प्रश्न क्र. १
लोकसभेच्या सभापती संदर्भात खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
पर्याय :
अ) आपल्या पदाचा राजीनामा देणाऱ्या सभापतीला आपले राजीनामापत्र उपसभापतीला उद्देशून लिहावे लागते.
ब) साधारण मुदत संपण्यापूर्वी सभागृहाचे विसर्जन झाल्यास त्याचे सभापतीपद रद्द होते.
क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत सभापती आपल्या पदी राहतात.
ड) सभापतींपदी निवड होत असताना तो सभागृहाचा सभासद असण्याची आवश्यकता नसली तरी निवड झाल्यापासून सहा महिन्यांत त्याला सभागृहामध्ये निवडून यावे लागते.
प्रश्न क्र. २
खालीलपकी कोणते विधान भारताच्या संविधानातील चौथ्या परिशिष्टाचे बरोबर वर्णन करते?
पर्याय :
अ) राज्यसभेतील जागांचे वाटप त्यामध्ये दिले आहे.
ब) केंद्र आणि राज्यादरम्यान सत्तेच्या वाटपाची योजना त्यामध्ये दिली आहे.
क) जमातींच्या क्षेत्रांच्या प्रशासनाविषयींच्या तरतुदी त्यामध्ये दिल्या आहेत.
ड) संविधानात नमूद केलेल्या भाषांची सूची त्यामध्ये दिली आहे.
प्रश्न क्र. ३
लक्षवेधी प्रस्तावाच्या बाबतीत खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
१) एखाद्या मंत्र्यांचे महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्याची ती एक युक्ती आहे.
२) मंत्र्याने त्याविषयी अधिकारवाणीने विधान करावे हा त्यामागील उद्देश असतो.
३) सरकारला दोष देणे असा या प्रस्तावाचा अर्थ नाही.
४) संसदेच्या कामकाज नियमावलीत आणि प्रक्रियेत तिचा समावेश नाही.
पर्याय :
अ) २ व ३ विधान बरोबर आहे.
ब) २ व ३ विधान बरोबर आहे.
क) फक्त १ विधान बरोबर आहे.
ड) १, २ व ३ विधान बरोबर आहे.
प्रश्न क्र. ४
खालीलपकी कोणत्या गोष्टीचा संविधानात स्पष्ट उल्लेख नसला तरी एक प्रघात म्हणून तिचे पालन केले जाते?
पर्याय :
अ) अर्थमंत्री लोकसभेचा सभासद असतो.
ब) लोकसभेतील बहुमत गमावल्यावर पंतप्रधान राजीनामा देतात.
क) भारतातील सर्व राजकीय पक्षांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाते.
ड) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांनी त्यांची मुदत संपण्यापूर्वी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यास लोकसभेच्या सभापती हंगामी राष्ट्रपतीपद धारण करतो.
प्रश्न क्र. ५
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
आर्थिक आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती ….
पर्याय :
अ) सर्व नागरी सेवकांच्या वेतनात व भत्त्यात कपात करू शकतात.
ब) सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनात कपात करू शकतात.
क) नागरिकांचे मूलभूत अधिकार स्थगित करू शकतात.
ड) केंद्र व राज्य सरकार यांना आíथक प्राधान्यक्रम ठरविण्याचे निर्देश देऊ शकतात.
प्रश्न क्र. ६
के. सुब्रह्मण्यम या संरक्षणविषयक तज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली कशासाठी समिती नेमली गेली होती?
पर्याय :
अ) कारगिलमधील घुसखोरीसंदर्भात
ब) अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरीसंदर्भात
क) गडचिरोलीमधील नक्षलवादासंदर्भात
ड) यांपकी नाही.
प्रश्न क्र. ७
खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पक्षांतर बंदी विधेयक संमत केले गेले.
2) केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव पारित करण्याचा अधिकार लोकसभेस आहे.
