सागर भस्मे

मागील लेखात आपण पैसा म्हणजे काय? त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी व उत्क्रांतीनुसार पैशांचे प्रकार बघितले. या लेखातून आपण पैशाचे गुणधर्म आणि पैशाची महत्वाची कार्ये याबाबत जाणून घेऊया.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
supreme court marital dispute case
Factors to decide Alimony Amount: घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम किती असावी? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले ८ महत्त्वाचे घटक
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

पैशाचे साधारणतः दोन प्रकार असतात. विधिग्राह्य पैसा व अविधिग्राह्य पैसा. ज्या पैशाला कायद्याचे पाठबळ असते, त्याला विधिग्राह्य पैसा असे म्हणतात. तसेच विधिग्राह्य पैसा कोणत्याही व्यवहारात स्वीकारला जातो. त्यामध्ये भारतातील सर्व नोटा व नाणी यांचा समावेश होतो. अविधीग्राह्य पैसा म्हणजे ज्या पैशाला कायदेशीर पाठबळ नसते. हा पैसा लोक अंतिम देवाण-घेवाण करण्याकरिता वापरतात. या पैशाला ‘पर्यायी पैसा’ किंवा ‘ऐच्छिक पैसा’ असेसुद्धा म्हटले जाते. यामध्ये धनादेश, विनिमय पत्र इत्यादींचा समावेश होतो.

पैशाचे गुणधर्म :

पैशांमध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुणधर्म असल्याने तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो. अगदी छोट्या व्यवहारांमध्ये पैशांचे छोट्या मूल्यात विभाजन करणेसुद्धा सोपे असते. यामध्ये टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी नोटा व नाणी दीर्घकाळात पुन्हा पुन्हा वापरता येतात. पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. तसेच देवाण-घेवाण करणार्‍या व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता टाळता येते. पैशामधील वहनियतेच्या गुणधर्मामुळे पैसा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या वाहून नेता येतो. यामध्ये एकजिनसीपणा असल्यामुळे एखाद्या विशिष्ट परिमाणाचे पैसे गुणवैशिष्ट्यांमुळे एकजिनसी दिसतात. पैशाला एक स्थिर मौद्रिक मूल्य असते, ते वस्तू व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्याकरिता वापरतात. या वस्तूंची देवाण-घेवाण भविष्यातील गरजांनुसार केली जाते.

पैशाची कार्ये :

पैशाच्या कार्याचे वर्गीकरण हे तीन प्रकारे करण्यात आलेले आहे. ते म्हणजे प्राथमिक कार्ये, दुय्यम कार्ये तसेच अनुषंगिक कार्ये. ते आपण सविस्तरपणे बघूया.

१) प्राथमिक कार्ये :

विनिमयाचे माध्यम : पैशाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम होय. पूर्वी वस्तूविनिमय पद्धत अस्तित्वात असल्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. त्या सर्व अडचणी पैसा अस्तित्वात आल्याने दूर झाल्या आहेत. पैसा सगळीकडे स्वीकार्य असतो. पैशाच्या आधारे वस्तूंची खरेदी-विक्री केली जाते. खरेदीदार व विक्रेता दोन्ही हा पैसा स्वीकृत करत असल्यामुळे पैसा विनिमयाचे माध्यम बनते.

मूल्यमापनाचे साधन : वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते. पैशामुळे वस्तूंच्या किमतीची तुलना करता येते. विविध चलनांद्वारे अनेक देशांतील वस्तूंचे मूल्य व्यक्त करता येते. वस्तूविनिमय पद्धतीमध्ये वस्तूंचे मूल्य काढणे अतिशय अवघड होते. सर्व प्रकारचे उत्पन्न, खर्च, मालमत्ता, देणी पैशाच्या स्वरूपात व्यक्त करता येते. पैसा हे हिशोबाचे एकक मिळाल्यामुळे पैसा हे मूल्यमापनाचे साधन बनते.

२) दुय्यम कार्ये :

विलंबित देणी देण्याचे साधन : जी देणी भविष्यात द्यावी लागते, त्याला विलंबित देणी असे म्हणतात. वस्तूविनिमय व्यवस्थेत कर्ज घेणे सोपे होते , पण त्याची परतफेड करणे अवघड होते. उदा. धान्य, गुरे या स्वरूपातील कर्ज. पैसा हे देणी देण्याचे साधन आहे. व्यवहार करणाऱ्या दोघांचा पैशावर विश्वास असतो, तसेच पैशाची किंमत बऱ्याच काळापर्यंत स्थिर असते. पैशांमुळे कर्ज देणे व कर्ज घेणे सोपे जाते.

मूल्यसंचनाचे साधन : पैसा मूल्य संचनाची कार्य करतो. पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्यकाळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. हे बचतीमुळे शक्य होते. लॉर्ड जे. एम. केन्स यांच्या मते, “पैसा वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांच्यातील दुवा आहे.”

मूल्य हस्तांतरणाचे साधन : पैशांमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्याचे हस्तांतरण केले जाते. स्थावर मालमत्ता, इमारत, प्लॉट, दुकान, शेतजमीन इत्यादींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खरेदी-विक्री करता येते.

३) अनुषंगिक कार्ये :

प्रा. किन्ले यांच्या मते, “आधुनिक काळात पैसा प्रत्येक आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका पार पाडतो.”

राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन : राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण उत्पादनाच्या चार घटकांमध्ये मौद्रिक मोबदल्याच्या स्वरूपात केले जाते. उदा. खंड, वेतन, व्याज व नफा इत्यादी.

पतपैशांचा आधार : व्यापारी बँका प्राथमिक ठेवींच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात. पैसा हा पतनिर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे.

संपत्तीचे रोखतेत रूपांतरण : पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे. ती कोणत्याही मालमत्तेत रूपांतरित करता येते आणि कोणतीही मालमत्ता पैशात रूपांतरित करता येते. उदा. एखादी व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकते, त्यातून सरकारी कर्जरोखे खरेदी करू शकते.

स्थूल आर्थिक चलांचे मापन : स्थूल राष्ट्रीय उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादींसारख्या स्थूल आर्थिक चलांची मोजदाद मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे करता येते. तसेच पैशामुळे शासकीय करआकारणी व अर्थसंकल्प बांधणी करणे शक्य होते.

Story img Loader