मागील काही लेखांतून आपण भारतातील जमीन सुधारणांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण हरितक्रांती या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण हरितक्रांती म्हणजे काय? हरितक्रांती राबविण्याची गरज का पडली? या क्रांतीचे घटक कोणते होते? इत्यादींविषयी जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हरितक्रांती (Green Revolution)
कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि नवीन संकरित बी-बियाणांच्या संशोधनामुळे कृषी उत्पादनात जी क्रांती घडून आली, तिलाच हरितक्रांती असे म्हणतात. प्रसिद्ध कृषीतज्ज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी १९६० मध्ये सर्वप्रथम हरितक्रांती ही संकल्पना अस्तित्वात आणून त्यानुसार कृषी क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. नॉर्मन बोरलॉग यांनी ‘नोरीन’ या बुटक्या जातीच्या गव्हाचा संकर मेक्सिकन गव्हाबरोबर करून गव्हाची नवीन जात ही अमेरिकेमध्ये शोधून काढली. पुढे बोरलॉग यांनी या संकरित ‘नोरिन-मेक्सिकन-ड्वार्फ’ जातीचे बी ‘पुसा’ येथे पेरून बघितले आणि भरपूर उत्पन्न मिळवून देणारी जात म्हणून नवीन क्रांतीची सुरुवात झाली. नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरितक्रांतीचे जनक असे म्हटले जाते. तसेच यांना या अमूल्य योगदानाकरीता १९७० चा शांततेचा नोबेल पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील परिस्थिती ही बिकट स्वरूपाची होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळादरम्यान भारतामध्ये अन्नाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. यादरम्यान लोक मोठ्या प्रमाणात भूकबळीचे शिकार झाले. तसेच तिसऱ्या योजना काळातील युद्धांनी आणि दुष्काळांनी भारताची परिस्थिती ही आणखीनच जर्जर झालेली होती. भारतातील जनतेची भूक भागवण्याकरिता भारताला अमेरिकेमधून (PL480 अन्वये) अगदी निकृष्ट दर्जाचे असलेले धान्यदेखील आयात करावे लागत होते. एवढेच नव्हे तर लालबहादूर शास्त्री यांनी जनतेला ‘एक वेळच्या जेवणाचा त्याग करा’ असे सांगितले होते.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
भारतामध्ये अशा या परिस्थितीत मोठी क्रांती घडून आली, ती म्हणजेच हरितक्रांती होय. भारतामध्ये कृषीतज्ज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वामध्ये हरितक्रांतीला सुरुवात झाली. त्यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणतात. भारतीय हरितक्रांतीला १९६५ मध्ये सुरुवात झाली. हरितक्रांतीच्या १९६५-६८ या कालावधीत विद्यमान यंत्रणेचा नाश झाला आणि कृषी क्षेत्रात नवीन हरितक्रांती घडून आली. स्वामीनाथन यांनी बोरलाॅगद्वारे शोधून काढलेल्या मेक्सिकन-ड्वार्फ जातीचा भारतीय स्थानिक जातीशी संकर घडवून भारतामध्ये लागवडीयोग्य अशा नवीन जाती शोधून काढल्या आणि भारतामध्ये हरितक्रांतीची मुहूर्तमेढ स्वामीनाथन यांनी रोवली.
या बहुमूल्य योगदानाकरिता स्वामीनाथन यांना १९८७ मध्ये World Food Prize देण्यात आला. भारतीय हरितक्रांतीमध्ये स्वामीनाथन यांच्या व्यतिरिक्त सी. सुब्रमण्यम यांचेदेखील योगदान आहे. सी. सुब्रमण्यम हे १९६५ दरम्यान तत्कालीन भारताचे कृषी मंत्री होते. या कालावधीदरम्यान त्यांनी तब्बल १८,००० टन मेक्सिकन-ड्वार्फ गव्हाची आयात करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामध्ये Lerma Rojo64 A आणि Sonora 64 या दोन जातींचा समावेश होता. हरितक्रांती किंवा हिरव्याक्रांतीमुळे भारतीय शेती उत्पादनात प्रामुख्याने गहू आणि तांदूळ या पिकांच्या प्रति हेक्टर उत्पादनात प्रचंड वाढ झाली. या पिकांच्या उत्पादनक्षमतेत घडून आलेल्या नवीन बदलालाच अर्थतज्ज्ञांनी हरितक्रांती असे म्हटले आहे.