पर्याय :
अ) विधान १ बरोबर
ब) विधान २ बरोबर
क) विधान १ व २ बरोबर
ड) विधान १ व २ चूक
प्रश्न क्र. ८
१) वित्त आयोगाची रचना घटनात्मकरीत्या म्हणजे घटनेतील कलम 280 मधील तरतुदीनुसार केली जाते.
२) वित्त आयोगाच्या शिफारशी मान्य केल्याच पाहिजेत, असे शासनावर कायदेशीर बंध नाही.
पर्याय :
अ) फक्त १ विधान बरोबर आहे.
ब) फक्त २ विधान बरोबर आहे.
क) १ व २ विधान बरोबर आहे.
ड) १ व २ विधान चूक आहे.
प्रश्न क्र. ९
वित्त आयोगाच्या बाबतीत खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) भारतीच्या वित्तीय संघराज्याचे संतुलन करणारे चाक असे या आयोगाचे स्वरूप आहे.
ब) वित्त आयोगात मध्ये एक अध्यक्ष आणि तीन सदस्य असतात.
क) वित्त आयोगाच्या सदस्यांची अर्हता राष्ट्रपती निश्चित करतात.
ड) भारतीय घटनेच्या अनुच्छेद २८० मधील तरतुदीनुसार या आयोगाची रचना केली जाते.
पर्याय :
अ)२,३ आणि४
ब) २ आणि ३
क)१ आणि ४
ड) १, २ आणि ३
प्रश्न क्र. १० .
खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) उपराष्ट्रपतींच्या गरहजेरीत राज्यसभा उपाध्यक्ष हे राज्यसभेच्या अध्यक्षांचे कामकाज सांभाळतात.
२) भारतीय घटनेच्या कलम 110 मध्ये अर्थविषयक विधेयकाची व्याख्या दिली आहे.
३) पंतप्रधान हे केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.
पर्याय :
अ) २ व ३ विधान बरोबर आहे.
ब) १ व ३ विधान बरोबर आहे.
क) १ व २ विधान बरोबर आहे.
ड) १ , २ व ३ विधान बरोबर आहे.
प्रश्न क्र. ११
खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१ ) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो उपराष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो.
२ ) घटनेच्या २१३ व्या कलमात प्रत्येक घटक राज्यास एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद अशी तरतूद आहे.
पर्याय :
अ) फक्त २ विधान बरोबर आहे.
ब) फक्त ३ विधान बरोबर आहे.
क) फक्त १ व २ विधान चूक आहे.
ड) १ व २ विधान बरोबर आहे.
प्रश्न क्र. १२ .
खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर एकूण 18 सदस्य पाठविले जातात.
२) महाराष्ट्र राज्यातून लोकसभेवर एकूण 49 सदस्य पाठविले जातात.
3) राज्यसभा सभापती हे संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बठकीचे अध्यक्षपद भूषवितात.
पर्याय :
अ) फक्त २ विधान बरोबर आहे.
ब) २ व ३ विधान बरोबर आहे.
क) फक्त १ विधान बरोबर आहे.
ड) १ , २ व ३ विधान चूक आहे.
प्रश्न क्र. १३
राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकारांसदर्भात खालीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?
पर्याय :
अ) संसंदेचे अधिवेशन चालू नसतानाच फक्त राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात.
ब) राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकूमास संसदेने संमत केलेल्या कायद्याचा दर्जा असतो.
क) ज्या बाबींवर कायदे करण्याचे संसदेस अधिकार नाहीत अशा बाबींसंदर्भातच फक्त राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात.
ड) संबंधित वटहुकूम संसदेच्या नजीकच्या अधिवेशनात संमतीसाठी ठेवावा लागतो.
प्रश्न क्र. १४
खालीलपकी कोणते विधान चूक आहे?
१ ) भारतातील ग्रामपंचायतींची स्थापना हे घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनाचे उत्कृष्ट उदाहरण होय.
२) सुरुवातीस भारतीय राज्यघटना 395 कलमे किंवा अनुच्छेद होती व ती 22 भागात विभागली गेली होती.
पर्याय :
अ) १ विधान चूक २ बरोबर आहे.
