सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारतातील कोळसा उद्योगाबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण औषध निर्माण उद्योगाबाबत जाणून घेऊया. यामध्ये आपण भारताची जागतिक बाजारपेठेत असलेली भूमिका, तसेच औषध निर्माण उद्योगाची विद्यमान परिस्थिती इत्यादींचा अभ्यास करू.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

औषध निर्माण उद्योग :

जागतिक औषध निर्माण उद्योगांमध्ये भारतीय औषध निर्माण उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतो. उत्पादनाच्या प्रमाणानुसार भारताचा जगामध्ये तिसरा, तर औषधी उत्पादनांच्या मूल्यानुसार १४ वा क्रमांक लागतो. आर्थिक पाहणी २०२२-२३ नुसार औषध निर्माण उद्योगाची विद्यमान परिस्थिती ही पुढील प्रमाणे आहे :

जेनेरिक औषधांच्या बाबतीमध्ये भारत हा सर्वात मोठा जागतिक पुरवठादार देश आहे. एकूण जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचा वाटा हा २० टक्के इतका आहे. तसेच लसींच्या उत्पादनामध्ये भारत अग्रेसर असून जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचा ६० टक्के वाटा आहे. कोविड-१९ जागतिक महासाथीमुळे महत्त्वाच्या औषधांच्या मागणीमध्ये झालेल्या वाढीमुळे या औषधांची आणि इतर औषधांची १६० पेक्षा जास्त देशांना निर्यात करण्यात आल्यामुळे २०२०-२१ मध्ये भारतीय औषध निर्यातीमध्ये २४ टक्केची वृद्धी झाली आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात कोळसा उद्योगाची सुरुवात कधी झाली? त्यासाठी सरकारद्वारे कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?

जागतिक व्यापारामध्ये अडचणी वाढलेल्या असताना आणि कोविड-१९ जागतिक महासाथीशी संबंधित उपचारांच्या मागणीमध्ये घट झालेली होती, तरीसुद्धा २०२१-२२ मध्ये औषध निर्यातीने चांगली कामगिरी केली आहे. सन २०२२-२३ मध्ये २२ टक्के इतका वृद्धी दर होता. सप्टेंबर २०२२ मध्ये औषध निर्माण क्षेत्रामधील एकत्रित थेट परकीय गुंतवणुकीने २० अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा गाठला आहे. पाच वर्षांच्या तुलनेमध्ये ही चौपट वाढ होती आणि याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकदारांना सोयीची धोरणे आणि या उद्योगाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे.

औषध निर्माण उद्योगांची सशक्तीकरण योजना :

औषध निर्माण क्षेत्रामधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याकरिता सरकारने मार्च २०२२ मध्ये ही योजना सुरू केली. ही योजना सन २०२१-२६ या कालावधीकरिता सुरू करण्यात आली.

हेही वाचा – UPSC-MPSC : कृषी आधारित उद्योग म्हणजे काय? या उद्योगांच्या विकासाकरिता सरकारने कोणत्या योजना सुरू केल्या?

योजनेची उद्दिष्टे ही पुढीलप्रमाणे आहेत :

१) औषध निर्माण उद्योगाला वित्तीय सहाय्य करण्याकरिता विद्यमान पायाभूत सुविधा मजबूत करणे, जेणेकरून सार्वजनिक सुविधा निर्माण करणे शक्य होईल.

२) औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरणे या उद्योगांच्या संदर्भातील माहिती आणि जाणीव वाढवणे याकरिता अध्ययनांचे आयोजन करणे, माहितीचा साठा निर्माण करणे आणि अग्रेसर उद्योजक, शिक्षण संस्था आणि धोरणकर्त्यांना त्यांच्याकडील माहिती आणि अनुभव कथन करण्याकरिता एकत्र आणणे.

३) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मापदंडाची पूर्तता करण्याकरिता सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगांच्या उत्पादन सुविधांची गुणवत्ता वाढवणे याकरिता या उद्योगांना त्यांच्या भांडवली खर्चावर अनुदान किंवा भांडवली अनुदान देणे.

आर्थिक पाहणी २०२२-२३ नुसार, भारताची स्थानिक औषध निर्माण बाजारपेठ ही सन २०२३ मध्ये ४१ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होण्याची अपेक्षा असून सन २०२४ पर्यंत ६५ अब्ज अमेरिकी डॉलरचा, तर सन २०३० पर्यंत १३० अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.