सागर भस्मे

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाविषयी महिती घेतली. या लेखातून आपण नैसर्गिक पर्यटनस्थळांबाबत जाणून घेऊ. पर्यटन हा सध्या जगातला सर्वांत वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. निसर्गाची हानी न होता, केले जाणारे पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन अशी साधी सोपी व्याख्या आपल्याला करता येईल. उंचसखल डोंगरदऱ्या, समृद्ध जंगले, शांत व रम्य समुद्रकिनारे, वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता, पर्यावरण जीवनदायिनी नद्या, फेसाळ धबधबे, वाळूची पुळण व खाड्या, कांदळवने, छोटी-मोठी बेटे, गवतांचे गालिचे, पसरलेली पठारे, पाण्याचे तलाव, अंधाऱ्या गुहा व पूर्वापार देवराया म्हणजे पर्यटकांसाठी आकर्षणबिंदू आहे.

Switch Mobility bus
स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
municipality removed 125 construction that were obstructing Titwala-Shilphata bypass road
Titwala-Shilphata bypass road : टिटवाळा-शिळफाटा बाह्यवळण रस्ते मार्गातील अडथळे दूर
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट

महाराष्ट्र हे असं राज्य आहे; ज्याला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे. महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणजे दुर्गांचा मानबिंदू होय. जैवविविधतेने समृद्ध असा सह्याद्री पर्वत हा राज्याच्या निसर्ग पर्यटनाला जागतिक पातळीवर पोहोचवण्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. घनदाट जंगल व त्यावर अवलंबून असलेले प्राणी जीवन हा येथील निसर्ग पर्यटनाचा गाभा आहे. तसेच इथे छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले बघण्याजोगे आहेत. सह्याद्रीची गिरिस्थाने, सातपुडा पर्वतरांगा, विदर्भीय डोंगररांगा ही थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये ही तर महाराष्ट्राची आगळीवेगळी ओळख करून देतात. कोकण म्हटले की रुपेरी समुद्रकिनारे, जलदुर्ग यांची आठवण होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आणि त्यांची वैशिष्ट्ये कोणती?

१) महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

तोरणमाळ : नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात सातपुडा पर्वताच्या रांगांत सुमारे ११४३ मीटर उंचीवर हे थंड हवेचे ठिकाण आहे.

माथेरान : रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या पश्र्चिम घाटात ८०० मी. उंचीवर हे थंड हवेचे ठिकाण आहे.

लोणावळा-खंडाळा : पुणे जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय ठिकाणे, ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे आहेत. थंड हवेच्या ठिकाणांत विशेष प्रसिद्ध असलेले लोणावळा-खंडाळा हे एक ठिकाण आहे. सुमारे ६२५ मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण पावसाळ्यात धबधब्यांमुळे अधिकच आकर्षक वाटते.

महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यातील हे समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५०० फूट उंचीवरील थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर सुंदर पर्यटनस्थळ आहे.

पाचगणी : पाच डोंगरांवर वसलेले म्हणून पाचगणी असे नाव असलेले हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. ते सुमारे १३७२ मीटर उंचीवर आहे.

चिखलदरा : सातपुडा पर्वतराजीतील अमरावती जिल्ह्यातील हे सुमारे १११८ मीटर उंचीवरचे थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्रात चिखलदर्‍याच्या आसपास कॉफीचे उत्पादन घेतले जाते. येथून जवळच मेळघाट हे व्याघ्र प्रकल्प असलेले अभयारण्य व गाविलगडचा किल्ला आहे. त्याला ‘विदर्भाचे नंदनवन’ असे म्हणतात.

आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. सावंतवाडी तालुक्यामधील हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे आंबोली हे स्थान सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे.

भंडारदरा : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या परिसरात हे निसर्गरम्य ठिकाण आहे.

म्हैसमाळ : हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव आहे. हे समुद्रसपाटीपासून १०६ मीटरपेक्षा जास्त उंचीवर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. त्याला ‘मराठवाड्याचे महाबळेश्वर’ असेही म्हणतात.

जव्हार : हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. भौगोलिकदृष्ट्या जव्हार कोकणात असूनही, उंचावरील स्थान असल्यामुळे येथील हवा दमट नसून थंड व आल्हाददायक आहे. येथील डोंगरदर्‍या, नैसर्गिक धबधबे, जुना (पण सुस्थितीत असलेला) राजवाडा, सूर्यास्त अनुभवण्याचे स्थान (सनसेट पॉइंट) अशी अनेक ठिकाणे येथे पाहण्यास मिळतात.

२) महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे

महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे हा नैसर्गिक ठेवा आहे. या झऱ्यांना प्राचीनतेची पार्श्वभूमीही लाभलेली आहे. जवळपास सर्वच गरम पाण्याच्या झऱ्यांवर काही ना काही आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. भारतात देशात ३४० ठिकाणी गरम पाण्याचे झरे असून, महाराष्ट्रात २८ झरे आहेत. या २८ झऱ्यांपैकी १८ कोकणात आहेत. महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, अमरावती, जळगाव, नांदेड व रत्नागिरी या जिल्ह्यांत अशा प्रकारचे झरे आहेत.

३) सागरी पक्षी निरीक्षण स्थळे

मनोरंजनात्मक क्रियाकलाप म्हणून किंवा नागरिक विज्ञानाचा एक प्रकार म्हणून पक्ष्यांचे निरीक्षण करणे म्हणजे पक्षी निरीक्षण होय. बर्ड वॉचिंग टुरिझम हे जगातील सर्वांत वेगाने वाढणारे निसर्गावर आधारित पर्यटन क्षेत्र मानले जात आहे. पक्षी निरीक्षण पर्यटन ही निसर्गावर आधारित पर्यटनाची एक खास बाजारपेठ मानली जाते.

मालवण समुद्री अभयारण्य : महाराष्ट्राच्या मालवण( सिंधुदुर्ग) शहराजवळ हे अभयारण्य आहे. या प्रदेशातील समुद्रकिनाऱ्यावरील जैविक विविधतेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा भाग सागरी अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. हे भारतातील तिसरे सागरी उद्यान आणि महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान आहे. त्याची घोषणा १३ एप्रिल १९८७ रोजी करण्यात आली.

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य : सिंधुदुर्गमधील ‘मालवण सागरी अभयारण्या’नंतर महाराष्ट्रातील हे दुसरे सागरी अभयारण्य आहे. या ठिकाणी पक्षी निरीक्षण आणि पर्यटकांना खाडीत सैर करण्यासाठी ‘फ्लेमिंगो नौका स्वारी’ उपलब्ध आहे. स्थलांतरित पक्षी प्रजातींमध्ये ‘रोहित’ म्हणजेच फ्लेमिंगो हा पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी ठाणे खाडीला रामसार पाणथळ जागेचा दर्जा देण्यात आला. हे महानगरामध्ये असलेले पहिले रामसार स्थळ आहे. हे महाराष्ट्रातील तिसरे; तर भारतातील ७२ वे रामसार दर्जा प्राप्त झालेले स्थळ आहे.

४) महाराष्ट्रातील महत्त्वाचे धबधबे

धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नद्यांवर धबधबे कोसळत असताना आपल्याला बघायला मिळतात. जसे की सातारास्थित ठोसेघर हा महाराष्ट्रातील सर्वांत उंच धबधबा आहे. तसेच जव्हार, खोडाळे, कोकनेर, हालोली, येऊर -पालघरमध्ये, आंबोली -सिंधुदुर्ग, सौताडा -बीड, अंबाखोरी -नागपूर, भंडारदरा, रंधा -अहिल्यानगर, लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर, राजगुरूनगर, ताम्हिणी घाट पुणे, मनुदेवी, पाटणादेवी -जळगाव, सहस्रकुंड -नांदेड इत्यादी.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील आदिवासी समाज; वैशिष्ट्ये, लोकसंख्या अन् जमातीचे वर्गीकरण

५) राष्ट्रीय उद्याने

महाराष्ट्र राज्यात सहा राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, चार संवर्धन राखीव क्षेत्रे अशी एकूण ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ १०,०५४.१३ चौ.कि.मी. म्हणजे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३.२६ टक्के इतके आहे.

  • महाराष्ट्रतील पहिले उद्यान ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात १९५५ साली स्थापन झाले.
  • १९७२ मधे स्थापना केलेले नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे.
  • पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, नागपूर, १९८३
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई उपनगर (बोरिवली) १९६९
  • महाराष्ट्रातील सर्वांत मोठे राष्ट्रीय उद्यान गुगामल (अमरावती) १९७४ मधील आहे.
  • चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्‍नागिरी या चार जिल्ह्यांत वसलेले आहे.

६) महाराष्ट्रातील किल्ले

दुर्ग / किल्ले म्हणजे जिथे शिरकाव करणे दुर्गम असते, असे बांधलेले ठिकाण. किल्ला ही इतिहासाची ओळख मानली जाते. मध्ययुगीन मराठीत यासाठी अरबीतून आलेला किल्ला हा शब्द वापरला जाई. शिवछत्रपतींच्या प्रेरणेने रचल्या गेलेल्या राजव्यवहार कोशात किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे. अगदी प्राचीन काळापासून दुर्गांचा उल्लेख आढळतो. सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेले किल्ले म्हणजे मराठेशाहीची शान आहे. या किल्ल्यांना बघून इतिहासकालीन वैभवाची जाण होते. या वैभवाची दृष्टी महाराष्ट्रातील पर्यटनातून जाणवते. महाराष्ट्र हा दुर्ग-किल्ल्यांचा प्रदेश आहे.

Story img Loader