सागर भस्मे

मागील लेखातून आपण ‘इन्फ्लेशन इंडेक्स्ड बाँड’ आणि कॉर्पोरेट बाँड मार्केट या संकल्पना काय आहेत, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण पर्यावरण, सामाजिक व गव्हर्नन्स गुंतवणूक या घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण पर्यावरण, सामाजिक आणि गव्हर्नन्स गुंतवणूक म्हणजे काय? ईएसजी (ESG) गुंतवणुकीमधील निकषांचा अर्थ काय आहे? भारतामध्ये ईएसजी गुंतवणुकीची गरज का आहे? ईएसजी गुंतवणूक ही महत्त्वाची का आहे? तसेच भारतातील ईएसजी गुंतवणुकीसंदर्भात परिस्थिती इत्यादी बाबींबाबत जाणून घेऊ.

पर्यावरण, सामाजिक व गव्हर्नन्स गुंतवणूक म्हणजे काय?

पर्यावरण, सामाजिक व गव्हर्नन्स गुंतवणूक म्हणजे अशी गुंतवणूक की, जी पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासन या निकषांच्या संचाला संदर्भित करते; जी सामाजिकदृष्ट्या जागृत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी अशा निकषांची तपासणी करण्याकरिता मदत करते. गेल्या काही वर्षांत शेअर बाजारामध्ये अशा नव्या संकल्पनेचा उदय झाल्याचे दिसून येत आहे. या निकषांवरून सार्वजनिक कंपन्या पर्यावरणाचे आणि ते कार्य करीत असलेल्या समुदायांचे किती चांगल्या प्रकारे संरक्षण करतात, व्यवस्थापन कसे करतात आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स उच्च मापदंडांची पूर्तता कशी करतात याची खात्री करण्याकरिता मदत करतात.

expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी

पर्यावरण, सामाजिक व गव्हर्नन्स गुंतवणूक अशा गुंतवणुकीला शाश्वत आणि सामाजिक जाणीव असलेली गुंतवणूक, असे समजण्यात येते. कारण- अशा गुंतवणुकीमुळे फक्त सभोवतालावरच परिणाम होत नसून, गुंतवणुकीच्या पद्धतीवरसुद्धा याचा परिणाम दिसून येतो. त्याला परिणामकारक गुंतवणूकसुद्धा म्हटले जाते. अशा गुंतवणुकीमुळे एक प्रकारे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होतो, की ज्या कंपन्यांमुळे धोका होण्याची संभावना असते, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास टाळून स्वतःला अशा धोकादायक गुंतवणुकीपासून ते परावृत्त करू शकतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात कॉर्पोरेट बाँड मार्केटची स्थिती काय आहे? तो उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने का महत्त्वाचा असतो?

ईएसजी गुंतवणुकीच्या निकषांचा अर्थ :

१) पर्यावरण : पर्यावरणाचा हा निकष संबंधित कंपनीची निसर्गाप्रति असणारी बांधिलकी तपासतो. त्यामध्ये ती कंपनी ऊर्जेचा वापर, कंपनीच्या उत्पादनात आणि इतर प्रक्रियांमध्ये गुंतलेल्या विषारी रसायनांपासून दूर राहण्याचा किंवा वापर कमी करण्याचा प्रयत्न करते का? तसेच प्रदूषणाचे प्रमाण, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन, कचर्‍याची विल्हेवाट, प्राण्यांना दिली जाणारी वागणूक इत्यादी बाबींचा समावेश यामध्ये असू शकतो.

२) सामाजिक : या निकषामध्ये कंपनीचे कर्मचाऱ्यांशी असणारे संबंध, तसेच पुरवठादार आणि ग्राहकांशी असणारे संबंध, माहितीची सुरक्षितता, कंपनी कार्यरत असलेल्या ठिकाणचा समुदाय अशा सर्व बाबींची तपासणी करण्यात येते. तसेच सामाजिक घटकांमध्ये एलजीबीटीक्यू समानता, कार्यकारी संच आणि एकूण कर्मचारी या दोघांमधील वांशिक विविधता व समावेशन कार्यक्रम, नियुक्ती पद्धती या गोष्टींचासुद्धा समावेश होतो. एखादी कंपनी तिच्या मर्यादित व्यवसाय क्षेत्राच्या पलीकडे या व्यापक जगात सामाजिक हितासाठी कशी कार्य करते हेदेखील तपासले जाते.

