सागर भस्मे

गोदावरी नदीची एकूण लांबी १४६५ कि.मी. असून, त्यापैकी महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किलोमीटर आहे. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतरांगेत नाशिक जिल्ह्यात झाला आहे. गोदावरी नदीचे क्षेत्रफळ ३,१३,३८९ चौ. कि.मी. असून, त्यापैकी महाराष्ट्रातील जलवानाचे क्षेत्रफळ १,५२,५८९ चौ.कि.मी. आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, बीड, जालना, नांदेड, परभणी व गडचिरोली या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन पुढे तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून वाहते आणि आंध्र प्रदेशातील राजमुद्रीजवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी ही नदी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे.

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
12 TMC water to be released from Ujani Dam for Solapur Pandharpur
सोलापूर, पंढरपूरसाठी आणखी दोन आवर्तनांस मंजुरी; उजनीतून १२ टीएमसी पाणी सोडणार
due to Atal Setu and Uran Nerul Local are supplying lowpressure water to high rises buildings in Dronagiri
द्रोणागिरी नोड मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा, सिडकोवर टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Action plan for water transport in Mumbai news
मुंबईतील जलवाहतुकीसाठी कृती आराखडा
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?

बंगालच्या उपसागराला मिळण्याअगोदर ती दोन उपनद्यांमध्ये विभाजित होते; ज्यांना वशिष्ठ गोदावरी व गौतमी गोदावरी या नावांनी ओळखले जाते. गौतमी गोदावरीचे पुन्हा गौतमी व निलारेवू, असे दोन उपविभाग तयार होतात. त्याचप्रमाणे वशिष्ठ गोदावरीचेही वशिष्ठ व वैनतेय, असे दोन उपविभाग तयार होतात.

गोदावरी नदीला उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या : प्राणहिता, शिवना, कादवा, इंद्रावती, दक्षिण पूर्णा, दुधना.

गोदावरी नदीला दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या : सिंदफना, मांजरा, प्रवरा, बिंदुसरा, दारणा.

उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्या :

कादवा : कादवा नदीचा उगम सारद गावाजवळील वनी डोंगररांगांमध्ये होतो. कादवा नदीची लांबी ७४ कि.मी. असून, नदीचा प्रवास फक्त नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी यांच्यापुरताच मर्यादित आहे.

शिवना : शिवना नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगेत बोलनाथ गावाजवळ झाला आहे. शिवना नदीची एकूण लांबी ११० कि.मी. असून, नदीचा प्रवास नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांतून होतो.

दक्षिण पूर्णा : दक्षिण पूर्णा नदीचा उगम हा अजिंठा डोंगररांगांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा वनक्षेत्रात झाला आहे. दक्षिण पूर्णा नदीची एकूण लांबी २७३ कि.मी. असून, तिचा प्रवास हा औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यांमधून होतो. अंजना, गिरीजा, जीवनरेखा, कापरा, दुधना, घामना व खेळणा या दक्षिण पूर्णा नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत; तसेच या नदीवर खडकपूर्णा, येलदरी व सिद्धेश्वर यांसारखे मोठे प्रकल्प आहेत.

दुधना : दुधना नदीचा उगम हा वेरूळ डोंगररांगांमध्ये होतो. दुधना नदीची एकूण लांबी १७० कि.मी. असून, ती औरंगाबाद, जालना व परभणी या जिल्ह्यांतून प्रवास करते. तसेच दुधना नदीच्या कल्याण, कुंडलिका, सुकना, कसुरा इत्यादी उपनद्या आहेत.

इंद्रावती : इंद्रावती नदीचा उगम हा कालाहंडी, ओडिसा येथे होतो. इंद्रावती नदीची एकूण लांबी ५३५ कि.मी. असून, तिची महाराष्ट्रातील लांबी १२९ कि.मी आहे. इंद्रावती नदीचा प्रवास ओडिसा, छत्तीसगढ व महाराष्ट्रामधून होतो. इंद्रावती नदीवर चित्रकूट नावाचा धबधबा असून, तेलंगणा राज्याच्या सीमेवर गडचिरोलीत डाव्या बाजूने ती गोदावरीला येऊन मिळते.

प्राणहिता : वर्धा व वैनगंगा या दोन नद्यांच्या संगमानंतर त्यांना प्राणहिता, असे म्हटले जाते. या दोन नद्यांचा संगम चपराळा येथे होतो. प्राणहिता नदीची एकूण लांबी १२० कि.मी. आहे. प्राणहिता नदी महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यांच्या सीमेवरून प्रवास करत असताना गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंजवळील नगरम येथे उत्तरेकडून गोदावरी नदीला जाऊन मिळते.

दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्या

सिंदफणा : सिंदफणा नदीचा उगम बीड जिल्ह्यातील चिंचोली गावात झालेला आहे. सिंदफणा नदीची लांबी १२२ कि.मी. असून, नदीकाठावर माजलगावमध्ये माजलगाव प्रकल्प आहे. ही नदी मंजरथ गावाजवळ गोदावरी नदीला दक्षिणेकडून येऊन मिळते.

दारणा : दारणा नदीचा उगम हा कुलगिरीदुर्गाजवळ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे होतो. या नदीची एकूण लांबी ८८ कि.मी. आहे.

प्रवरा : प्रवरा नदीचा उगम अहमदनगर जिल्ह्यातिल अकोले तालुक्यात होतो. या नदीची एकूण लांबी २०८ कि.मी आहे. प्रवरा नदीकाठावर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर वसलेलं आहे. प्रवरा नदीचा प्रवास हा फक्त अहमदनगर जिल्ह्यापुरता मर्यादित असून, प्रवरा नदीच्या मुळा व आढळा या उपनद्या आहेत.

मांजरा : मांजरा नदीचा उगम पाटोदा तालुका, बीड (जिल्हा) बालाघाट डोंगररांगांमध्ये होत असून, तिची लांबी ७२४ कि.मी. आहे. या नदीचे पाणलोट क्षेत्र ३०,८८४ किलोमीटर आहे. मांजरा नदीचा प्रवास हा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमधून होतो. मांजरा नदीच्या तावरजा, तेरणा, केज, रेना, लिंबा, चौसाळा, धरणी, लेंडी, मन्याड या उपनद्या आहेत.

बिंदुसरा : बिंदुसरा नदीचा उगम बालघाट डोंगररांगेत मांजरसुबा गावाजवळ झाला आहे. बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण या नदीच्या काठावर येते. बिंदुसरा ही सिंदफना नदीची उपनदी असून, ती पेडगावजवळ सिंदफणा नदीच्या उजव्या तीरावर जाऊन मिळते.

Story img Loader