सागर भस्मे

मागील लेखातून आपण चलनवाढ ही संकल्पना नक्की काय आहे? आणि चलनवाढीचे प्रकार नेमके कोणते? याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण चलनवाढ निर्माण होण्याकरिता कोणते घटक कारणीभूत ठरतात याबाबत सविस्तर जाणून घेऊया…

nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
Bullet train
महसूल आणि खर्च: देखाव्यापेक्षा सुधारणा हव्या आहेत…
Science Technology Budget 2025 Nuclear Energy
विज्ञान तंत्रज्ञान: हवेतले इमले
Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
review of impact on india stock market and economy after donald trump comes to power
Money Mantra : ट्रंप यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे आपलं आयुष्य का बदलणार?

अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ घडून येण्यास विविध गोष्टी कारणीभूत असतात. काही प्रत्यक्ष, तर काही अप्रत्यक्षरित्या चलनवाढ होण्यास मदत करतात. विविध कारणांच्या एकत्रित परिणामामुळे चलनवाढ घडून येते. मुख्यतः त्यापैकी दोन कारणे ही अतिमहत्त्वाची आहेत. एक म्हणजे वस्तू व सेवांच्या पुरवठ्यामध्ये कमी आली असता महागाई वाढते, तर दुसरे म्हणजे वस्तू व सेवांच्या मागणीमध्ये जर वाढ होत असेल तरीसुद्धा महागाईचे प्रमाण वाढते.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थव्यवस्था : चलनवाढ म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते?

एखाद्या वस्तूची मागणी वाढत असेल आणि त्या वस्तूचे उत्पादन बाजारामध्ये कमी असेल तर सहाजिकच त्या वस्तूची किंमत वाढवली जाते. यावरून एक बाब लक्षात येते, एकीकडे मागणीमध्ये वाढ होत आहे तर दुसरीकडे पुरवठ्याची कमतरता भासत आहे. अशा या एकत्रित परिणामामुळे महागाई वाढते. म्हणजेच या दोन्ही बाबींचा एकत्रित परिणाम हा महागाई वाढण्यास कारणीभूत ठरतो. मागणी वाढत असेल आणि त्याच प्रमाणात पुरवठ्यामध्ये वाढ होत असेल तर ही समस्या उद्भवू शकत नाही. परंतु, मागणीच्या प्रमाणामध्ये पुरवठ्याचे प्रमाण वाढविणे ही अतिशय अवघड बाब आहे.

चलनवाढीचे दोन मुख्य प्रकार आहेत. १) खर्चदाबजन्य चलन वाढ आणि २) मागणी ताणजन्य चलनवाढ

१) खर्चदाबजन्य चलनवाढ :

आपण ही संकल्पना एका उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक कपड्याचे दुकान आहे, त्यामध्ये कपडे विक्रीला आहेत. त्या कपड्याची अंतिम किंमत ही जरी तो दुकानवाला ठरवत असेल, तरी ते कापड त्या दुकानांमध्ये विक्रीकरिता येईपर्यंत त्याला लागणाऱ्या खर्चावरून त्या कापडाची किंमत ही ठरली असते. आता हे कापड शेतामधून कारखान्यापर्यंत, कारखान्यापासून दुकानांमध्ये विक्रीकरिता येईपर्यंत त्याच्या पुरवठ्यामध्ये कपात झाली असेल किंवा त्यांच्या पुरवठा खर्चामध्ये वाढ झाली असेल तर सहाजिकच त्या कपड्याची किंमत ही वाढते. म्हणजेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दुकानापर्यंत कापड येईपर्यंत जी किंमत वाढणारी कारणं असतात, त्या कारणांना ‘खर्चदाबजन्य कारणे’ असे म्हटले जाते. ही कारणे किंमत वाढ पुढे ढकलण्याचे काम करते. तसेच या कारणांना Suply Side कारणे असेसुद्धा म्हटले जाते.

खर्चदाबजन्य चलनवाढीची कारणे :

नैसर्गिक संकट : कोणत्याही वस्तूचे उत्पादन होण्याकरिता कच्च्या मालाची आवश्यकता असते. जर कुठलेही नैसर्गिक संकट उद्भवले, म्हणजेच दुष्काळ, भूकंप, त्सुनामी यांसारखे संकट उद्भवले तर त्याचा परिणाम हा शेतीवर होतो. बहुतांश व्यवसाय हे शेतीवर अवलंबून आहेत. म्हणजेच अन्नधान्यसारख्या जीवनावश्यक वस्तूंचीसुद्धा टंचाई उद्भवू शकते. अशा कारणांमुळे उत्पादनामध्ये घट निर्माण होते. या अशा परिस्थितीचा परिणाम म्हणजेच वस्तूंच्या किमती वाढतात.

अपुरी औद्योगिक वाढ : एखाद्या औद्योगिक वस्तूची मागणी ही वाढत आहे. परंतु, त्या प्रमाणात औद्योगिक उत्पादनाची वाढ पुरेशी होत नाही. याकरिता अनेक घटक कारणीभूत आहेत. पारंपरिक उत्पादन पद्धती, प्रचंड कामगारांचा पुरवठा असूनही अकुशल कामगारांचे प्रमाण हे जास्त असणे, तंत्रज्ञानाचा अभाव असणे अशा अनेक कारणांमुळे आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये वस्तू निर्मिती खर्चिक बनत असते. म्हणून औद्योगिक प्रगती ही जरी अपुरी असेल, तर हे सुद्धा खर्च दाबजन्य चलनवाढीचे कारण आहे.

