सागर भस्मे
मागील लेखातून आपण सेबी (SEBI- Securities and Exchange Board of India) ही संस्था काय आहे? ती का स्थापन करण्यात आली? तसेच सेबीची रचना, उद्दिष्टे आणि कार्यांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण आपण प्रतिभूती बाजारासंबंधी काही महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्हज म्हणजे काय? भारतीय ठेव पावत्या म्हणजे काय? पार्टिसिपेटरी नोट्स कशाला म्हणतात? डिमॅट खाते म्हणजे काय? तसेच हेज फंड काय आहे, हे जाणून घेऊ.
डेरिव्हेटिव्हज म्हणजे काय?
डेरिव्हेटिव्हज म्हणजे असे साधन; ज्याचे मूल्य एक किंवा अधिक मूलभूत चलांवरून ठरविण्यात येते. या चलांना करांरामधील पायाभूत चल समजण्यात येते. भारताच्या संदर्भात सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्टस अॅक्ट, १९५६ अनुसार डेरिव्हेटिव्हज म्हणजे कर्जांमधून निर्माण झालेले रोखे, समभाग, सुरक्षित किंवा असुरक्षित कर्ज, धोकादायक साधने किंवा तफावतीसाठी करार किंवा रोख्यांचा इतर कोणताही प्रकार म्हणजेच डेरिव्हेटिव्हज होय. यामध्ये असा करार की, ज्याचे मूल्य किमतीवरून किंवा किमतीच्या सूचीवरून किंवा मूलभूत रोख्यांवरून ठरविले जाते.
मूलभूत मालमत्ता यामध्ये समभाग, परकीय चलन, वस्तू किंवा इतर कोणतीही मालमत्ता यांचा समावेश असतो. उदा., समजा कापूस उत्पादक शेतकरी त्याच्या पिकाची विक्री एखाद्या तारखेला निश्चित करून, त्या तारखेला होणाऱ्या संभाव्य किंमतबदलाचा धोका टाळू शकतात. अशा प्रकारचा व्यवहार म्हणजेच डेरिव्हेटिव्हजचे उदाहरण आहे. त्यामध्ये डेरिव्हेटिव्हजची किंमत ही कापसाच्या ‘स्पॉट प्राइस’वरून ठरविली जाते आणि ती मूलभूत मालमत्ता असते. यावरून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे डेरिव्हेटिव्हजला स्वतःचे मूल्य नसते. डेरिव्हेटिव्हजचा वापर ज्या संपत्तीवर आधारलेला असतो, त्या संपत्तीच्या मूल्यावरून त्याचे मूल्य निश्चित होते.
हेही वाचा – UPSC-MPSC : ‘सेबी’ची स्थापना करण्याची गरज का भासली? तिची उद्दिष्टे आणि कार्ये कोणती?
भारतीय ठेव पावत्या म्हणजे काय?
कंपनी कायदा, २००४ या कायद्यान्वये केलेल्या व्याख्येनुसार भारतीय ठेव पावत्या म्हणजे ठेव पावत्यांच्या स्वरूपामधील एक असे साधन; जे भारतीय ठेवींच्या साह्याने भारतामध्ये या पावत्या देणाऱ्या कंपनीच्या समभागांच्या बदल्यात तयार करण्यात येतात. सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे झाल्यास भारतीय ठेव पावत्या म्हणजे अशी व्यवस्था; ज्यामुळे भारतामधील जे गुंतवणूकदार आहेत, त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या, तसेच नोंदणीकृत परकीय कंपन्यांमध्येसुद्धा भारतीय रुपयांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होते. भारतीय ठेव पावत्या या भारतीय चलनांमध्ये असतात आणि भारतामधील स्थानिक डिपॉझिटरीमार्फत त्यांचे वितरण केले जाते.
भारतीय ठेव पावत्यांचा मुख्य वाटा हा मात्र परकीय कंपनीकडे राहतो आणि ही कंपनी भारतीय डिपॉझिटरीला भारतीय ठेव पावत्यांचे वितरण करण्याचा अधिकार देते. भारतामधील कोणत्याही शेअर बाजारामध्ये त्यांची नोंदणी केली जाऊ शकते. जी कोणी व्यक्ती/संस्था इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये गुंतवणूक करू शकते, अशी प्रत्येक व्यक्ती/संस्था भारतीय ठेव पावत्यांमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र ठरते.
पार्टीसिपेटरी नोट्स म्हणजे काय?
