सागर भस्मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील लेखातून आपण चलनवाढ निर्माण होण्याकरिता कोणते घटक कारणीभूत ठरतात याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होतो, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम :
चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम हा दोन्ही प्रकारे होत असतो. चलनवाढीचा अर्थव्यवस्थेला जसा फायदा होतो, तसेच तोटासुद्धा होतो. चलनवाढ अर्थव्यवस्थेतील विकासासाठी आवश्यकच मानली जाते. ही चलनवाढ जर मर्यादित प्रमाणात असेल तर लाभदायक ठरते. मात्र, तीच चलनवाढ जर अमर्याद प्रमाणात असेल तर त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : चलनवाढीस कारणीभूत ठरणारे घटक कोणते?
उद्योग क्षेत्रामध्ये चलनवाढीचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. चलनवाढ झाल्याने वस्तू व सेवांच्या मागणीमध्ये वाढ झाल्यास उत्पादनसुद्धा वाढवावे लागते. म्हणजेच एक प्रकारे उत्पादन वाढीस चालना मिळते. उद्योगांमध्ये उत्पादन वाढ होते, तर लोकांना रोजगारसुद्धा प्राप्त होतो. करवसुलीवरसुद्धा चलनवाढीचा परिणाम होतो. चलनवाढ झाल्याने उत्पन्नामध्येसुद्धा वाढ होते, त्यामुळे करांचे प्रमाणसुद्धा वाढते व कर वसुलीमध्ये वाढ होते. तसेच चलनवाढीचा परिणाम गुंतवणुकीवरसुद्धा दिसून येतो. उद्योग क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ झाल्यास गुंतवणुकीस चालना मिळते. उद्योग क्षेत्र हे गुंतवणुकीकरिता खूप महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकच नव्हे, तर परकीय गुंतवणुकीलासुद्धा चालना मिळते.
चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणामसुद्धा दिसून येतो. चलनवाढीचा बचतीवरही विपरीत परिणाम होतो. चलनवाढीमुळे लोकांजवळील पैसा वाढतो, त्यामुळे खर्चाचे प्रमाणसुद्धा वाढते. गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होऊ लागते. परिणामतः बचती मात्र कमी कमी होऊ लागतात. व्याजदरावरही विपरीत परिणाम दिसून येतो. चलनवाढीच्या काळात लोकांजवळील पैसा तर वाढलेला असतोच, त्याचबरोबर पैशांच्या मागणीमध्येसुद्धा प्रचंड वाढ झालेली दिसून येते. लोकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. परंतु, अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त पैसा वाढणे हेसुद्धा अर्थव्यवस्थेकरिता घातक ठरते. त्यावर उपाय म्हणून व्याजदरात वाढ केली जाते. तसेच मध्यवर्ती बँकेद्वारे बँकदर, रेपो दरातसुद्धा वाढ केली जाते. बॅंकदर वाढवल्याने बँकासुद्धा कमी प्रमाणात कर्जे घेऊ शकतात, तसेच त्यांची कर्ज देण्याची क्षमतासुद्धा कमी होते. व्याजदर वाढवल्याने बँका जी कर्जे देतात, ती महाग होतात. त्यामुळे लोकांच्या कर्ज घेण्याच्या प्रवृत्तीवर मर्यादा येतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : चलनपुरवठा भाग- २
कुटुंब संस्थांवरील परिणाम :
कुटुंब संस्थेमध्ये उत्पादक, ऋणको-धनको, पगारदार, पेन्शनदार, औद्योगिक गुंतवणूकदार, मजूर वर्ग अशा अनेक घटकांचा समावेश होतो. या घटकांवर चलनवाढीचा दोन्ही प्रकारे परिणाम पडतो. काही घटकांवर त्याचा सकारात्मक, तर काही घटकांवर नकारात्मक परिणाम पडतो. उत्पादकांना चलनवाढीचा चांगला फायदा होतो, कारण एकीकडे वस्तूंची मागणी वाढलेली असते, त्यामुळे जास्त उत्पादनाची गरजही असते. चलनवाढीचा फायदा जवळपास शेतकऱ्यांपासून ते मोठे उद्योग असा सर्वांनाच होतो. तसेच गुंतवणूकदारांनासुद्धा चलनवाढीचा फायदा होतो.
ऋणको व धनको यांच्यामध्ये मात्र चलनवाढीचा वेगवेगळा परिणाम दिसून येतो. ऋणकोला चलनवाढीचा फायदा होतो तर धनकोला चलनवाढीचे नुकसान होते. ऋणकोला चलनवाढीचा फायदा होतो, कारण चलनवाढ झाल्याने पैशाचे मूल्य कमी होते. म्हणजेच जेवढे कर्ज त्यांनी आधी घेतले असते, त्याच्या प्रमाणात जेव्हा ते मुद्दल- व्याज परत करतात, त्यावेळी त्या पैशांचे मूल्य कमी होते. हे मूल्य कमी झालेले असल्यामुळे धनकोला यामध्ये नुकसान होते. मजुरांवर मात्र चलनवाढीचा विपरीत परिणाम होतो. चलनवाढ जरी होत असेल तरी त्या गतीने मजुरी दरात वाढ होत नाही.
दुसरीकडे चलनवाढ झाल्याने वस्तू महाग होतात. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील मजुरांवर याचा खूप विपरीत परिणाम होतो. असंघटित क्षेत्राच्या तुलनेत संघटित क्षेत्रातील मजुरांवर महागाईचा परिणाम तुलनेने कमी होतो. कारण त्यांना महागाई भत्ता मिळतो. स्वयंरोजगारीवर मात्र चलनवाढीचा परिणाम शून्य प्रमाणात असतो, कारण वस्तू महाग झाल्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते; परंतु त्याच प्रमाणात त्या उत्पन्नाचे मूल्य हे चलनवाढीमुळे कमी होते. पगारदार तसेच पेन्शनधारकांचा जर विचार केला तर त्यांच्यावरसुद्धा चलनवाढीचा विपरीत परिणाम होतो. कारण पगार हा स्थिर असतो. त्यामुळे एकीकडे चलनवाढ होत राहते. मात्र, पगारामध्ये त्या प्रमाणात वाढ होत नसते. त्यामुळे पगारधारकांना तसेच पेन्शनधारकांना चलनवाढीचा तोटा उद्भवतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : पैसा आणि चलन भाग- ३
परकीय व्यापारावरील परिणाम :
चलनवाढीचा आयात-निर्यातीवर परिणाम दिसून येतो. आपल्या देशात जर चलनवाढीचा दर जास्त असेल, तर दुसऱ्या देशातील वस्तू आपल्याला स्वस्त वाटू लागतात. त्यामुळे आपल्या देशातील निर्यात कमी होऊन आयात वाढते. तसेच चलनवाढीचा विनिमय दरावरसुद्धा परिणाम होतो. चलनवाढीचा दर जास्त असल्याने आपल्या देशातील चलनाचे अवमूल्यन होते. आपल्या देशातील चलनाचे मूल्य इतर देशातील चलनांच्या तुलनेत कमी होते. म्हणजेच चलनवाढीचा विनिमय दरावरील परिणाम दुसऱ्या देशांमधील चलनवाढीवरही अवलंबून असतो.