सागर भस्मे

मागील लेखातून आपण पायाभूत सुविधा या घटकातील उर्जा क्षेत्राविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण पायाभूत सुविधा यामधीलच विमान वाहतूक या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण विमान वाहतूक विकास, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच पंचवार्षिक योजनेदरम्यान विमान वाहतुकीकरिता कोणते प्रयत्न करण्यात आले, याविषयी जाणून घेऊया.

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
indian express thinc our cities event
सहज, स्वस्त तंत्रज्ञानाची गरज ; इंडियन एक्सप्रेसच्या ‘थिंक – सिटीज’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत

विमान वाहतूक विकास :

सर्वात जलद गतीने वाढणारी विमान वाहतुकीची बाजारपेठ म्हणून भारताचे जगामध्ये नाव झाले आहे. आर्थिक पाहणी २०२२-२३ नुसार स्थानिक हवाई वाहतुकीमध्ये जवळपास दुप्पट वाढ झालेली आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : उर्जास्त्रोतांचे वर्गीकरण कसे करण्यात येते? भारतात उर्जा क्षेत्राच्या विकासाकरिता कोणत्या योजना राबवण्यात आल्या?

विमान वाहतुकीची ऐतिहासिक पार्श्वभूमी :

विमान वाहतूक ही इतर वाहतूक सुविधांपेक्षा सर्वात जलद आहे, मात्र ही अत्यंत खर्चिक स्वरूपाची असल्याने मालवाहतुकीत विमान सुविधांचा वापर कमी प्रमाणात करण्यात येतो. विमान वाहतूक ही प्रामुख्याने प्रवास वाहतुकीकरिता वापरली जाते. सहसा हलक्या व मौल्यवान मालाच्या वाहतुकीकरिता विमानसेवा वापरण्यात येते.

भारतामध्ये पहिल्या विमान वाहतुकीची सुरुवात ही जुलै १९३२ मध्ये टाटा एअरलाईन्स कंपनीद्वारे करण्यात आली. तसेच भारतामधील पहिला पायलट परवाना हा जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांना मिळाला होता. अशा या महान कामगिरीमुळे जेआरडी टाटा यांना भारतीय हवाई वाहतुकीचे जनक असे म्हटले जाते. १९४६ मध्ये टाटा एअरलाईन्सच्या नावामध्ये बदल करून त्याचे नाव ‘एअर इंडिया’ असे करण्यात आले. १९४८ पर्यंत एअर इंडिया ही खासगी स्वरूपाची होती, मात्र १९४८ मध्ये एअर इंडियामधील ४९ टक्के शेअर्स हे भारत सरकारने खरेदी केले व यामुळे एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण झाले आणि एअर इंडिया ही भारत सरकारच्या मालकीची बनली.

एअर इंडिया सरकारी मालमत्तेची झाल्याने यावर आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीची जबाबदारी देखील टाकण्यात आली. एअर इंडिया व्यतिरिक्त आणखी खासगी विमान कंपन्यादेखील कार्यरत होत्या. १९५३ मध्ये अशा ८ खासगी विमान कंपन्यांचे भारत सरकारने राष्ट्रीयीकरण केले आणि त्यामधून इंडियन एअरलाइन्सची स्थापना करण्यात आली. तसेच या इंडियन एअरलाइन्स वर देशांतर्गत विमान वाहतुकीची जबाबदारी टाकण्यात आली.

विमान वाहतूक आणि पंचवार्षिक योजना :

नियोजनाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये विमान वाहतुकीवर फारसे लक्ष दिले गेले नाही. पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान विमान वाहतुकीवर फक्त १ टक्के इतकाच खर्च करण्यात आला. कारण विमान वाहतुकीमुळे औद्योगिकीकरणात तसेच कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये देखील फारसा बदल होत नाही, जसा रस्ते, रेल्वेमुळे होतो. असा दृष्टिकोन असल्यामुळे त्याकडे सुरूवातीला जास्त लक्ष देण्यात आलेले नाही.

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ४ नवीन विमानतळे ही उभारण्यात आली. पुढे जसजसे विमान वाहतुकीचे महत्त्व वाढत गेले, तसेच याकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली. चौथ्या पंचवार्षिक योजने दरम्यान विमानसेवेवर १८५ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला, तसेच १९७२ मध्ये मुंबई, कोलकत्ता, दिल्ली आणि चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या विकासासाठी IAAI (International Airport Authority of India) ची स्थापना करण्यात आली.

१९८१ मध्ये म्हणजेच सहाव्या योजना कालखंडात ईशान्य पूर्व भागात विमान सेवा पुरवण्याकरिता वायुदूत या महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. पुढे या महामंडळाचे १९९३ मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर १५ ऑक्टोबर १९८५ मध्ये आसाममधील तसेच दुर्गम भागातील तेल खाणींचा शोध घेण्याकरिता पवनहंस मंडळाची हेलिकॉप्टर सेवा पुरवण्याकरिता स्थापना करण्यात आली. पुढे या महामंडळाचे नाव पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेड असे करण्यात आले.

सातव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान जूनी विमाने बदलून विमानांची संख्या वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच देशांतर्गत विमानसेवा पुरवणाऱ्या विमानतळांच्या विकासाकरिता १९८६ मध्ये NAA(National Airport Authority) ची स्थापना करण्यात आली. पुढे IAAI आणि NAA यांच्या एकत्रीकरणांमधून मार्च १९९५ मध्ये AAI(Airport Authority of India) या सार्वजनिक क्षेत्रातील मंडळाची स्थापना करण्यात आली.

दहाव्या योजनेदरम्यान सर्व पंचवार्षिक योजनांच्या तुलनेत विमान वाहतुकीचा वेगाने विकास झाला. त्या योजनेदरम्यान २००४ -२००७ या चार वर्षाच्या कालखंडामध्ये विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचे निदर्शनास आले. तसेच मालवाहतुकीमध्ये देखील ४५ टक्के इतकी प्रचंड वाढ झाली. तसेच २७ ऑगस्ट २००७ ला Air India आणि Indian Airlines या कंपन्यांचे एकत्रीकरण करण्यात येऊन NACIL(National Aviation Company of India Ltd.) ची स्थापना करण्यात आली.

हेही वाचा – UPSC-MPSC : उर्जेचे महत्त्व काय? भारतात उर्जा क्षेत्राच्या विकासाकरिता कोणते प्रयत्न करण्यात आले?

पुढे २०१० मध्ये NACIL च्या नावामध्ये बदल करण्यात येऊन त्याचे नाव Air India Ltd.असे करण्यात आले. Air India Ltd. च्या तीन उपसंस्था देखील कार्यरत आहेत. ते म्हणजे Air India, All India Express, Alliance Air या तीन उपसंस्था आहेत. यामुळे Air India Ltd. ही भारत सरकारची विमान सेवा पुरवणारी मोठी कंपनी ठरली आहे. तसेच ही कंपनी आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत अशी दोन्ही विमानसेवा पुरवण्याचे कार्य करते. भारतात उत्तरप्रदेशमधील फुरसतगंज येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी ही कार्यरत आहे. तसेच गोंदिया येथे राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट हे पायलट प्रशिक्षणाकरिता उभारण्यात आले आहे.

Story img Loader