भारताच्या संदर्भात परकीय क्षेत्रामध्ये दिलेले डेरीव्हेटीव्हज म्हणजेच पार्टीसिपेटरी नोट्स होय. असे डेरीव्हेटीव्हज/पार्टीसिपेटरी नोट्स या अशा परकीय संस्थेमार्फत ज्यांची नोंदणी ही सेबीकडे असते, त्यांच्यामार्फत भारतीय रोख्यांच्या बदल्यांमध्ये देण्यात येतात. पार्टीसिपेटरी नोट्सला ओव्हरसीज डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट, कॅप रिटर्न नोट्स, पार्टिसिपेटिंग रिटर्न नोट्स, इक्विटी लिंक्ड नोट्स अशा विविध नावांनी याला ओळखले जाते. पार्टीसिपेटरी नोट्समध्ये जो गुंतवणूकदार असतो, त्याला मूलभूत भारतीय रोखे प्रदान करण्यात येत नाहीत, तर हे रोखे पार्टीसिपेटरी नोट्स वितरित करणाऱ्या परकीय गुंतवणूक संस्थेला प्रदान करण्यात येतात. पार्टीसिपेटरी नोट्सचे मूल्य हे भारतीय रोख्यांच्या मूल्याशी जोडलेले असते. या कारणाने पार्टीसिपेटरी नोट्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष रोखे न घेतासुद्धा रोख्यांमधील गुंतवणुकीचे सर्वच आर्थिक फायदे प्राप्त होतात, तसेच रोख्यांच्या किमतींमधील चढ-उताराचा फायदासुद्धा त्यांना होतो.
डिमॅट खाते कशाला म्हणतात?
इलेक्ट्रॉनिक किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपामध्ये रोखे सांभाळणारे खाते म्हणजेच डिमॅट खाते होय. शेअर बाजारामधील व्यवहार करण्याकरिता गुंतवणूकदाराला एक डिमॅट खाते उघडावे लागते. हे खाते ज्या ठिकाणी उघडले जाते, त्या संस्थेला डिपॉझिटरी, असे म्हणतात. डिमॅट खात्याद्वारे समभागांचे डिमॅट स्वरूपात ऑनलाइन व्यवहार करता येतात. गुंतवणूकदार जे शेअर्स खरेदी करीत असतात, ते या डिपॉझिटरीमध्ये जमा होतात. ज्याप्रमाणे बँक पैसे सुरक्षित ठेवण्याचे काम करते, त्याचप्रमाणे डिपॉझिटरी या शेअर्स सुरक्षित ठेवण्याचे काम करीत असतात. शेअर्सच्या डिमॅट स्वरूपाचे ऑनलाईन व्यवहार हे त्वरित होत असल्यामुळे चोरी, गैरव्यवहार, मूळ समभागांमध्ये घोटाळा करणे अशा कृतींना आळा घातला जातो आणि गुंतवणूकदारांना कितीही संख्येने समभागांची खरेदी किंवा विक्री करणे शक्य होते.
हेही वाचा –UPSC-MPSC : बॉम्बे शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार काय आहेत? ते कशा प्रकारे कार्ये करतात?
हेज फंड
हेजिंग म्हणजे एखाद्या गोष्टीवर मर्यादा घालणे. हेजिंग या संज्ञेपासूनच हेज फंड ही संज्ञा उदयास आली. हेजिंग म्हणजे अशी प्रक्रिया जिच्या साह्य़ाने उद्योगपती किंवा व्यावसायिक किंमतबदलाच्या धोक्यापासून स्वतःला लांब ठेवू शकतो. हेज फंड हा एक प्रकारचा गुंतवणूकयोग्य भांडवलाचा समूह असतो; ज्यांना अर्थव्यवस्थेमधील अधिक फायदेशीर क्षेत्राकडे मार्गक्रमण करणे त्वरित शक्य होते. सोप्या भाषेत समजवायचे झाल्यास हा फंड ज्या अर्थव्यवस्थेमध्ये कमी फायदा आहे, अशा अर्थव्यवस्थेच्या शेअर बाजारामधून जास्त फायदा असणाऱ्या शेअर बाजारामध्ये सहज वळविता येते. मात्र, सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीचा हा पर्याय धोकादायक समजण्यात येतो. त्यामध्ये कंपन्या/संस्था शेअर बाजारामध्ये अगदी सहजतेने ये-जा करू शकतात. त्यामुळे जे देश त्यांच्या भांडवलावर अवलंबून असतात, ते कायमच या गुंतवणूकदारांच्या लहरीपणाला बळी पडण्याची शक्यता असते.