सागर भस्मे

मागील लेखातून आपण ‘स्टॅण्ड अप इंडिया’ आणि ‘स्टार्ट अप इंडिया’ या उपक्रमांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण लघुउद्योग या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण लघुउद्योग म्हणजे काय? सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या व्याख्येमध्ये मधील बदल तसेच लघुउद्योग व कुटीरोद्योग यामधील फरक इत्यादी घटकांबाबत जाणून घेऊया.

semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO

लघुउद्योग म्हणजे काय?

लघुउद्योग हा एक असा व्यवसाय आहे की जो मर्यादित संसाधनांमध्ये चालवला जातो. यामध्ये उद्योगसंस्था या कमी प्रमाणात उत्पादन करतात आणि मर्यादित बाजारपेठेसाठी कार्य करतात. प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये लघुउद्योगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लघु उद्योगांचा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये देखील महत्त्वपूर्ण वाटा आहे. भरपूर रोजगार निर्मिती, संतुलित आर्थिक विकास आणि ग्रामीण क्षेत्रापर्यंत औद्योगिक विकास घडून येण्याकरिता लघुउद्योग हे एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे.

लघु उद्योग हा शब्द केवळ वस्तू उत्पादनच नव्हे, तर सेवा उत्पादनाकरिता देखील वापरण्यात येतो. लघुउद्योगांच्या निर्मितीमुळे कुशल तसेच अकूशल कामगारांना देखील रोजगार उपलब्ध होतो. औद्योगिक उद्योगधंद्यांमधून मिळणाऱ्या एकूण उत्पादनापैकी जवळपास निम्मे उत्पादन हे लघुउद्योगांच्या माध्यमातून मिळते. लोकांच्या दैनंदिन जीवनावश्यक असणाऱ्या विविध महत्त्वाच्या वस्तूंचे उत्पादन हे लघुउद्योगांमधून करण्यात येते. लघु उद्योगांमधून तयार करण्यात आलेल्या वस्तूंची विक्री ही शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. सर्वसामान्य घटकांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने देखील लघुउद्योग अतिशय महत्त्वाचे आहेत. देशामधील दारिद्र्य, आर्थिक विषमता तसेच बेकारी दूर करण्याकरिता लघुउद्योगांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे गरजेचे आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या व्याख्येमध्ये बदल :

२००६ च्या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम कायद्यान्वये या उपक्रमांचे तीन प्रकार पाडले जातात. हे प्रकार त्या उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणाच्या आधारावरून केले जात होते. तसेच यानुसार वस्तू उपक्रम व सेवा उपक्रमांकरीता निकष हे वेगवेगळे होते. या कायद्यान्वये या उद्योगांचे वर्गीकरण हे पुढीलप्रमाणे करण्यात आले.

सूक्ष्म उद्योग : वस्तू उपक्रमाकरिता भांडवली गुंतवणूक मर्यादा ही २५ लाख रुपये पर्यंत तर सेवा उपक्रमाकरिता भांडवली गुंतवणूक मर्यादा ही १० लाख रुपयापर्यंत होती.

लघु उद्योग: वस्तू उपक्रमाकरिता भांडवली गुंतवणूक मर्यादा २५ लाख ते ५ कोटी रुपये तर सेवा उपक्रमाकरिता भांडवल गुंतवणूक मर्यादा १० लाख ते २ कोटी रुपये.

मध्यम उद्योग : वस्तू उपक्रमाकरिता भांडवली गुंतवणूक मर्यादा ५ कोटी ते १० कोटी रुपये तर सेवा उपक्रमाकरिता भांडवल गुंतवणूक मर्यादा २ कोटी ते ५ कोटी रुपये.

