सागर भस्मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपण ‘वित्तीय प्रशासन’ या लेखामध्ये तुटीचे अंदाजपत्रक हा घटक बघितला. तुटीच्या अंदाजपत्रकामध्ये उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असतो हेही बघितले. आज आपण त्यासंबंधितच तुटीच्या विविध संकल्पना जाणून घेऊ या. तुटीच्या विविध संकल्पना त्या केवळ सैद्धांतिकदृष्ट्याच नव्हे तर व्यावहारिकदृष्ट्याही महत्त्वाच्या ठरतात. तुटीचे प्रमाण जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच तुटीचे स्वरूपही महत्त्वाचे असते.
तुटीचे प्रकार
१) महसुली तूट : महसुली उत्पन्नापेक्षा जेव्हा महसुली खर्च अधिक असतो, तेव्हा महसुली तूट निर्माण होते. महसुली खर्च मुख्यत्वे शासनाच्या चालू खर्चाचा भाग असतो. शासनाची वार्षिक देणी यातून स्पष्ट होतात. हा खर्च एका अर्थाने शासन चालवण्याचा खर्च म्हणता येईल. महसुली उत्पन्नात कर उत्पन्न आणि करोत्तर उत्पन्नाचा समावेश होतो. महसुली तूट बऱ्याच प्रमाणात वित्तीय बेशिस्त दर्शवते. ही तूट चिंतेचे कारण असते. अशी तूट असण्यापेक्षा शिल्लक असणे हे कार्यक्षमतेचे दर्शक आहे.
- महसुली तूट = महसुली खर्च – जमा
२) भांडवली खात्यावरील तूट : भांडवली खर्च भांडवली उत्पन्नापेक्षा जेवढा अधिक असतो, तेवढी भांडवली खात्यावर तूट असते. भांडवली खात्यावरील तूट ही विकासाच्या प्रारंभीच्या टप्प्यात आवश्यक व अपरिहार्य असते. ही गुंतवणूक असल्याने भांडवली खात्यावरील तूट चिंतेची बाब नाही. जर भांडवली तूट फार मोठी व सतत राहिली तरच त्यातून भाववाढीचा धोका असतो.
- भांडवली तूट = भांडवली खर्च – भांडवली जमा
३) अंदाजपत्रकीय तूट : बऱ्याच वेळा अंदाजपत्रकीय तूट व राजकोषीय तूट यामध्ये फरक केला जात नाही. वास्तविक अंदाजपत्रकीय तूट ही संकल्पना राजकोषीय तुटीच्या संकल्पनेपेक्षा भिन्न आहे. राजकोषीय तूट ही व्यापक संकल्पना आहे. अंदाजपत्रकीय तूट यामध्ये महसुली तूट व भांडवली तूट यांची बेरीज असते. १९९६-९७ पासून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात ही तूट शून्य दाखवली जाते. अंदाजपत्रकीय तूट ही लोकांच्या हातातील चलनपुरवठा किंवा क्रयशक्ती किती प्रमाणात वाढवली, हे स्पष्ट करते. परंतु भारतात रिझर्व बॅंकेकडून अधिक मुदतीच्या उचली केंद्र सरकार घेते, ते यामध्ये समाविष्ट नसते. खरे तर यातूनही चलनपुरवठा वाढतो.
- अंदाजपत्रकीय तुट = (महसुली खर्च – महसुली उत्पन्न ) + (भांडवली खर्च – भांडवली उत्पन्न )
४) राजकोषीय तूट : सरकारच्या महसुली उत्पन्नापेक्षा एकूण खर्चाचे प्रमाण जेवढे अधिक असते, तेवढ्या प्रमाणात असणारी तूट ही राजकोषीय तूट म्हणून ओळखली जाते. सरकारचा जो खर्च कर्जे, उचल व रोख शिल्लक रकमेतील घट यांच्यातून भागविला जातो. त्याचे प्रमाण राजकोषीय तूट व्यक्त करते. १९८५ मधील सुखमाँय चक्रवर्ती समितीने अर्थसंकल्पीय तुटीपेक्षा राजकोषीय तुटच दर्शवण्याची शिफारस केली होती. राजकोषीय तूट ही एका अर्थाने सरकारच्या वित्तीय जबाबदारीमध्ये होणारी वाढ दर्शवते. राजकोषीय तुटीचे प्रमाण अर्थव्यवस्थेत मोठे असल्यास व ते वाढत असल्यास अर्थव्यवस्थेचे आर्थिक व्यवस्थापन घसरत आहे, असा निष्कर्ष काढला जातो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँका यांनी आर्थिक पुनर्रचनेच्या कार्यक्रमात कर्ज घेणाऱ्या देशाला राजकोषीय तूट कमी करण्याची अट घातली आहे. राजकोषीय तूट कमी करण्यास सरकारला खर्चामध्ये कपात करावी लागते.
- राजकोषीय तूट = एकूण खर्च – महसुली जमा
६) प्राथमिक तूट : राजकोषीय तुटीतून व्याज वजा केले असता, प्राथमिक तूट मिळते. व्याज यामध्ये देय व्याज व येणारे व्याज यातील फरक घेतला जातो.
- प्राथमिक तूट = राजकोषीय तूट – व्याज
७) चलनविषयक तूट : केंद्र सरकारमार्फत रिझर्व बँकेकडून जी उचल केली जाते किंवा केंद्र सरकारची रिझर्व बॅंकेकडे असणारी देयता जेवढ्या प्रमाणात वाढते, त्याला चलनविषयक तूट असे म्हणतात. सरकारच्या वित्तीय तुटीमुळे अर्थव्यवस्थेवर भाववाढकारक परिणाम किती प्रमाणात होईल, हे समजण्यासाठी चलनविषयक तूट ही संकल्पना उपयुक्त ठरते. चक्रवर्ती समितीने अंदाजपत्रकीय तुटीच्या संकल्पनेबरोबरच चलनविषयक तूट ही मापन करण्याची सूचना केली होती. चलनविषयक मापन करीत असताना त्यामध्ये रिझर्व बँकेतून केंद्र सरकारने ज्या विविध स्वरूपात उचल व कर्जे घेतली असतील त्या सर्वांचा समावेश करावा, अशी शिफारस केली आहे. सरकार जेव्हा रिझर्व बँकेकडून उचल घेते, तेव्हा चलनपुरवठ्यात वाढ होत असल्याने याला चलनविषयक तूट असे म्हणतात.
- चलनविषयक तूट = रिझर्व बँकेकडून केलेली उचल किंवा कर्ज
८) चक्रीय तूट व रचनात्मक तूट : देशामध्ये शासकीय जमा आणि खर्चात फरक असतो आणि जमेपेक्षा खर्च हा जास्तच असतो. अर्थव्यवस्थेतील या प्रवृत्तीला रचनात्मक तूट म्हणतात. मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जास्तीचा खर्च करावा लागतो. मंदीच्या काळातील या वाढत्या तुटीला चक्रीय तूट असे म्हणतात.
- अर्थसंकल्पीय तूट = रचनात्मक तूट + चक्रीय तूट
९) परिणामी महसुली तूट : परिणामी महसुली तूट यामध्ये महसुली तूट यामधून सरकारद्वारे जी अनुदाने दिली जातात, ती वजा केली जातात.
- परिणामी महसुली तूट = महसुली तूट – अनुदाने