हणजे काय? या ऊर्जेची निर्मिती महाराष्ट्रात कुठे केली जाते?

महाराष्ट्रातील प्रमुख जलप्रकल्प

महाराष्ट्रात सुमारे प्रमुख ३१ जलप्रकल्प आहेत. तर विविध टप्प्यांतील २८ प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ- पुणे विभागात कोयना (सातारा), खडकवासला, मुळशी धरण, पवना धरण, वरसगाव, पानशेत, भाटघर, राधानगरी (कोल्हापूर जिल्ह्यात); नाशिक विभागात गंगापूर, सुपले, गिरणा, भंडारदरा (अहिल्यानगर), औरंगाबाद विभागात जायकवाडी, येलदरी (हिंगोली), पूर्णा, मांजरा; अमरावती विभागात तापी, नळगंगा (बुलढाणा), पैनगंगा, तर नागपूर विभागात रामटेक, बाघ, इटियाडोह (गोंदिया), असोलामेंढा इत्यादी जलप्रकल्प आहेत.