सागर भस्मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील लेखातून आपण पृथ्वीवरील दाबाचे पट्टे आणि त्याचा वातावरणावर कशाप्रकारे परिणाम होतो, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण पृथ्वीवरील जलावरण तसेच सागरी प्रवाह आणि वायू राशी म्हणजे काय? याबाबत जाणून घेऊया. जगाचा सुमारे तीन चतुर्थांश भाग जलावरणाने (Hydrosphere) व्यापलेला आहे. जगाच्या एकूण पृष्ठभागाच्या क्षेत्रफळांपैकी जलावरण ७१%, तर जमीन २९% आहे. आकारमान आणि स्थानाच्या आधारावर महासागर (Oceans), अंतर्देशीय समुद्र किंवा लहान बंदिस्त समुद्र (small Landlocked seas), खाडी (Gulf) यामध्ये जलावरणाची विभागणी केली आहे. तसेच समुद्रपृष्ठाचेही त्यांच्या वैशिष्ट्यानुसार वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत.
१) भूखंड मंच (Continental Shelf) : १०० फॅथम (एक फॅथम = ६ फूट) सरासरी पाण्याची खोली आणि समुद्र किंवा महासागरांकडे हळूवारपणे (१°-३°) उतार असलेल्या समुद्राच्या पाण्याखालील भागांना भूखंड मंच असे म्हणतात.
२) भूखंडीय उतार (Continental Slope) : भूखंड मंचापासून खोल समुद्राच्या मैदानापर्यंत पसरलेल्या तीव्र उताराच्या क्षेत्राला भूखंडीय उतार म्हणतात.
३) सागरी मैदान (Deep sea plains) : सपाट आणि रोलिंग मैदान असलेल्या खोल समुद्राच्या भागाला सागरी मैदान असे म्हणतात. हे महासागर खोऱ्यातील सर्वात विस्तृत क्षेत्र आहे. ३००० मी. ते ६००० मी. खोली असलेली ही मैदाने महासागर खोऱ्यांच्या एकूण क्षेत्रफळाच्या सरासरी ७५.९% व्यापतात.
४) समुद्री गर्ता किंवा दर्या (Ocean trenches or deeps) : हे साधारणपणे समुद्रात असलेल्या पर्वत बाजूने किनार्यांच्या समांतर स्थित असतात. समुद्री गर्ता हे समुद्रातील सर्वात जास्त खोलीची क्षेत्रे आहेत. उदाहरणार्थ प्रशांत महासागरातील मरियाना गर्ता (Challenger deep हा जगातील सर्वात खोल पॉईंट आहे), टोंगा गर्ता, हिंदी महासागरातील जावा गर्ता इत्यादी.
पृथ्वीवरील जलाशयाला एकूण पाच महासागरांमध्ये विभाजित केलेले आहे.
१) प्रशांत महासागर (The Pacific Ocean)
२) हिंदी महासागर (The Indian Ocean)
३) अटलांटिक महासागर (The Atlantic Ocean)
४) आर्टिक महासागर (The Arctic Ocean
५) दक्षिण महासागर (The Southern Ocean)
सागरी प्रवाह म्हणजे काय?
ठराविक दिशेने होणारी सागरी पाण्याची हालचाल म्हणजे सागर प्रवाह होय. हा सागरी प्रवाह पृथ्वीच्या भूपृष्ठावर वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहांप्रमाणे (नद्या) कमी-अधिक प्रमाणात असतो. पाण्याच्या सर्व गतिशीलतेमध्ये महासागरातील प्रवाह सर्वात शक्तिशाली असतो. कारण तो हजारो किलोमीटर अंतरापर्यंत महासागरातील पाणी वाहून नेतो. यामुळे विशिष्ट प्रदेशातील तापमान, क्षारता, दाब, पर्जन्यमान यावर परिणाम दिसून येतो. जसे की एल निनो व ला निना हे सागरी प्रवाह भारतीय मॉन्सूनला प्रभावित करतात. महासागरातील प्रवाह तापमानाच्या आधारावर दोन भागात विभागले जातात. एक म्हणजे उबदार/उष्ण/गरम प्रवाह आणि दुसरा थंड प्रवाह.