ब) २ विधान चूक १ विधान बरोबर आहे.
क) १ व २ विधान चूक आहे.
ड) १ व २ विधान बरोबर आहे.
प्रश्न क्र. १५
भारतीय घटनेच्या संदर्भात खालील विधानांपकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) भारतीय घटनेत संघराज्याची तसेच एकात्मिक राज्याची अशी दोहोंची वैशिष्टय़े उतरलेली आहेत.
२ ) आणीबाणीच्या काळात देशात राज्याचा प्रभाव व नियंत्रण अधिक व्यापक होत असल्याचे दिसून येते.
३) मध्यवर्ती शासन प्रबळ असलेली संघराज्यात्मक घटना अशा शब्दांतच भारतीय घटनेचे वर्णन करणे अधिक उचित होईल.
पर्याय :
अ) १ व २ विधान चूक
ब) २ व ३ विधान चूक
क) १ व ३ विधान चूक
ड ) फक्त २ चूक
प्रश्न क्र. १६
खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१ ) भारताच्या घटना समितीने घटनेचा मसुदा जनतेपुढे मतदानासाठी ठेवला होता.
२ ) भारताची घटना समिती प्रत्यक्षरीत्या जनतेकडून निवडली गेली नव्हती.
३) मान्यवर नेत्यांचा समावेश असलेल्या या समितीत समाजातील विविध स्तरांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला गेला होता.
पर्याय :
अ) १ व २ विधान बरोबर
ब) २ व ३ विधान बरोबर
क) १ व ३ विधान बरोबर
ड) १, २, ३ विधान बरोबर भारताच्या घटना समितीने घटनेचा मसुदा जनतेपुढे मतदानासाठी ठेवला नव्हता.
प्रश्न क्र. १७
खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील घटनेचा सरनामा हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो.
२) आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताने कोणत्याही गटात सामील न होता तटस्थतेचे धोरण स्वीकारले आहे. ही बाब घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व व शासनाने त्यांचा केलेला आदर दर्शवितात.
३) घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, कलम १४ (समतेचा हक्क) हे घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम होय.
पर्याय :
अ) विधान १ व २ बरोबर आहे.
ब) विधान १ व ३ बरोबर आहे.
क) विधान १, २ व ३ बरोबर आहे.
ड) विधान १, २ व ३ चूक आहे.
प्रश्न क्र. १८ .
भारतीय घटनेतील विविध तरतुदींच्या संदर्भात खाली केलेल्या विधांनापकी कोणते विधान चुकीचे आहे?
पर्याय :
अ) मूलभूत हक्कांवर गदा आल्यास भारतीय नागरिकांस त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते.
ब) एखाद्या नागरिकाने घटनेतील कलम ५१ अ मध्ये दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन न केल्यास त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली नाही.
क) राज्याने वा केंद्राने घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास त्याविरूध्द न्यायालयात दाद मागता येते.
ड) आजच्या घटनात्मक तरतुदी लक्षात घेता मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा प्राधान्य देण्यात आलेले दिसून येते.
प्रश्न क्र. १९
खालीलपकी कोणते विधान चूक आहे?
१) आयकर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे.
२) निवडणूक आयोगाची निवड करण्यासाठी राष्ट्रपतींना अधिकार आहे.
३) शेती हा विषय परिशिष्ट सातमधील केंद्र सूचीत समाविष्ट केला आहे.
पर्याय :
अ) १ व २ विधान चूक आहे.
ब) फक्त १ विधान चूक आहे.
क) फक्त ३ विधान चूक आहे.
ड) सर्व चूक आहेत.
प्रश्न क्र. २०
कोणत्या मुघल बादशाहाने राजा राममोहन राय यांना ‘राजा’ ही पदवी दिली?
पर्याय :
अ) महम्मदशहा
ब) अकबर द्वितीय
क) अहमदशहा
ड) आलमगीर दुसरा
वरील प्रश्नांची उत्तरं संध्याकाळी सात वाजता लोकसत्ता डॉटकॉमवर प्रसिद्ध होतील.