सागर भस्मे

आपण राष्ट्रीय उत्पन्न (भाग-२ ) या लेखामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला. आजच्या लेखामध्ये आपण देशांतर्गत स्थूल उत्पादन (GDP), निव्वळ देशांतर्गत उत्पाद (NDP), स्थूल राष्ट्रीय उत्पाद (GNP) , निव्वळ राष्ट्रीय उत्पाद (NNP) या संकल्पनांचा सविस्तर अभ्यास करूया.

Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न भाग- २

स्थुल देशांतर्गत उत्पाद (Gross Domestic Product ) :

स्थूल देशांतर्गत उत्पाद यामधील स्थूल म्हणजेच एकूण आणि देशांतर्गत म्हणजेच आर्थिक प्रक्षेत्र किंवा भौगोलिक सीमा रेषेच्या आतील संपूर्ण प्रदेश होय. देशातील भौगोलिक सीमारेषेच्या आत अनेक उत्पादन संस्था या कार्यरत असतात. या सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची एकूण म्हणजेच देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. यावरून स्थूल देशांतर्गत उत्पाद (Gross Domestic Product ) म्हणजेच दिलेल्या वर्षात देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात किंवा भौगोलिक सीमा रेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य होय. GDP काढण्याकरिता पुढील सूत्राचा वापर केला जातो :

  • GDP = उपभोग खर्च + गुंतवणूक खर्च+ सरकारी खर्च+(निर्यात- आयात)

GDP हा एखाद्या अर्थव्यवस्थेची एकूण अंतर्गत शक्ती दाखवत असते. GDP मुळे अर्थव्यवस्थेचे फक्त संख्यात्मक आकलन होते, गुणात्मक होत नसते. भारतामध्ये आर्थिक वर्ष हे १ एप्रिल ते ३१ मार्च असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याकरिता सुद्धा हाच कालावधी गृहीत धरल्या जातो. GDP ची आकडेवारी ही स्थिर किंमतीला तसेच बाजार किंमतीला सुद्धा दिलेली असते.

निव्वळ देशांतर्गत उत्पाद (Net Domestic Product) :

देशाच्या आर्थिक क्षेत्र किंवा भौगोलिक सीमारेषेच्या सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील बाजारभावाला मोजलेल्या निव्वळ मूल्यवर्धितांच्या बेरजेला निव्वळ देशांतर्गत उत्पाद असे म्हणतात. आपण वर स्थूल देशांतर्गत उत्पाद बघितलं त्यामधून घसारा वजा केला असता आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादप्राप्त होते. निव्वळ देशांतर्गत उत्पाद काढण्याकरिता पुढील सूत्राचा वापर केला जातो:

  • NDP = GDP – घसारा

स्थूल राष्ट्रीय उत्पाद ( Gross National Product) :

GDP मध्ये देशांतर्गत या शब्दाचा समावेश आहे .त्या देशांतर्गत शब्दा ऐवजी येथे राष्ट्रीय या शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. देशांतर्गत म्हणजेच भौगोलिक सीमेच्या आत कमावलेले उत्पन्न गृहीत धरले जाते. देशांतर्गतमध्ये देशातील निवासी तसेच गैरनिवासीना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा विचार केला जातो. या उलट राष्ट्रीय या संकल्पनेमध्ये भौगोलिक सीमेच्या आत कमावलेल्या उत्पन्नापेक्षा केवळ देशातील नागरिकांनी कमावलेले उत्पन्न अभिप्रेत आहे. आपल्या देशामध्ये परदेशी नागरिक सुद्धा उत्पन्न कमावत असतात, तसेच आपल्या देशातील नागरिक सुद्धा परदेशामध्ये जाऊन उत्पन्न कमावत असतात. तर राष्ट्रीय उत्पाद काढण्याकरिता आपल्या देशातील नागरिकांनी देशांतर्गत कमावलेले घटक उत्पन्न हे एकूण उत्पन्ना मधून वजा केले जाते, तर आपल्या देशातील नागरिकांनी परदेशामध्ये कमावलेले उत्पन्न हे मिळवले जाते. म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पादाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली जाते. स्थूल राष्ट्रीय उत्पाद (Gross National Product) म्हणजे देशाच्या सामान्य नागरिकांनी देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातून तसेच परदेशातून कमावलेल्या निव्वळ घटक उत्पन्नाची बेरीज होय. GNP मोजण्याकरिता पुढील सूत्राचा वापर केला जातो:

  • GNP = GDP + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न

GDP मुळे जसे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते, तर GNP मुळे अर्थव्यवस्थेचे गुणात्मक आकलन होत असते. GDP सोबतच GNP मोजल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बहिर्गत शक्तीचे आकलन होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : भारतातील दारिद्र्य भाग- ३

निव्वळ राष्ट्रीय उत्पाद (Net National Product) :

आपण आधी बघितल्याप्रमाणे GDP वरून NDP काढायचा असल्यास आपण GDP मधून घसारा वजा केला होता, त्याचप्रमाणे GNP वरून निव्वळ राष्ट्रीय उत्पाद (NNP) काढायचे असल्यास GNP मधून घसारा वजा केला जातो. NNP काढण्याकरिता पुढील सूत्राचा वापर केला जातो:

  • NNP = GNP – घसारा

निव्वळ उत्पन्न काढल्यामुळे एखाद्या देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो याचा अंदाज येतो.