पृथ्वीवरील मुख्य सागरी प्रवाह आणि आढळणारे ठिकाण
१) थंड प्रवाह (Cold currents) : सामान्यतः थंड प्रवाहाची दिशा ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे असल्याची दिसते. कॅनरी प्रवाह, लॅब्रेडोर प्रवाह – उत्तर अटलांटिक महासागर, फॉकलँड प्रवाह – साउथ अटलांटिक ड्रिफ्ट, बेंग्यूला करंट – दक्षिण अटलांटिक ओयाशीओ, कॅलिफोर्निया प्रवाह, पेरू प्रवाह- प्रशांत महासागर ही थंड प्रवाहाची ठिकाणं आहेत.
२) गरम प्रवाह (Warm currents) : गल्फ स्ट्रीम – उत्तर अटलांटिक महासागर, ब्राझील प्रवाह – दक्षिण अटलांटिक महासागर, क्युरोशिओ, एल निनो – प्रशांत महासागर आणि मोझांबिक प्रवाह – हिंदी महासागर ही गरम सागरी प्रवाह आढळतात.
सागरी प्रवाह अनेक प्रकारे प्रदेशाच्या हवामानात बदल करतात. सागरी प्रवाहांचा सर्वात प्रभावी परिणाम किनारपट्टीच्या जमिनींच्या तापमानावर दिसून येतो. त्याचे परिणाम वनस्पती आणि जीवजंतूंसाठी सकारात्मक (फायदेशीर) आणि नकारात्मक (हानीकारक) दोन्ही आहेत. उबदार प्रवाह जेव्हा थंड भागात पोहोचतात, तेव्हा ते त्या प्रदेशाचे तापमान कमी होऊ देत नाहीत उलट ते हिवाळ्याच्या महिन्यात तुलनेने गरम ठेवतात. उदाहरणार्थ, युरोपच्या पश्चिम किनार्यावरील आदर्श आणि अनुकूल युरोपीय प्रकारच्या हवामानाची उत्पत्ती उत्तर अटलांटिक उष्ण प्रवाहाच्या प्रभावामुळे झाली आहे, जो गल्फ प्रवाहाचा (stream) विस्तार आहे. अशाप्रकारे, सागरी प्रवाह हे त्या-त्या प्रदेशाच्या हवामानावर परिणामकारक ठरतात.
वायू राशी (Air Masses) म्हणजे काय? :
ज्याप्रकारे सागरी प्रवाह हवामानावर परिणाम करतात, त्याचप्रकारे वायू राशीसुद्धा एका विशिष्ट प्रदेशाचे हवामान बदलण्यास किंवा स्थिर ठेवण्यास कारणीभूत ठरते. त्यांचे परिणाम समजून घेण्यापूर्वी वायू राशी ही नेमकी संकल्पना काय आहे हे बघू या. वायू राशी म्हणजे हवेचा एक मोठा भाग आहे. त्याचे भौतिक गुणधर्म, विशेषत: तापमान, आर्द्रता आणि लॅप्स रेट, शेकडो किलोमीटरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात समान असतात. ही हवा एका विस्तृत भागात पसरू शकते. जेव्हा या तापमान अंतर्निहित पृष्ठभागापेक्षा कमी असते, तेव्हा त्याला थंड वायू राशी म्हणतात. याउलट जेव्हा त्याचे तापमान अंतर्निहित पृष्ठभागापेक्षा जास्त असते, तेव्हा त्याला गरम किंवा उष्ण वायू राशी असे म्हणतात. त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार पुढील चार प्रमुख प्रकारांमध्ये वायू राशीचे वर्गीकरण केले जाते.
- महाद्विपीय ध्रुवीय वायू राशी (Continental polar air mass – cP)
- सागरी ध्रुवीय वायू राशी (Maritime polar airmass – mP)
- महाद्विपीय उष्णकटिबंधीय वायू राशी (Continental Tropical air mass – cT )
- सागरी उष्णकटिबंधीय वायू राशी (Maritime tropical air mass – mt )