सागर भस्मे

मागील लेखातून आपण पर्यावरण, सामाजिक व गव्हर्नन्स गुंतवणूक या घटकांचा अभ्यास केला. या लेखातून आपण ‘सामाजिक शेअर बाजार’ ही संकल्पना पाहणार आहोत. यामध्ये आपण सामाजिक शेअर बाजार म्हणजे काय? या बाजाराची पार्श्वभूमी, सामाजिक शेअर बाजाराकरिता आवश्यक पात्रता, सामाजिक शेअर बाजारावर असलेल्या प्रमुख जबाबदाऱ्या इत्यादी बाबींबाबत अभ्यास करूया.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

सामाजिक शेअर बाजार म्हणजे काय?

सामाजिक शेअर बाजार हा विद्यमान शेअर बाजारामध्ये एक स्वतंत्र विभाग म्हणून कार्य करतो. पात्र संस्थांना त्यांच्या सामाजिक उपक्रमांसाठी निधी उभारून देणे हा सामाजिक शेअर बाजाराचा महत्त्वाचा उद्देश आहे. याबरोबरच सामाजिक शेअर बाजार हा गुंतवणूकदारांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा देण्यासाठी आणि शेअर बाजाराच्या पारंपरिक संकल्पनेत क्रांती घडवून आणण्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनही काम करतो. तसेच समांतर सामाजिक अर्थव्यवस्था तयार करण्यासाठीही मदत करतो. सामाजिक शेअर बाजाराद्वारे सामाजिक उपक्रमांचे नियमित ऑडिट आणि अहवाल प्रकाशित केला जातो. त्यामुळे व्यवहारातील पारदर्शकता वाढते आणि गुंतवणूकदार तसेच भागधारकांमध्ये विश्वास निर्माण होतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘पर्यावरण, सामाजिक आणि गव्हर्नन्स गुंतवणूक’ ही संकल्पना काय? भारतात याची गरज आहे का?

सामाजिक शेअर बाजाराची पार्श्वभूमी :

सामाजिक शेअर बाजार ही संकल्पना सर्वप्रथम २००३ मध्ये ब्राझीलमध्ये अस्तित्वात आली. भारतामध्ये सन २०१९-२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारने सेबीद्वारे सामाजिक शेअर बाजार स्थापन करण्याची घोषणा केली. या घोषणेला अनुसरून सेबीने टाटा समूहाचे अधिकारी ईशांत हुसैन यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यगटाची स्थापना केली. त्यानंतर २०२० मध्ये सामाजिक शेअर बाजाराबद्दल अधिक तज्ज्ञांचा सल्ला आणि स्पष्टता मिळवण्यासाठी नाबार्डचे माजी अध्यक्ष हर्ष मानवाला यांच्या अंतर्गत पुन्हा एका कार्यगटाची स्थापना करण्यात आली. अलीकडे भारतात सेबीकडून सामाजिक शेअर बाजार सुरू करण्याची अंतिम मान्यता मिळाली आहे.

सामाजिक शेअर बाजाराकरिता आवश्यक पात्रता :

सामाजिक शेअर बाजारामध्ये कोणतीही ना नफा संस्था ( NGO) किंवा अशी सामाजिक संस्था जी सामाजिक कार्य करते, ती समाजिक शेअर बाजारामध्ये नोंदणी करण्यासाठी तसेच सूचीबद्ध होण्यासाठी पात्र असते. मात्र, यामध्ये राजकीय किंवा धार्मिक संघटना, व्यावसायिक किंवा व्यापार संघटना, पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण कंपन्या सामाजिक शेअर बाजारात नोंदणी करण्यास पात्र नसतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात कॉर्पोरेट बाँड मार्केटची स्थिती काय आहे? तो उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने का महत्त्वाचा असतो?

सामाजिक शेअर बाजाराच्या दोन प्रमुख जबाबदाऱ्या :

१) सेबीच्या नियामक तत्वांचे पालन करून सामाजिक संस्थांकरिता निधी उभा करणाऱ्या साधनांचा परिणामकारकपणे वापर करणे.

२) बाजार क्षेत्राच्या एकूण विकासाकरिता क्षमता वृद्धी करणारा प्रकल्प उभा करणे. अशा प्रकल्पाच्यासुद्धा काही जबाबदार्‍या आहेत :

  • या प्रकल्पाद्वारे स्व-नियामक संस्था स्थापन करून ही संस्था माहितीचा साठा करतील आणि त्यामुळे सामाजिक शेअर बाजाराला योग्य ती मदत करणे सोपे होईल.
  • तसेच सामाजिक शेअर बाजारामुळे फायदा होणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांकरिता अहवाल सादर करण्यासाठीच्या मापदंडांची अंमलबजावणी करणे या प्रकल्पाची जबाबदारी आहे.
  • सामाजिक संस्थांनी आणि एनपीओ यांच्यामध्ये सामाजिक शेअर बाजारामध्ये उपलब्ध असलेला निधी उभा करणाऱ्या साधनांची जाणीव निर्माण करणे.

सामाजिक शेअर बाजाराचे कार्य परिणामकारक ठरवण्याकरिता या दोन्ही जबाबदाऱ्या तेवढ्याच महत्त्वाच्या आणि परिणामकारक आहेत.

Story img Loader