सागर भस्मे

मागील लेखातून आपण ‘नाबार्ड’ ही संस्था नेमकी काय आहे? ती स्थापन करण्याची गरज का पडली, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण परकीय व्यापार क्षेत्राकरिता वित्तपुरवठा करणारी एक्झिम बँक आणि गृहनिर्माण क्षेत्राकरिता वित्तपुरवठा करणाऱ्या राष्ट्रीय गृहनिर्माण बँक या विकास वित्त संस्था नेमक्या काय आहेत? याबाबत जाणून घेऊया.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता

आयात-निर्यात बँक (EXIM Bank: Export – Import Bank Of India):

देशात विकास घडवून आणण्याकरिता आंतरराष्ट्रीय व्यापार हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार वाढावा याकरिता आयात-निर्यातीस प्रोत्साहन देणे गरजेचे असते. परकीय व्यापारांमध्ये वृद्धी व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, तसेच याकरिता पतपुरवठा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने आयातदार व निर्यातदार यांना वित्तीय मदत करणारी आणि यांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये समन्वय साधवून आणणारी संस्था म्हणून ‘एक्झिम बँके’ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. बी. डी. कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १९७५ मध्ये दिलेल्या अहवालानुसार आयात-निर्यातीस वित्तपुरवठा करण्याकरिता तसेच प्रोत्साहन देण्याकरिता एक संस्था असावी अशी शिफारस केली होती. निर्यातीस पतपुरवठा करण्याच्या उद्देशाने १९८१ मध्ये एक्झिम बँक कायदा संमत करण्यात आला व त्यानुसार १ जानेवारी १९८२ मध्ये एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली.

हेही वाचा – UPSC-MPSC : भांडवली बाजाराला वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था कोणत्या?

एक्झिम बँक ही भारत सरकारद्वारे नियंत्रित वैधानिक संस्था आहे. या बँकेचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. एक्झिम बँकेच्या स्थापनेमागे निर्यातीमध्ये वाढ व्हावी, तसेच परकीय व्यापार आणि गुंतवणूक यांचा देशाच्या आर्थिक वाढीत अंतर्भाव व्हावा, असा उद्देश होता.

एक्झिम बँक ही भारतीय निर्यातदार आणि आयातदारांना आर्थिक सहाय्य करीत असते. निर्यात प्रोत्साहनाकरिता राबवल्या जाणाऱ्या विविध पतशुल्क योजनांसाठी एक मध्यस्थ म्हणून ही बँक कार्यरत असते. ही बँक भारतीय निर्यातदारांना नवीन बाजारपेठा ओळखण्याकरिता आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार करण्याकरिता सल्लागार सेवा आणि समर्थन प्रदान करीत असते.

एक्झिम बँक ही भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याकरिता आणि व्यापार सुलभ करण्याकरिता भारतातील आणि परदेशातील इतर संस्थांसोबत सहयोग करीत असते. भारतीय उद्योगांकरिता विशेषतः लघू आणि मध्यम उपक्रमांच्या व्यवसायामध्ये विविध टप्प्यांवर लागणारी विविध उत्पादने तसेच सेवा उपलब्ध करण्याकरिता ही बँक कार्यरत असते. यामध्ये तंत्रज्ञान आयात करणे, निर्यात वस्तूंचे विपणन करणे, निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुंतवणूक करणे इत्यादी कार्य ही बँक करीत असते. २०२१ पासून हर्षा बंगारी या एक्झिम बँकेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB- National Housing Bank):

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेचा पाया हा सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये रचला गेला आहे. सातव्या पंचवार्षिक योजनेचे नियोजन करीत असताना वैयक्तिक गृहकर्जाकरिता दीर्घ मुदतीच्या कर्जाची उपलब्धता ही कमी प्रमाणात असल्याचे दिसून आले. यावर उपाय म्हणून गृह कर्जांची उपलब्धता वाढावी, या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावरील संस्था स्थापन करण्याची गरज आहे, असे या योजनेमध्ये सूचित करण्यात आले. याकरिता डॉ. सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय गटाची स्थापना करण्यात आली. या गटाने गृहकर्जाकरिता सर्वोच्च आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची शिफारस केली. या कार्यगटाच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय गृहनिर्माण कायदा, १९८७ अन्वये ९ जुलै १९८८ रोजी राष्ट्रीय गृह बँकेची स्थापना करण्यात आली.

गृह बँक ही गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नियामक संस्था म्हणून कार्य करते. ही संस्था भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. राष्ट्रीय गृह बँकेच्या स्थापनेमागे गृह वित्त बाजारामध्ये समावेशक विस्तारास प्रोत्साहन देणे, असा उद्देश होता. राष्ट्रीय गृह बँकेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ही बँक गृहनिर्माण क्षेत्रामध्ये सर्वोच्च संस्था म्हणून कार्यरत असून गृह कर्ज देणाऱ्या वित्त संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करीत असते.

प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर गृहनिर्माण क्षेत्रातील वित्तसंस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अशा गृहनिर्माण संस्थांना आर्थिक आणि इतर सहाय्य प्रदान करण्यासाठी प्राथमिक एजन्सी म्हणून कार्य करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या गटांवर लक्ष केंद्रित करून सर्व घटकांच्या घरांच्या गरजा भागवण्यासाठी कर्जपुरवठा क्षमता वाढवणे आणि प्रोत्साहन देणे या उद्देशाने या बँकेची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘नाबार्ड’ ही संस्था नेमकी काय आहे? ती स्थापन करण्याची गरज का पडली?

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेची स्थापना ही रिझर्व्ह बँकेच्या संपूर्ण मालकीची संलग्न संस्था म्हणून झाली होती. मात्र, २०१९ मध्ये राष्ट्रीय गृहनिर्माण बँक कायदा, १९८७ मध्ये सुधारणा करण्यात येऊन राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेची संपूर्ण मालकी रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे सध्या राष्ट्रीय गृहनिर्माण बँक ही भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची संस्था बनली आहे. सद्यस्थितीमध्ये शरद कुमार होटा राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत आहेत.