असे वर्गीकरण हे २००६ च्या कायद्यान्वये करण्यात आले होते. या वर्गीकरणामध्ये दुरुस्ती सुचवणारे कायदा दुरुस्ती विधेयक हे २०१८ मध्ये लोकसभेत मांडण्यात आले होते. परंतु हे विधेयक लोप पावले. त्यानंतर परत १३ मे २०२० ला आत्मनिर्भर योजनेच्या पहिल्याच घोषणेमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या व्याख्या बदलण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार १ जून २०२० ला सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या नवीन व्याख्या या प्रकाशित करण्यात आल्या व १ जुलै २०२० पासून नवीन वर्गीकरण लागू झाले.

या नवीन वर्गीकरणामध्ये वस्तू आणि सेवा उपक्रमांकरीता निकष हे सारखेच करण्यात आले आहेत. तसेच यामध्ये भांडवली गुंतवणुकीची मर्यादा ही वाढविण्यात आली आहे व उलाढाल मर्यादा हा नवीन निकष यामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. हे नवीन वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे :

सूक्ष्म उद्योग : भांडवली गुंतवणूक मर्यादा १ कोटी रुपये पर्यंत तर उलाढाल मर्यादा ५ कोटी रुपये पर्यंत.

लघुउद्योग : भांडवली गुंतवणूक मर्यादा १ कोटी ते १० कोटी रुपये तर उलाढाल मर्यादा ५ कोटी ते ५० कोटी रुपये

मध्यम उद्योग: भांडवली गुंतवणूक मर्यादा १० कोटी ते ५० कोटी रुपये तर उलाढाल मर्यादा ५० कोटी ते २५० कोटी रुपये.

लघुउद्योग व कुटीरोद्योग यामधील फरक :

लघुउद्योग या संज्ञेमध्ये फक्त लघुउद्योगांचा समावेश न होता यामध्ये कुटीरोद्योग सुद्धा अंतर्भूत असतात. म्हणजे कुटीरोद्योग हे लघुउद्योगच असतात. यामध्ये थोडाफार प्रमाणात बदल असतो तो आपण पुढे बघणार आहे.

१) कुटीरोद्योगामध्ये उत्पादन कार्यात यंत्रशक्तीचा व विद्युत शक्तीचा उपयोग केला जात नाही, परंतु लघुउद्योगांबाबत असे विधान करता येणार नाही कारण कुटीरोद्योगांचे परंपरागत तंत्र वापरून, परंपरागत मालाचे उत्पादन करणारे परंपरागत व्यवसाय असे वर्णन केले जाते.

२) कुटीरोद्योग म्हणजे जसे हातमाग, रेशीम उद्योग, हस्तकला वस्तू तयार करणे, विडी तयार करणे, लोकर व लोकरी कपडे इत्यादी वस्तू तयार करणे तर लघुउद्योग म्हणजे मोटार सायकलची सुट्टे भाग तयार करणे, काचेच्या वस्तू तयार करणे, प्लास्टिक वस्तू तयार करणे, कपडे तयार करणे, रबर, लहान अभियांत्रिकी वस्तू तयार करणे अशा उद्योगांचा समावेश यामध्ये होतो.

३) कुटीरोद्योग हा स्वतःच्या घरामध्ये तर लघुउद्योग हे स्वतंत्र जागेत चालवले जातात. तसेच कुटीरोद्योगांमध्ये सहसा घरातील सदस्य काम करतात व वेतनदार कामगारांची संख्या ही यामध्ये मर्यादित असते. मात्र लघुउद्योगांच्या बाबतीत परिस्थिती याच्या उलट असते.

४) कुटीरोद्योगांकरीता लागणारा कच्चामाल हा सहसा गावातच म्हणजे स्थानिक बाजारपेठेतच उपलब्ध असतो, तर लघुउद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाची बाजारपेठ इतकी मर्यादित नसते. तसेच कुटीरोद्योगामध्ये तयार होणाऱ्या वस्तू या स्थानिक बाजारामध्ये विक्री होतात तर लघुउद्योगांची बाजारपेठ ही अधिक विस्तृत स्वरूपाची असते.