अपुऱ्या पायाभूत सुविधा : औद्योगिक प्रगतीचे प्रमाण कमी असण्यामागे पायाभूत सुविधांची कमतरता हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे. पायाभूत सुविधा यामध्ये अविकसित रस्ते तसेच वाहतूक सुविधा अशा विविध बाबींचा समावेश होतो. अशा या अपुर्‍या पायाभूत सुविधांमुळे वस्तूंची निर्मिती खर्चिक होत असते. त्यामुळे त्या वस्तू महाग होत जातात. त्याचाच परिणाम म्हणजे चलनवाढ होते.

निर्यात : खर्च दाबजन्य चलनवाढ होण्यामध्ये निर्यातसुद्धा कारणीभूत ठरते. जर एखाद्या देशी वस्तूची निर्यात होत असेल, तर त्याचा तुटवडा हा देशांतर्गत निर्माण होऊ शकतो. हा तुटवडा निर्माण झाला असता, त्या वस्तूची किंमत ही वाढत राहते. ती वस्तू महाग होते आणि भाववाढ निर्माण होते.

सट्टेबाजी आणि साठेबाजी : चलनवाढ होण्यामागे हे सुद्धा एक मोठे कारण आहे. मोठे व्यापारी तसेच कारखानदार हे एखाद्या वस्तूची साठवणूक करून मुद्दाम टंचाई निर्माण करतात. ती टंचाई निर्माण झाल्याने त्या वस्तू महाग होतात. परिणामतः त्या व्यापाऱ्यांना तसेच कारखानदारांना त्या भाववाढीचा फायदा होतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : चलनपुरवठा भाग- २

२) मागणी ताणजन्य चलनवाढ

वर बघितल्याप्रमाणे साधारणतः एखाद्या वस्तूची किंमत ही त्याच्या पुरवठा साखळीवरून ठरते. परंतु, एखाद्या वस्तूची किंमत ही विक्रेता आणि ग्राहकांच्या मागणीवरूनही ठरू शकते. कारण जर एखाद्या वस्तूची मागणी ही अतिरिक्त वाढत असेल, तर विक्रेता हा त्या वस्तूची किंमत वाढवतो. म्हणजेच एक प्रकारे ग्राहक हा स्वतःहून किंमत वाढवून घेतो. अशा या किंमत वाढीच्या कारणांना ‘मागणी ताणजन्य कारण’ असे म्हणतात. तसेच याला Demand Side कारणे असेसुद्धा म्हणतात.

मागणी ताणजन्य चलनवाढीची कारणे

खासगी खर्चात वाढ : समजा लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असेल, तर त्यांच्या हातातील पैसा वाढतो. हातातील पैसा वाढल्यामुळे खर्च करण्याची प्रवृत्ती ही वाढीस लागते. याचा परिणाम म्हणून वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ होते आणि त्याचा परिणाम म्हणून त्या वस्तू महाग होतात.

शासकीय खर्चात वाढ : शासन हे विकास घडवून आणण्याकरिता अनेक गोष्टींवर खर्च करीत असते. दरवर्षी नवीन-नवीन योजना राबवते. या योजनांवर केलेल्या खर्चामुळे सामान्य जनतेच्या हातामध्ये पैसा वाढू लागतो. पैसा वाढल्याने तो इतर गोष्टींमध्ये खर्च करण्याकडे भर देऊ लागतो. याचाच परिणाम म्हणून मागणीमध्ये वाढ होते. मागणीमध्ये वाढ झाली म्हणजेच महागाईमध्येसुद्धा वाढ होते.

परकीय गुंतवणूक : परकीय गुंतवणूक हीसुद्धा मागणी ताणजन्य चलनवाढीस कारणीभूत ठरते. कारण परकीय गुंतवणुकीमुळे देशांमधील पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. पुरवठ्यामध्ये वाढ झाल्याने त्याचाच परिणाम म्हणून मागणीमध्येसुद्धा वाढ होते आणि चलनवाढ होण्यास सुरुवात होते.

पतनिर्मिती : पतनिर्मितीमध्ये वाढ होत असेल तर त्याचा परिणाम चलनवाढीमध्येसुद्धा होतो. अशा पतनिर्मितीने सामान्य लोकांनासुद्धा कर्जे उपलब्ध होतात. त्यामुळे लोकांकडील पैसा वाढतो. त्याचा परिणाम म्हणून मागणीमध्ये वाढ होते आणि किमती वाढतात.

लोकसंख्या वाढ : लोकसंख्या वाढ हीसुद्धा चलनवाढ होण्याकरिता कारणीभूत ठरते. कारण जर मागणारे हात जास्त असतील, तर वस्तूच्या मागणीमध्येसुद्धा वाढ होते आणि त्याचाच परिणाम म्हणून वस्तू महाग होतात. आपल्या भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर जास्त असल्यामुळे या वाढीच्या तुलनेत स्त्रोत अपुरे पडतात. त्यामुळे महागाई वाढते.

Story img Loader