सागर भस्मे

मागील लेखातून आपण उद्योग म्हणजे नेमकं काय? तसेच भारतातील औद्योगिक विकासाची सुरुवात कशी झाली? याविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण अर्थव्यवस्थेमधील उद्योगांचे महत्त्व, त्यांची अर्थव्यवस्थेमधील भूमिका, तसेच उद्योगांच्या वर्गीकरणाविषयी जाणून घेऊया.

India Manufacturing PMI Hits Six-Month High in January
अर्थव्यवस्थेसाठी सुसंकेत, उत्पादन क्षेत्राला जानेवारीत दमदार गती; ‘पीएमआय’ सहा महिन्यांच्या उच्चांकी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
China obstacle to becoming the world manufacturing hub
जगाचे उत्पादन केंद्र बनण्यात चीनचा अडसर
Economic Survey FY 2025-26 India GDP Growth Rate
केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून चालू वर्षाचा आर्थिक विकास दर जाहीर; संसदेत पाहणी अहवाल सादर
Declining financial and government credibility
घसरण आर्थिक आणि सरकारच्या विश्वासार्हतेचीही!
Life in an IIT | Accessible buildings, transformative experience: Here’s journey of Pune boy to IIT Bombay
‘हारा वही, जो लड़ा नही’ पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास ऐकून थक्क व्हाल
abscond criminal detained under mpda act
‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरारी झालेल्या गुंडाला अटक; कारवाई टाळण्यासाठी डोंगरात वास्तव्य
What Are the Most Popular Jobs Worldwide_
जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नोकऱ्या कोणत्या? नवीन सर्वेक्षण काय सांगते?

अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगांचे महत्त्व आणि भूमिका :

अर्थव्यवस्थांमध्ये अलीकडे जगाने जी प्रचंड प्रगती साधलेली आहे, त्याचे श्रेय हे उद्योग आणि औद्योगिकीकरणाला दिले जाते. अर्थव्यवस्थेमधील साधारणतः द्वितीयक क्षेत्राला उद्योग क्षेत्र असे संबोधले जाते. अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असते. आर्थर लेविस यांनी त्यांच्या लेविस प्रतिमानामध्ये सांगितल्याप्रमाणे कृषी आधारित समाजातील जे जास्तीचे अतिरिक्त श्रम असते, हे सामावून घेण्याची मोठी क्षमता ही फक्त उद्योगांमध्ये असते. तसेच उद्योगाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमधील रोजगार निर्मितीचे नवीन व शाश्वत साधन प्राप्त होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : उद्योग म्हणजे नेमकं काय? भारतात औद्योगिक विकासाची सुरुवात कधी झाली?

उद्योगांमध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतला जातो. जसे की- अशी पडीक जमीन जी कृषी क्षेत्राच्या उपयोगाची नसते, त्यांचा वापर उद्योगाकरिता करण्यात येतो. ज्या पडीक जमिनीला काहीच महत्त्व नसते, अशा स्त्रोतांना उद्योगांमुळे महत्त्व प्राप्त होते. अशा क्षेत्रामध्ये उद्योगांचा विकास झाल्याने तेथील प्रदेशाचासुद्धा विकास होतो. उद्योगांमध्ये जसजशी वाढ होते, त्याचप्रमाणे लोकांच्या उत्पन्नामध्येसुद्धा वाढ होताना दिसते. विकसित देशांचा विचार केला तर औद्योगिकीकरण झालेल्या देशांमधील लोकांचे दरडोई उत्पन्न हे सर्वाधिक भरते, तर विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये उत्पन्नाचा स्तर वाढवून दारिद्र्य दूर करण्यामध्ये उद्योग हा कारणीभूत ठरतो. तसेच उद्योगांचा विकास झाल्याने मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती होऊ लागते. अशा भांडवल निर्मितीमधून बचतीचे प्रमाण वाढते आणि गुंतवणुकीला चालना मिळून गुंतवणुकीचे प्रमाण वाढीस लागते.

उद्योगांचे वर्गीकरण :

उद्योगांचे वर्गीकरण हे विविध आधारांवर करण्यात येते. जसे की उद्योगाची मालकी उत्पादनाचा स्तर, उद्योगांमध्ये निर्माण होणाऱ्या मालाच्या वापरावरून अशा विविध आधारांवर उद्योगांचे वर्गीकरण करण्यात येते. असे विविध प्रकारचे वर्गीकरण आपण पुढे बघणार आहोत.

१) आर्थिक व्यवहारांच्या गटानुसार उद्योगांचे वर्गीकरण :

आर्थिक व्यवहारांचे वर्गीकरण हे मुख्यत्वे तीन विभागांमध्ये करण्यात येते; ते म्हणजे प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक विभाग. असे वर्गीकरण हे मुख्यत्वे या विभागांमधील उत्पादनाचे स्वरूप, त्यामधील मानवी श्रमाचा भाग या दोन गोष्टी लक्षात घेऊन करण्यात येते.