३) गव्हर्नन्स : यात प्रशासनामध्ये कार्यकारी वेतनाच्या आसपासच्या समस्यांपासून ते नेतृत्वातील विविधतेपर्यंत, तसेच ते नेतृत्व भागधारकांना किती चांगला प्रतिसाद देते आणि त्यांच्याशी कसा संवाद साधते, या सर्व गोष्टींचा समावेश या निकषांमध्ये होतो. २००६ मध्ये युनायटेड नेशन्स प्रिन्सिपल्स फॉर रिस्पॉन्सिबल इन्व्हेस्टिंग लागू झाल्यापासून ईएसजी फ्रेमवर्क आधुनिक काळातील व्यवसायांचा एक अविभाज्य दुवा म्हणून ओळखला जातो.

भारतामध्ये ईएसजी गुंतवणुकीची गरज का आहे?

भारतामध्ये आपण पाहतच आहोत की, अनेक पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये वायुप्रदूषण, जलप्रदूषण, जंगलतोड, हवामानबदल यांसह अनेक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यासोबतच समाजामध्ये गरिबी, असमानता व मानवी हक्कांचे उल्लंघन यासारखे महत्त्वपूर्ण सामाजिक आव्हानेसुद्धा भारतासमोर आहेत. त्यामुळे या समस्या सोडविण्याकरिता वचनबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे महत्त्व वाढले आहे. प्रशासनाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर भारतामध्ये एक जटील नियामक व कायदेशीर वातावरण आहे आणि भारतात कार्यरत कंपन्यांना भ्रष्टाचार नियामक अनुपालन व कॉर्पोरेट गव्हर्नरशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हे धोके कमी करण्याकरिता योग्य प्रशासन पद्धती असलेल्या कंपन्यांना ओळखण्याची सक्त गरज आहे. अशा विविध कारणांमुळे भारतामध्ये ईएसजी गुंतवणुकीची गरज आहे.

ईएसजी गुंतवणूक ही महत्त्वाची का आहे?

बहुतांश लोकांकरिता ईएसजी गुंतवणूक ही तीन अक्षरी संक्षेपापेक्षा जास्त आहे. एखादी कंपनी तिच्या सर्व भागधारकांना कशी सेवा प्रदान करते, हे संबोधित करण्याकरिता ही एक व्यावहारिक, वास्तविक, तसेच जागतिक प्रक्रिया आहे. तसेच सर्व भागधारकांवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव ओळखणे, हेच दर्जेदार गुंतवणुकीसाठी मोजण्याचे साधन बनले पाहिजे. प्रत्येक स्टॉक होल्डरशी संबंधित स्पष्ट परिणामकारक कारणांसाठी हे महत्त्वाचे आहे; परंतु याचा वापर कंपनीची क्षमता आणि टिकाऊ ओळखण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो. या कारणांव्यतिरिक्त भविष्यात आपल्याला गुंतवणुकीमध्ये तसेच पर्यावरण, समाजिक व प्रशासनामध्ये संतुलन टिकवून ठेवण्याकरिता ईएसजी गुंतवणूक ही फार महत्त्वाची बाब ठरते.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप’ ही संकल्पना काय आहे? वित्तीय प्रणालीमध्ये याचा वापर का करतात?

भारतामधील ईएसजी गुंतवणुकीसंदर्भात परिस्थिती :

सेबीनुसार जागतिक कलाप्रमाणेच भारतामध्येसुद्धा पर्यावरण, सामाजिक व गव्हर्नन्स या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून येत आहे. सन २०२०-२१ मध्ये भारतीय गुंतवणूकदारांनीसुद्धा ‘पर्यावरण, सामाजिक व गव्हर्नन्स’ गुंतवणुकीमध्ये रस दाखविला आहे. त्यामुळेच सेबीला एप्रिल २०२१ मध्ये पर्यावरण, सामाजिक व गव्हर्नन्स याच्याशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा करावी लागली.

नियामक समर्थन, गुंतवणूकदारांची मागणी आणि व्यवसायाच्या संधीची ओळख यामुळे भारतात ईएसजी गुंतवणुकीत लक्षणीय वाढ होत आहे. ईएसजी संबंधित गुंतवणूक २०२६ पर्यंत अंदाजे जागतिक मालमत्ता व्यवस्थापनाखालील ३३.९ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे; तर भारतीय संदर्भात ६४ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूकदार या वर्षी शाश्वत निधीसाठी त्यांचे एक्सपोजर वाढवतील, असा अंदाज आहे.

Story img Loader