सागर भस्मे
मागील लेखातून आपण उत्तर अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण दक्षिण अमेरिका या खंडाविषयी जाणून घेऊया. दक्षिण अमेरिका खंड हा जगातील चौथा मोठा खंड (क्षेत्रफळानुसार) आहे. पृथ्वीच्या जमिनीचा ११.९% भाग दक्षिण अमेरिका खंडाने व्यापलेला आहे. या खंडात एकूण १३ देश असून यात ब्राझील, अर्जेंटिना, उऋग्वे, पराग्वे, चिली, पेरू, बोलिविया, इक्वॅडोर, कोलंबिया, गयाना, पनामा, सूरीनाम आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश होतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : उत्तर अमेरिका खंड; पर्वत, पठारे, नद्या अन् त्यांची वैशिष्ट्ये
दक्षिण अमेरिका खंडातील काही ठळक वैशिष्ट्ये :
दक्षिण अमेरिका खंड पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामध्ये स्थित आहे. त्याच्या पश्चिम किनारपट्टीला पॅसिफिक महासागर तर पूर्व किनारपट्टीला दक्षिण अटलांटिक महासागर वसलेले आहेत. पृथ्वीवरील सर्वात मोठी नदी खोरे ओळखले जाणारे ॲमेझॉनचे खोरे जगातील सर्वात मोठे वर्षारण्य आहे. या खंडातील सर्वात लांब श्रेणी अँडीज, सुमारे ७,००० किमी (४,३०० मैल) लांब असून त्यामधील सर्वात उंच शिखर अकोन्कागुआ (६,९०१ मी/२२,६४१ फूट), जे की अर्जेंटिना देशात आहे. बोलिव्हिया व पेरू देशाच्या सीमेवर स्थित सर्वात मोठा तलाव टिटिकाका सरोवर (८३७२ चौ. किमी) आहे. तर सर्वात खोल तलाव पेरू पेरू देशातील मार्टिन (कमाल खोली ८३६ मीटर) आहे.
या खंडातील सर्वात लांब नदी ऍमेझॉन नदी असून तिची लांबी ६,४०० किमी, आहे व ती ब्राझील, कोलंबिया, पेरु देशातून वाहते. आणि शेवटी अटलांटिक महासागराला मिळते. ६७३,००० चौ. किमी. क्षेत्रफळ असलेले अर्जेंटिना देशामध्ये पसरलेले पॅटागोनियन वाळवंट दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे वाळवंट आहे. पूर्व ब्राझीलमधील सवाना गवताळ प्रदेशाला कँपोस (Campos) असे म्हणतात. तर पम्पास हे अर्जेंटिनाचे आणि उरुग्वे देशाचे समशीतोष्ण गवताळ प्रदेश आहेत. ब्राझीलमधील कॉफीच्या मळ्यांना फॅझेंडस म्हणतात. दक्षिण-पश्चिम ब्राझील आणि उत्तर-पश्चिम अर्जेंटिनामधे सेल्वास ही समशीतोष्ण जंगले आणि झुडुपे आहेत. ल्लानोस (Llanos) हे व्हेनेझुएलाचे सवाना गवताळ प्रदेश आहेत.
दक्षिण अमेरिका खंडातील वाळवंट :
अटाकामा वाळवंट : पेरू आणि चिली देशांच्या किनारपट्टीवर पसरलेले १०५,००० चौ. किमी. क्षेत्रफळ असलेले हे वाळवंट आहे. हे जगातील सर्वात कोरडे वाळवंट आहे, ज्यामध्ये गेल्या ४०० वर्षांपासून पावसाची नोंद झालेली नाही. या वाळवंटात नायट्रेट (कॅलिचे किंवा चिली सॉल्टपीटर), आयोडीन आणि बोरेक्स हे मोठ्या प्रमाणात आढळतात. नायट्रेटचा वापर प्रामुख्याने गन पावडर, औषधे आणि खते यांच्या उत्पादनात केला जातो.
सेचुरा वाळवंट : पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यालगत पेरू देशामध्ये १८८,७३५ चौ. किमी. क्षेत्रफळ असलेले हे वाळवंट आहे.