हरितक्रांतीचे घटक :
हरितक्रांतीमध्ये एकूण सहा घटकांचा समावेश होता. त्यांचा आढावा आपण पुढे घेणार आहे :
१) भरपूर उत्पादन देणाऱ्या सुधारित बियाण्यांचा वापर (High Yielding Varieties Seeds): निरनिराळ्या जातीशी संकर घडवून तयार करण्यात आलेल्या बियाणांना अत्युच्च उत्पादन देणाऱ्या बुटक्या संकरित जाती म्हणून ओळखले जाऊ लागले. याकरिता सातत्याने जीवशास्त्रीय बदल करून बोरलॉग यांनी असे बियाणे विकसित करण्यात यश मिळवले होते. अत्युच्च उत्पादन देणाऱ्या या बुटक्या संकरित जातीपासून मिळवलेल्या बियाण्यांचा वापर हा शेतीमध्ये करण्यात येऊ लागला. त्याची सुरुवात ही गव्हापासून झाली. नंतर यामध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचीदेखील भर पडली.
२) रासायनिक खतांचा वापर (Use of Chemical Fertilizers): पिकांची उत्पादकता वाढण्याकरिता त्यांना जमिनीकडून पुरेशा प्रमाणामध्ये पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. या बियाण्यांना आवश्यक असणारी पोषक तत्वे ही पारंपरिक खतांच्या माध्यमातून पुरवणे हे शक्य नसल्याने या पारंपरिक खतांऐवजी जास्त तीव्रता असणाऱ्या म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियमयुक्त अशा रासायनिक खतांचा वापर केला जाऊ लागला.
३) सिंचन (Irrigation) : पिकांची नियंत्रित वाढ आणि खते योग्य प्रमाणात पातळ किंवा सौम्य करण्याकरिता नियंत्रित पाणीपुरवठ्याची आवश्यकता होती. याकरिता नैसर्गिक तसेच कृत्रिम मार्गांनी पाणी देण्याकरिता सिंचनाचे सर्व मार्ग शोधण्यात येऊन सिंचनाचा वापर करून पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली.
४) रासायनिक कीटकनाशके आणि जंतुनाशके यांचा वापर (Use of Chemical Pesticides and Germicides): नवीन शोधण्यात आलेली बियाणे ही नवीन असल्याने त्यांना स्थानिक कीटकजंतू आणि विविध रोग यांची ओळख नव्हती. यामुळे उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कीटकनाशके आणि जंतुनाशके यांचा वापर अनिवार्य होता. याकरिताच कीटक तसेच जिवाणूपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता रासायनिक कीटकनाशक तसेच तननाशकांचा वापर केला जाऊ लागला.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?
५) साठवणूक विपणन व वितरण (Storage, Marketing and Distribution): नवीन पद्धतीच्या शेतीसाठी सुयोग्य जमीन काही प्रदेशांमध्ये म्हणजेच हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश अशा महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये असल्यामुळे कापणी झालेली पीकं सर्व देशांमध्ये वितरित करेपर्यंत त्यांची साठवणूक याच प्रदेशांमध्ये करणे गरजेचे होते. तसेच ज्या देशांनी हरितक्रांतीचा प्रयोग केला होता, त्या देशांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता आणि नवीन पिकांचे संपूर्ण देशामध्ये वितरण करणे आवश्यक होते. याकरिता विपणनाची योग्य साखळी, वितरणव्यवस्था आणि वाहतुकीची सोय यांची आवश्यकता होती. यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था, अन्न महामंडळ यांच्या माध्यमातून उत्पादन झालेल्या अन्नधान्याचे विपणन वितरण करणे सोपे झाले. हरितक्रांतीमुळे १९६६-६७ मधील अन्नधान्याचे उत्पादन जे ७४.२ दशलक्ष टन होते त्याचे प्रमाण वाढून १९६७-६८ मध्ये ते ९५ दशलक्ष टनापर्यंत पोहोचले होते.
६) किंमत धोरण : कृषी किमती आयोगाच्या स्थापनेनंतर किमान आधारभूत किमती जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांना खरेदीची हमी देऊन उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन दिले.