सागर भस्मे

मागील लेखातून आपण आपण कर म्हणजे काय? तसेच ‘लाफर वक्ररेषा’ संकल्पना नेमकी काय आहे? याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण कराशी संबंधित विविध संकल्पनांबाबतची माहिती जाणून घेऊ या.

Image of Dr. Manmohan Singh
World On Manmohan Singh Death : “आर्थिक सुधारणांचे शिल्पकार ते अनुत्सुक पंतप्रधान”, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जागतिक माध्यमांची प्रतिक्रिया
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
indian express thinc our cities event
सहज, स्वस्त तंत्रज्ञानाची गरज ; इंडियन एक्सप्रेसच्या ‘थिंक – सिटीज’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत
MPSC GR
MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारच्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
pune Wachan Sankalp Maharashtra activity held from January 1 to 15 to promote book reading
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा नवा उपक्रम; १ ते १५ जानेवारी दरम्यान होणार काय?

कर आघात आणि कर बोजा

‘कर आघात’ त्या व्यक्तीवर होतो; ज्या व्यक्तीवर शासन प्रत्यक्षात कर आकारते किंवा जी व्यक्ती शासनाकडे प्रत्यक्षात कर भरते. तर ‘कर बोजा’ अशा व्यक्तीवर असतो; ज्या व्यक्तीवर शासन प्रत्यक्षात कर आकारत नसते किंवा त्याला तो भरणे अनिवार्यसुद्धा नसते. परंतु, ज्या व्यक्तीवर कर आकारलेला असतो, ती व्यक्ती हा कर ज्या व्यक्तीच्या खिशातून वसूल करते, त्या व्यक्तीवर कराचा बोजा असतो. जर प्रत्यक्ष कराचा विचार केला, तर ज्याच्यावर ‘कर आघात’ असतो, त्यालाच तो कर भरावा लागतो. परंतु, अप्रत्यक्ष कर जर लागू असेल, तर कराची वसुली मात्र दुसऱ्या व्यक्तीकडून केली जाते. म्हणजेच कर हा एकीकडून दुसऱ्याकडे संक्रमित करून वसूल केला जातो.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थव्यवस्था : चलनवाढ कमी करण्याचे उपाय कोणते?

सामान्यतः ‘कर आघात’ उत्पादकावर लागू असतो; तर ‘कर बोजा’ ग्राहकांवर लागू होतो. कर आघात हा कर संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा असतो म्हणजेच तो दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित केल्या जाऊ शकतो. तर कर बोजा हा कर संक्रमणाचा अंतिम टप्पा असतो.

प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर

प्रत्यक्ष कर असा कर असतो की, तो ज्या व्यक्तीवर आकारला जातो, ती व्यक्ती स्वतः त्याच्या खिशातून कर हा भरत असते. प्रत्यक्ष कर हा अहस्तांतरीय असतो. म्हणजेच तो दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित केला जाऊ शकत नाही. प्रत्यक्ष करामध्ये ‘कर आघात’ आणि ‘कर बोजा’ एकाच व्यक्तीवर पडतो. उदा. आयकर, निगम कर, संपत्ती कर, जमीन महसूल व व्यवसाय कर.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थव्यवस्था : चलनवाढ कमी करण्याचे उपाय कोणते?

अप्रत्यक्ष करामध्ये कर आघात’ आणि कर बोजा हे वेगवेगळ्या व्यक्तीवर पडत असतात. शासन कर आकारते एका व्यक्तीवर; पण दुसऱ्याच व्यक्तीच्या खिशातून तो वसूल केला जातो. अप्रत्यक्ष कर हा हस्तांतरीय कर असल्यामुळे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित केला जाऊ शकतो. अप्रत्यक्ष करामध्ये अंतिम करभार हा ग्राहकांवर पडत असतो. उदा. अबकारी कर, सीमा शुल्क, वस्तू व सेवा कर इत्यादी. अप्रत्यक्ष कररचना ही साखळीरूप असल्याकारणाने हे कर टाळता येऊ शकत नाहीत.

प्रगतिशील कर, प्रतिगामी कर व प्रमाणशीर कर

‘प्रगतिशील कर’ म्हणजे व्यक्तीची उत्पन्न पातळी जसजशी वाढत जाईल, तसतशी करदेयतेचे प्रमाणसुद्धा वाढत जाईल. उदा. आयकर. जर उत्पन्न पातळी आणि करदेयता समान प्रमाणात वाढत असतील, तर त्याला ‘प्रमाणशीर कर’ असे म्हणतात. उदा. महामंडळ कर. जर उत्पन्नाची पातळी ही वाढत असेल आणि करदेयतेचे प्रमाण कमी-कमी होत असेल, तर त्याला ‘प्रतिगामी कर’ असे म्हणतात. जवळपास सर्वच अप्रत्यक्ष कर हे प्रतिगामी स्वरूपाचे असतात, त्यामध्ये विक्री कर, सेवा कर, उत्पादन शुल्क इ. प्रतिगामी कर आहेत.

अधिभार आणि उपकर

अधिभार हा एक प्रकारचा जास्तीचा कर असतो. तो सर्व व्यक्तींवर आकारला जात नाही. केवळ ज्यांचे उत्पन्न एक कोटीपेक्षा जास्त आहे, त्यांच्यावरच ‘अधिभार कर’ आकारला जातो. हा कर उत्पन्नावर आकारला जात नसून, जेवढा एकूण कर भरावयाचा आहे, त्या कराच्या प्रमाणावर आकारला जातो.

उपकर म्हणजे करावर कर. करावर कर म्हणजेच कर आणि अधिभार या दोघांवर हा उपकर आकारला जातो. उपकर हा एक विशिष्ट हेतू साध्य करण्याकरिता शासनाद्वारे आकारला जात असतो. जसे की शिक्षण आणि आरोग्य याकरिता चार टक्के उपकर आकारला जातो आणि तो प्रत्येक करदात्याला भरणे अनिवार्य असते.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होतो?

मूल्यवर्धित कर आणि अमूल्यवर्धित कर

मूल्यवर्धित म्हणजेच मूल्य; जे वाढत जाते. एखाद्या वस्तूचे उत्पादन होत असताना अनेक घटक त्यात सहभागी होत असतात, त्या प्रत्येक उत्पादन घटकावर जर कर आकारला जात असेल, तर त्याला ‘मूल्यवर्धित कर’ असे म्हटले जाते. त्यामध्ये कर अनेक ठिकाणी गोळा केला जातो. उदा. जीएसटी वगळता सध्याचे सर्व अप्रत्यक्ष कर. अमूल्यवर्धित कर म्हणजेच उत्पादन होत असताना प्रत्येक उत्पादन घटकावर कर न आकारता, शेवटी उत्पादनाच्या अंतिम टप्प्यावर म्हणजेच एकूण मूल्यावर हा कर आकारला जातो. म्हणजेच हा कर एकाच ठिकाणी गोळा केला जातो. परंतु, या करप्रणालीमुळे धबधबा परिणाम निर्माण होऊन कराचा संपूर्ण बोजा हा ग्राहकांवर पडतो. उदा. जीएसटी.

अमूल्यवर्धित करप्रणाली ही तुलनेने स्वस्त करप्रणाली आहे; परंतु या करप्रणालीमुळे धबधबा परिणाम निर्माण होतो. मूल्यवर्धित करप्रणाली मात्र तुलनेने खर्चिक आहे. या प्रणालीमुळे वस्तू स्वस्त होतात आणि धबधबा परिणाम टाळता येतो. त्यामुळे लोकांची खरेदी शक्तीसुद्धा वाढते.

Story img Loader