माँटे वाळवंट : दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना देशात मोंटे वाळवंट आहे.
दक्षिण अमेरिका खंडातील पर्वतश्रेणी :
अँडियन पर्वत किंवा अँडीज पर्वत शृंखला : ही सुमारे ४,५०० मैल (७,२०० किलोमीटर) लांब पर्वतरांग आहे. अकोन्कागुआ हा सर्वोच्च शिखर अर्जेंटिना देशातील आहे, जे ६,९६०.८ मीटर असून सिएरा नेवाडा डी सांता मार्टा या उपरांगेत वसलेले आहे.
कॉर्डिलेरा ब्लँका रेंज : २०० किमी लांब आणि २१ किमी रुंद असलेली ही पर्वतश्रेणी पेरू देशात स्थित आहे. या श्रेणीतील सर्वात उंच शिखर हुअस्करण (Huascaran) आहे, जे ६,७६८ मीटर उंच आहे.
कॉर्डिलेरा ऑक्सीडेंटल रेंज : कोलंबियामध्ये स्थित आहे. सेरो टाटामा (४,१०० फूट) हा सर्वोच्च बिंदू आहे.
सेरा दो मार श्रेणी : ही ब्राझीलमध्ये स्थित असून ती १,५०० किमी लांब आहे आणि त्याचे सर्वोच्च शिखर पिको पराना आहे, जे १,८७७ मीटर उंच आहे. सेरा डो मार ब्राझीलमधील अटलांटिक महासागराच्या समांतर पसरलेली आहे.
मँटिकेरा पर्वत : ते दक्षिणपूर्व ब्राझीलमध्ये आहेत. पेड्रा दा मिना (२,७९८ मी) हा सर्वोच्च बिंदू आहे.
कॉर्डिलेरा पेन रेंज : ही रेंज पॅटागोनिया, चिली येथील टोरे डेल पेन नॅशनल पार्कमध्ये स्थित आहे. सेरो पेन ग्रँडे (Cerro Paine Grande) (२,८८४ मी) हा सर्वोच्च बिंदू आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : आशिया खंड; भौगोलिक स्थान, क्षेत्रफळ, लोकसंख्या अन् हवामान
दक्षिण अमेरिका खंडातील पठारे :
अटाकामा पठार : हे सुमारे २०० मैल (३२० किमी) लांब आणि १५० मैल (२४० किमी) रुंद आहे. आणि समुद्रसपाटीपासून त्याची सरासरी उंची ११,००० ते १३,००० फूट (३,३०० ते ४,००० मीटर) आहे.
अल्टिप्लानो पठार : बोलिव्हिया, इक्वाडोर मध्ये स्थित आहे.
दक्षिण अमेरिका खंडातील बेटांची नावे : गॅलापागोस बेटे, इस्टर आयलंड, चिली बेट, चिली ग्रँड आयलंड, ब्राझील सुआसी बेट, पेरू तिन्हारे बेट, ब्राझील सॅन आंद्रेस, कोलंबिया
दक्षिण अमेरिकेतील स्थानिक लोक :
दक्षिण अमेरिकेतील बहुतेक स्थानिक लोक रेड इंडियन्स आहेत, जे मंगोलॉइड वंशाचे आहेत. हे लोक बहुतेक ऍमेझॉन बेसिन आणि अँडीज पर्वतांमध्ये राहतात.
दक्षिण अमेरिकेतील काही महत्त्वाचे स्थानिक लोक : अचे, आवा, आयमारा, बनिवा, कैयापोस, कोकामा, गुआरानी, ज्युरीस, कायापो, कोरुबा, मेस्टिझो म्हणजे मिश्र युरोपियन (स्पॅनिश) आणि रेड इंडियन्सचे वंशज. मुलाट्टो म्हणजे काळ्या आणि गोर्यांचे वंशज. झाम्बो (झेंब) म्हणजे मिश्रित आफ्रिकन (निग्रो) आणि रेड इंडियन्सचे लॅटिन अमेरिकन असलेले वंशज.