सागर भस्मे

Indian Economy In Marathi : मागील लेखातून आपण मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी म्हणजे काय? दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? याबाबतची माहिती घेतली. या लेखातून आपण राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित महत्त्वाच्या संस्थांबाबत जाणून घेऊ या. या संस्थांमध्ये केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (CSO), राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) , राष्ट्रीय सांख्यिकी आयोग (NSC) आदींचा समावेश होतो.

Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?
Image of Indian economy graphics or related visuals
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज
land will be returned to farmers
कर थकविल्याने शासनजमा जमिनी शेतकऱ्यांना परत
poverty alleviation in Maharashtra
महाराष्ट्रातील दारिद्र्य निर्मूलनाचे आव्हान
richest chief minister in India
Richest CM of India: भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसांची संपत्ती किती?

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न भाग-४

केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (Central Statistical Office)

केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाची स्थापना २ मे १९५१ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याकरिता सरकारी एजन्सी म्हणून भारत सरकारने या संस्थेची स्थापना केली. त्यावेळी या संस्थेचे नाव केंद्रीय सांख्यिकीय संस्था असे होते. त्यानंतर १९५४ मध्ये ‘केंद्रीय सांख्यिकीय संस्था’चे ‘केंद्रीय सांख्यिकीय संघटना’मध्ये रूपांतर करण्यात आले. अलीकडे तिसऱ्यांदा तिच्या नावामध्ये बदल करण्यात येऊन, ते केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय (CSO- सीएसओ), असे करण्यात आले. विविध केंद्रीय मंत्रालय व राज्य शासनांमध्ये संख्यात्मक समन्वय राखण्याच्या उद्देशाने केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे; मात्र त्याचे औद्योगिक सांख्यिकी केंद्र हे कलकत्ता येथे कार्यरत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे हे ‘सीएसओ’चे प्रमुख कार्य आहे. ‘सीएसओ’द्वारे ‘राष्ट्रीय लेखा सांख्यिकी’ नावाने राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्रकाशित करण्यात येते.

सांख्यिकीशी संबंधित क्रियांमध्ये समन्वय राखणे, सांख्यिकी मानक तयार करणे व ते लागू करणे, वार्षिक औद्योगिक पाहणी, तसेच आर्थिक गणना करणे, राष्ट्रीय लेखे तयार करणे. सामाजिक आकडेवारी, प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय सहकार्य, औद्योगिक वर्गीकरण या बाबी हाताळणे, तसेच औद्योगिक उत्पादन निर्देशांक व ग्राहक किंमत निर्देशांक मोजणे इत्यादी कामे या संस्थेद्वारे पार पाडली जातात.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (National Sample Survey Office)

भारत सरकारद्वारे १९५० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणची (NSC) स्थापना करण्यात आली. आर्थिक व सामाजिक नियोजन आखण्यासाठी नियोजनातील धोरण आखणे आणि राष्ट्रीय पातळीवर नमुना सर्वेक्षण करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य होते. १९७० मध्ये ‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण’ची पुनर्रचना करण्यात आली. तसेच त्याचे रूपांतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेमध्ये करण्यात आले. अलीकडे त्याचे परत रूपांतर करण्यात येऊन राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, असे करण्यात आले. ‘एनएसएसओ’चे कार्य चार विभागांमार्फत पार पडते आणि ते म्हणजे :

  • डिझाईन व रिसर्च विभाग, कोलकत्ता : याद्वारे पाहणी, नियोजन व अहवालांचे विश्लेषण केले जाते.
  • फिल्ड ऑपरेशन विभाग, नवी दिल्ली व फरिदाबाद : याद्वारे आर्थिक व सामाजिक पाहणी, औद्योगिक आकडेवारी, तसेच किमती गोळा केल्या जातात.
  • डेटा प्रोसेसिंग विभाग, कोलकत्ता : याद्वारे नमुना सर्वेक्षणाच्या माहितीची विश्लेषण प्रक्रिया व प्रसारण केले जाते.
  • समन्वयक व प्रकाशन विभाग, नवी दिल्ली : याद्वारे माहिती प्रकाशित केली जाते. तसेच ‘सर्वेक्षण’ नावाने एक द्वैवार्षिक प्रकाशित केले जाते.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न भाग-३

राष्ट्रीय सांख्यिकी आयोग ( National Statistical Commission)

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना जानेवारी २००० मध्ये डॉ. सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. देशातील सांख्यिकी गणना प्रक्रियेचे पुनर्परीक्षण करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. या आयोगाच्या शिफारशीनुसार कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना १२ जुलै २००६ रोजी प्रा. सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. राष्ट्रीय महत्त्वाची आणि देशाच्या विकासासाठी निर्णयात्मक ठरणारी आकडेवारी शोधणे, तसेच विविध तांत्रिक बाबतीत साह्य घेण्यासाठी व्यावसायिक समित्या किंवा कार्यगट स्थापन करणे ही या आयोगाची कार्ये आहेत. सध्या ३० नोव्हेंबर २०२२ पासून तीन वर्षांकरिता राजीव लक्ष्मण करंदीकर हे या आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत.

Story img Loader