सागर भस्मे

मागील काही लेखांतून आपण महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राविषयी जाणून घेऊ. अन्नसुरक्षा व उपजीविकेसाठी शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, वृक्षारोपण व कृषी प्रक्रिया हे मूलभूत आधार देतात. भारतातील, तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. भारताच्या दरडोई उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा १३% जरी असला तरी समाजातील सुमारे ४३% घटकांना रोजगार पुरवून कृषी क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत आले आहे.

UNESCO team appreciated servants for preservation of Pratapgad and tradition of festivals
प्रतापगडाच्या संवर्धनाचे ‘युनेस्को’कडून कौतुक
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
Story About Manavat Murder Case
Manavat Murders : महाराष्ट्राला हादरवणारं मानवत हत्याकांड नेमकं होतं काय?
Petrol & Diesel 26th September
Petrol Diesel Price : महाराष्ट्रात कोणत्या शहरांत किती रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या १ लिटर इंधनाचा आजचा भाव
amit shah in kolhapur
महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणं हा विरोधकांचा अपप्रचार, ते आता तोंडावर पडलेत”, ‘रीन्यू पॉवर’च्या निवेदनाचा दाखला देत फडणवीसांचं प्रत्युत्तर
imd warned heavy rains in maharashtra in next two days due to low pressure belt activated in jharkhand and chhattisgarh
Rain In Maharashtra : गणरायाला निरोप अन् पावसाचे आगमन; भारतीय हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

कृषी म्हणजे शब्दशः नांगरणे, असा त्याचा अर्थ होतो. कृषी म्हणजे काय? याची व्याख्या केली, तर जमीन नांगरून तिच्यात बी पेरणे आणि पेरलेल्या बिया व त्यांच्या रोपांची काळजी घेऊन त्यांच्यापासून धान्य मिळविणे होय. म्हणजेच भूमी उपयोजन करणे होय. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ ३०७.५८ लाख हेक्टर आहे. त्यांपैकी एकूण लागवडीचे क्षेत्र २३२.२४ लाख हेक्टर; तर निव्वळ लागवड क्षेत्र १६९.१ लाख हेक्टर आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?

महाराष्ट्रातील भूमी उपयोजनेचे स्वरूप

१) वनक्षेत्र (Forest) : महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी वनक्षेत्र हे जेमतेम २०.२१% आहे.

२) कृषीकरिता उपलब्ध नसलेली जमीन (Land not available for Cultivation) : कृषीकरिता उपलब्ध नसलेल्या जमिनीत खेडी, शहरे, रस्ते, नद्या, तलाव, धरणे, पाण्याच्या निरनिराळ्या साठवणाखाली जमिनी, पर्वत-डोंगररांगांवरील वैराण जमीन, तसेच पायाभूत सुविधा यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात कृषीकरिता उपलब्ध नसलेली जमीन २३२.२४ लाख हेक्टर क्षेत्र आहे.

कृषीखाली उपलब्ध नसलेल्या जमिनीचे तीन उपविभाग पडतात. एक म्हणजे बिगरशेती उपयोगाकरिता आणलेले क्षेत्र, दुसरा म्हणजे ओसाड जमीन व मशागतीस अयोग्य क्षेत्र आणि तिसरा म्हणजे कृषीखाली नसलेली जमीन (पडीक जमीन वगळून).

१) बिगरशेती उपयोगाकरिता आणलेले क्षेत्र (Land Put on Non-agricultural Uses) : महाराष्ट्रात १९६०-६१ साली अशा प्रकारची जमीन सात लाख हेक्टर होती; तर सध्या याचे क्षेत्र १६.४२ लाख हेक्टर आहे. कोकणातील डोंगराळ खडकाळ प्रदेश, अनेक लहान-लहान ओढे व नाले याxमुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शेतीसाठी योग्य अशी फारशी जमीन नाही. तर याउलट विदर्भातील बहुतेक सर्व जिल्ह्यांत अशा नापीक जमिनीचे प्रमाण साधारणपणे कमी आहे. मराठवाड्यातदेखील अशा जमिनीचे प्रमाण बरेच कमी आहे. महाराष्ट्रात बिगरशेती उपयोगाकरिता सर्वांत जास्त क्षेत्र पुणे जिल्ह्यात १.१ लाख हेक्टर; तर बिगरशेती उपयोगाकरिताचे सर्वांत कमी क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यात आहे.

२) ओसाड जमीन व मशागतीस अयोग्य क्षेत्र (Barren and Uncultivated Land) : महाराष्ट्रात अशा प्रकारची जमीन ही १८.२२ लाख हेक्टर जमीन आहे. कोकणात या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. उर्वरित महाराष्ट्रात धुळे-नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये वैराण व कृषीअयोग्य जमीन आढळते. त्या मानाने विदर्भात तिचे प्रमाण कमी आहे.

