सागर भस्मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सार्वजनिक कर्जाचे वर्गीकरण हे सार्वजनिक कर्जाची रक्कम, हेतू, कालावधी, चलन व्यवस्था, कर्ज देण्याच्या पद्धती, कर्ज देणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व, व्याजाचा दर, कर्जाचा विनियोग, कर्ज परतफेडीचे स्वरूप, इत्यादी मुद्द्याच्या साहाय्याने करता येते. सार्वजनिक कर्जाचे प्रकार हे पुढील प्रमाणे आहेत.
१) अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज :
राष्ट्रातील व्यक्ती, वित्तीय संस्था, बँका, उद्योजक, अन्य सामाजिक संस्थांकडून शासनाने घेतलेले कर्ज म्हणजे अंतर्गत कर्ज होय. या उलट परकीय राष्ट्रे, परकीय उद्योजक, विदेशी वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून शासनाने घेतलेले कर्ज म्हणजे बाह्य कर्ज होय.
२) ऐच्छिक कर्ज व सक्तीचे कर्ज :
ज्यावेळी व्यक्ती अगर अन्य संस्था स्वच्छेने सरकारला कर्ज देते, त्यावेळी त्यास ऐच्छिक कर्ज म्हणतात. त्या उलट जेव्हा कायद्याच्या आधारे आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्रहितासाठी जनतेवर कर्ज देण्याची सक्ती केली जाते, त्यावेळी त्यास सक्तीचे कर्ज म्हणतात.
३) उत्पादक कर्ज व अनुत्पादक कर्ज :
ज्यावेळी जनकल्याण संगोपन आणि संवर्धनासाठी कर्जाचा विनियोग केला जातो (उदा. दळणवळण, रस्ते, पूल, कालवे, वीज निर्मिती, इत्यादी ) त्यावेळी त्यास उत्पादक कर्ज असे म्हणतात. त्याउलट ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, दुष्काळाचे तात्काळ परिणाम, युद्धे, इत्यादीचे परिमार्जन करण्यासाठी कर्ज वापरली जातात, त्यावेळी त्यास अनुत्पादक कर्ज असे संबोधले जाते. पण दीर्घकालाचा विचार केला असता प्रत्येक कर्ज उत्पादक असते, असे म्हणावे लागेल.
४) संचित आणि प्रवाही कर्जे:
संचित कर्जास दीर्घकालीन कर्ज असे म्हणतात. या कर्ज व्यवहारात धनको व ऋणको यामध्ये कर्जाचा हेतू, काल, ठिकाण , व्याजदर, कर्ज परतफेडीचे स्वरूप, इत्यादींबाबत करार केला जातो. त्याउलट प्रवाही कर्जे सामान्यपणे अल्पमुदतीचे असतात. या कर्जाच्या परतफेडीबाबत कर्जाचे नूतनीकरण केले जाऊ शकते.
५) अल्प मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे :
सामान्यतः १५ महिन्यांपेक्षा कमी मुदतीचे कर्ज ही अल्पमुदतीची आणि १५ महिने ते पाच वर्षापर्यंतची मध्यम मुदतीची आणि पाच वर्षापेक्षा अधिक मुदतीची दीर्घ मुदतीची कर्जे असतात. ही कर्जे राष्ट्राच्या गरजेच्या संख्येप्रमाणे किंवा तीव्रतेनुसार उभारली जातात.
सार्वजनिक कर्जाचे परिणाम :
- सार्वजनिक कर्ज उभारणी करून देशात शेती, उद्योग, व्यापार अन्य क्षेत्रात गुंतवणूक होते. एकूण उत्पादन वाढीस प्रेरणादायी परिस्थिती निर्माण होते. अर्थव्यवस्था गतिमान बनते.
- सार्वजनिक कर्ज उभारणी रोखे स्वरूपात असेल तर अधिक प्रमाणात रोखता निर्माण होते.
- विकासाभिमुख अर्थरचनेतील कर्ज उभारणीसाठी ज्या विविध सेवा सुविधा पुरविल्या जातात, ज्या सवलती दिल्या जातात, त्या पार्श्वभूमीवर पैशांची रोखता वाढते.
- गुंतवणूक क्षेत्रे अर्थक्षम बनतात. उपलब्ध साधनसंपत्तीचा महत्त्वम वापर होतो.
- रोजगार संधी प्राप्त होते आणि आर्थिक समतोलपणा प्रस्थापित होऊ शकतो.
- बाह्य कर्जाचे काही दुष्परिणामही दिसून येतात जसे की, आंतरराष्ट्रीय व्यापारात असमतोलपणा निर्माण होतो. कारण कर्ज परत करण्याकरिता आंतरराष्ट्रीय चलनाचा वापर करावा लागतो. देशाचे परराष्ट्रीय व्यवहारातील वजन कमी होते म्हणजेच आर्थिक व्यवहारातील पत कमी होते.