प्राथमिक विभाग : यामध्ये कृषी उद्योग, खाणकाम उद्योग, मासेमारी इत्यादींचा समावेश होतो. म्हणजेच यामध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या स्त्रोतांवर प्रक्रिया न करता केलेल्या उद्योगांचा समावेश होतो. अशा उद्योगांमध्ये मालावरील प्रक्रियांमध्ये मानवी श्रमाचा भाग हा मर्यादित असतो.

द्वितीयक विभाग : यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रक्रिया करून तिचे उपभोग्य व पुढील टप्प्याच्या वस्तूंच्या उत्पादनास वापरायोग्य असे रूपांतर केले जाते. या विभागामध्ये इतर आर्थिक व्यवहारांसोबतच अवजड उद्योग, भांडवली उद्योग, उपभोग्य वस्तूंचे उद्योग, कुटीरउद्योग, हस्तव्यवसाय, लघुउद्योग यांचाही समावेश होतो. या विभागामधील उद्योगातील मालाच्या उत्पादनामध्ये मानवी प्रयत्नांचा वाटा हा मोठा असतो.

तृतीयक विभाग : यामध्ये सेवा, वाहतूक, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. म्हणजेच विविध सेवा तसेच चैनीच्या वस्तूंचा मुख्यत्वेकरून यामध्ये समावेश होतो.

२) उद्योगांच्या मालकीवरून वर्गीकरण :

उद्योगांच्या मालकीच्या आधारावर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, खासगी क्षेत्रातील उद्योग व संयुक्त क्षेत्रातील उद्योग असे वर्गीकरण करण्यात येते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये संपूर्ण मालकी ही सरकारकडे असते. यामध्ये मुख्यत्वे संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले उद्योग, त्याचबरोबर आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे तसेच अत्यावश्यक वस्तूंचे उद्योग इत्यादी उद्योगांचा समावेश सार्वजनिक उद्योगांमध्ये होतो. खासगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये संपूर्ण मालकी खासगी व्यक्तीकडे असते; तसेच मालकीसोबतच व्यवस्थापन, नियमन सर्व त्या व्यक्तींकडेच असते. तर संयुक्त क्षेत्रातील उद्योग यामध्ये उद्योगाची मालकी ही काही प्रमाणात सरकारकडे असते, तर काही प्रमाणामध्ये खासगी क्षेत्राकडे असते. ही मालकी सरकार व परकीय खासगी कंपनी यांमध्येसुद्धा असू शकते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील नियोजनात कोणत्या त्रुटी आढळतात? यावर सरकारने कशा प्रकारे मात करण्याचा प्रयत्न केला?

३) भांडवलाच्या प्रमाणावरून वर्गीकरण :

उद्योगांमध्ये गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणावरूनसुद्धा उद्योगांचे भांडवलप्रधान व श्रमप्रधान असे वर्गीकरण करण्यात येते. भांडवलप्रधान उद्योगांमध्ये उत्पादन क्रियेमध्ये यंत्रसामग्रीचा प्रामुख्याने उपयोग केला जातो, तर मानवी श्रमाचा भाग यामध्ये दुय्यम ठरतो. सहाजिकच यामध्ये रोजगारीचे उपलब्धतेचे प्रमाण कमी असते. श्रमप्रधान उद्योग उत्पादन प्रक्रियेमध्ये यंत्रसामग्रीचा उपयोग मर्यादित स्वरूपाचा असून मानवी श्रमाचा भाग हा प्रमुख असतो. त्यामुळे अशा उद्योगांमध्ये रोजगार निर्मितीला जास्त वाव असतो.

४) उद्योगांमधील उत्पादनाच्या प्रमाणावरून वर्गीकरण :

उद्योगांमधील उत्पादन होणाऱ्या मालाचे प्रमाण व त्यामधील उत्पादन तंत्र यावरून संघटित मोठे उद्योग, कुटीर उद्योग, लघुउद्योग व हस्त उद्योग असे वर्गीकरण केले जाते. संघटित मोठ्या उद्योगांमध्ये यंत्राच्या सहाय्याने मालाचे उत्पादन होते व हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असते. कुटीर उद्योग व लघु उद्योगांमध्ये यंत्र निर्मिती उत्पादनाचा भाग भरीव नसतो व यामधील उत्पादनाचे प्रमाण कमी प्रमाणात असते. तसेच हस्त व्यवसायामध्ये कारागिराच्या कौशल्याला प्रमुख स्थान असते.

५) उद्योगांमधील उत्पादनाच्या आकारमानावरून, वजनावरून वर्गीकरण:

उद्योगांमधील उत्पादित होणाऱ्या मालाच्या आकारावरून, वजनावरून अवजड व उपभोग्य वस्तू उद्योग असे वर्गीकरण करण्यात येते. अवजड उद्योगांमध्ये निर्माण होणारा माल हा आकाराने मोठा व वजनाने जास्त असून साधारणतः यंत्रसामग्रीचा माल यामध्ये निर्माण करण्यात येतो. तर उपभोग्य वस्तू उद्योगांमध्ये उपभोग्य गोष्टींच्या मालाचीच निर्मिती करण्यात येते. याचे आकारमान व वजन सौम्य प्रकारचे असते.

Story img Loader