३) कृषीखाली नसलेली जमीन (पडीक जमीन वगळून) (Uncultivable Land Excluding Fallow Land) : महाराष्ट्रात कृषीखाली नसलेल्या जमिनीचे क्षेत्र हे क्षेत्र २५.२८ लाख हेक्टर असून, अशा जमिनीचे सर्वांत जास्त क्षेत्र भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आहे. त्याखालोखाल रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो; तर सर्वांत कमी क्षेत्र अकोला, धुळे व हिंगोली या जिल्ह्यांत आहे. कृषीखाली नसलेल्या जमिनीचेही पुढील तीन उपप्रकार पडतात :

१) कायम कुरणाखाली असलेल्या जमिनी व चराऊ जमिनी (Permanent Pastures and Grazing Lands) : चराऊ कुरणे बऱ्याच प्रमाणात अरण्यात व इतर शेतीखाली नसलेल्या जमिनीत जेथे शक्य आहे, तेथे आढळतात. खासगी अरण्यात व सरकारी अरण्यात चराऊ कुरणाची व्यवस्था पंचायत समितीकडून पाहिली जाते. बऱ्याच वेळा त्यावर नियंत्रणही असत नाही. विदर्भात चराऊ जमिनीचे क्षेत्रफळ जास्त आढळते. पश्चिम महाराष्ट्रात नाशिक व कोल्हापूर या जिल्ह्यात चांगल्या प्रकारची कायमस्वरूपी कुरणे आहेत. मराठवाड्यात मात्र त्यांचे प्रमाण बरेच कमी आहे. महाराष्ट्रात कायम कुरणे व इतर चराऊ कुरणांत सर्वांत जास्त क्षेत्र भंडारा-गोंदिया जिल्ह्यात; तर सर्वांत कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.

२) वृक्षांच्या बागा व मळे (Miscellaneous Tree Crops and Groves) (किरकोळ झाडे व झुडपे यांच्या निव्वळ पेरलेल्या क्षेत्रात सामील नसलेले क्षेत्र) : महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात या प्रकारची जमीन आहे. महाराष्ट्रात या प्रकारच्या जमिनीचे सर्वांत जास्त क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात; तर सर्वांत कमी क्षेत्र हिंगोली जिल्ह्यात आहे.

३) मशागतयोग्य ओस जमीन (Cultivated Waste Land) : महाराष्ट्रात मशागतयोग्य ओस जमीन ९.२४ लाख हेक्टर आहे. अशा जमिनी कृषीला उपलब्ध होऊ शकतात; परंतु त्या कृषीसाठी वापरल्या जात नाहीत किंवा काही वर्षे जमिनीची मशागत केल्यावर काही कारणामुळे लागवडीस आणल्या जात नाहीत. या जमिनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळसुद्धा ओस पडून असतात. कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ओस जमिनीचे प्रमाण जास्त आहे. विदर्भातील बहुतेक सर्व जिल्ह्यांत ओस जमिनीचे प्रमाण बरेच कमी आहे.

३) पडीक जमिनी (Fallow Land) : महाराष्ट्रात पडीक जमिनीचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. १९६०-६१ साली २४ लाख हेक्टर जमीन पडीक होती; तर सध्या पडीक जमिनीचे क्षेत्र २६.५८ लाख हेक्टर आहे. अशा पडीक जमिनीचे प्रमाण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत बरेच दिसते. त्याचप्रमाणे घाटमाथा ओलांडल्यावर पूर्वेकडे पश्चिम महाराष्ट्रात पडीक जमिनीचे प्रमाण जास्त आहे. मराठवाड्यातही पडीक जमिनीचे प्रमाण बरेच आहे. त्या मानाने विदर्भात मात्र साधारण स्वरूपाची पडीक जमीन आढळते. महाराष्ट्रात पडीक जमिनीचे सर्वांत जास्त क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात; तर सर्वांत कमी क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यात आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक; विस्तार, प्रकार अन् वैशिष्ट्ये

कृषीखालील क्षेत्र (Cultivated Area) :

महाराष्ट्रात कृषीखालील क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांत वाढ होऊन, ते २३२.२४ लाख हेक्टर झाले आहे.

पेरलेले निव्वळ क्षेत्र : महाराष्ट्रात पेरलेले निव्वळ क्षेत्र सुमारे १६९.१ लाख हेक्टर आहे. महाराष्ट्रात सर्वांत जास्त पेरलेले निव्वळ क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्याखालोखाल सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये निव्वळ क्षेत्र सुमारे ५० लाख हेक्टर क्षेत्र असून, त्याची टक्केवारी २८% आहे. सर्वांत कमी पेरलेले निव्वळ क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. त्याखालोखाल गडचिरोली, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

दुबार / तिबार (दुसोटा / तिसोटा) क्षेत्र : दुबार किंवा तिबार कृषी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र; ज्यावर पिकांची लागवड अनुक्रमे वर्षातून दोनदा किंवा तीनदा केली जाते. महाराष्ट्रात दुबार / तिबार क्षेत्रात वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात दुबार / तिबार क्षेत्रात जळगाव जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात सर्वांत कमी दुबार / तिबार क्षेत्र ठाणे जिल्ह्यात आहे.

पिकाखालील एकूण क्षेत्र : महाराष्ट्रात पिकाखालील एकूण क्षेत्र २३२.२४ लाख हेक्टर आहे. महाराष्ट्रात सर्वांत जास्त पिकाखालील एकूण क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यात १४ लाख हेक्टर इतके आहे. तर, महाराष्ट्रात पिकाखालील एकूण क्षेत्रात सर्वांत शेवटचा क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लागतो.