सागर भस्मे

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील उद्योगांविषयी विशेषत: कापड उद्योगाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण महाष्ट्रातील साखर उद्योगाविषयी जाणून घेऊ. महाराष्ट्रातील साखर उद्योग हा ग्रामीण भागाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्थित्यंतर करणारा उद्योग आहे. तसेच महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक क्षेत्रात साखर उद्योग हा एक महत्त्वाचा व मोठा घटक आहे. देशातील एकूण साखर कारखांन्यापैकी ३६% कारखाने महाराष्ट्रात असून, त्याखालोखाल २३% कारखाने उत्तर प्रदेशात आहेत. देशातील एकूण साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा सुमारे ३२% आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश राज्याचा हिस्सा २७% आहे.

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
hindustan coca cola beverages
ज्युबिलंट भारतीय समूहाची हिंदुस्तान कोका-कोला बीव्हरेजेसमध्ये ४० टक्के हिस्सेदारी
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
Grape
राज्यात ५० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड ? जाणून घ्या, नोटबंदी, कोरोना टाळेबंदी, नैसर्गिक आपत्तींचा परिणाम
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प

हेही वाचा – UPSC-MPSC : भूमी उपयोजन म्हणजे काय? महाराष्ट्रातील भूमी उपयोजनेचे स्वरूप कोणते?

साखर उद्योगाची पार्श्वभूमी

आधुनिक काळात भारतात बंगाल व बिहारमध्ये इंग्रजांनी साखर कारखाने उभारण्याचे प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना सन १९२० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथे उभारण्यात आला होता. राज्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे साखर कारखान्यांची उभारणी करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात साखर कारखान्यांची वाढ होत गेली. याचप्रमाणे आणखी कोणते घटक साखर उद्योग उभारणीला कारणीभूत आहेत, ते पुढीलप्रमाणे :

१) साखर कारखान्याचे स्थानिकीकरण ऊस उत्पादनावर अवलंबून असते. ऊस हा वजन घटणारा पदार्थ आहे. त्यामुळे उसाच्या वजनापैकी फक्त ९ ते १०% वजनाचे साखरेत रूपांतर होते. या कारणास्तव साखर उद्योगधंदा कच्च्या मालाच्या प्रदेशात केंद्रित करतात. म्हणून दूरवरच्या प्रदेशात साखरेचे स्थानिकीकरण वितरण झालेले नाही.

२) स्थानिक प्रदेशाचे हवामान व पर्जन्य यांवर उसाचे क्षेत्र अवलंबून असते. म्हणून साखर उद्योगधंद्यात नैसर्गिक परिस्थितीचा बराच मोठा वाटा असतो. त्यामुळे ऊस पिकविणाऱ्या प्रदेशात साखर कारखान्यांची उभारणी केली जाते.

३) महाराष्ट्रात ज्या भागात पाण्याची उपलब्धता आहे, तिथे उसाची लागवड करण्यात आली आहे. तसेच अवर्षणग्रस्त भागात पाण्याची सोय झाल्यावर त्या प्रदेशांमध्येसुद्धा ऊस लागवडीस सुरुवात झाली आहे.

सहकारी साखर कारखाने

महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावर साखर कारखाने उभारण्यात आलेत. त्यामुळे भारतात सहकारी साखर कारखान्याचा पहिला मान महाराष्ट्रास मिळाला. सहकारी साखर कारखान्यांची प्रमुख उद्दिष्टे सभासदांचा ऊस एकत्रित करणे, त्यापासून साखरेची निर्मिती करणे, ती बाजारात विकणे आणि प्रक्रिया आणि विक्रीचा खर्च वजा करून राहिलेल्या उत्पन्नाचे म्हणजेच नफ्याचे सभासदांना वाटप करणे हे आहे. पुणे प्रशासकीय विभागात महाराष्ट्रातील सर्वांत जास्त प्रमुख सहकारी साखर कारखाने आहेत. त्याचे जिल्हावार वैशिष्ट्यपूर्ण वितरण पाहावयास मिळते. पुणे प्रशासकीय विभागात सर्वांत जास्त सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्हा (१४) असून, त्याखालोखाल सांगली (१२), पुणे (११), सोलापूर (११) व सातारा (७) अशी जिल्ह्यांची क्रमवारी आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील सर्व आठही जिल्ह्यांत एकूण ३४ सहकारी साखर कारखाने आहेत. पुणे विभागाच्या खालोखाल साखर कारखान्यांच्या संख्येबाबत औरंगाबाद विभागाचा क्रमांक लागतो.

नाशिक प्रशासकीय विभागात प्रमुख ३२ सहकारी साखर कारखाने आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे एकूण १५ सहकारी कारखाने आहेत. महाराष्ट्रातील विदर्भामध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या खूप कमी आहे. अमरावती प्रशासकीय विभागात एकूण नऊ सहकारी साखर कारखाने आहेत. सर्वांत जास्त साखर कारखाने यवतमाळ जिल्ह्यात चार असून, त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यात दोन आणि बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यात प्रत्येकी एक सहकारी साखर कारखाना आहे. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये फक्त पाच सहकारी साखर कारखाने आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?

महाराष्ट्रात साखर कारखान्यांचे केंद्रीकरण

महाष्ट्रातील साखर कारखान्यांचे केंद्रीकरण पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत जास्त झालेले आहे. त्या मानाने मराठवाडा, विदर्भ व खानदेशात साखर कारखाने कमी आहेत. पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर प्रदेश हे ऊस उत्पादन करणारे नाहीत. तसेच या विभागातील शेती व हवामान भिन्न-भिन्न असल्यामुळे ऊस उत्पादनाच्या कच्च्या मालपुरवठ्यात कमतरता आहे.

Story img Loader