सागर भस्मे

मागील लेखात आपण खडकाचे अपक्षय होणे म्हणजे काय? आणि अपक्षयाच्या प्रकारांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपांबाबत जाणून घेऊया.

Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

व्ही आकाराची दरी : दोन टेकड्या, डोंगर किंवा पर्वत यांमधील लांबट, अरूंद व खोलगट भूभागास दरी असे म्हणतात. जमिनीचे नदीतील पाण्यामुळे आणि प्रवाहाबरोबर वाहून येत असलेले दगड, धोंडे, वाळू इत्यादी घटकांमुळे नदीपात्राचा तळ भाग खोल खणला जातो. नदीच्या प्रवाह मार्गात तळावर व कडावर पाण्याच्या आणि दगड गोट्यांच्या घर्षण होण्याच्या प्रक्रियेत काठापेक्षा तळावर अधिक घर्षण झाल्याने नदीचे तळ खोल होत जाते आणि काही काळानंतर नदीच्या पात्राला व्ही अक्षराचा आकार प्राप्त होतो. त्या आकाराला ‘व्ही आकाराची दरी’ असे म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : खडकाचे अपक्षय होणे म्हणजे काय? अपक्षयाचे प्रकार कोणते?

घळई : नदीपात्रामुळे काठांच्या क्षरणापेक्षा (पार्श्व क्षरण) अधोगामी क्षरण (शीर्ष क्षरण) जास्त प्रमाणात झाल्यास रुंदीच्या मानाने खोली अधिक होते. त्याला ‘व्ही आकाराची घळई’ असे म्हणतात. भारतामध्ये प्रामुख्याने नर्मदा, कृष्णा, सतलज, चंबळ, सिंधू या नद्यांनी त्यांच्या युवा अवस्थेत खोल घळ्याची निर्मिती केली आहे.

निदरी : दरीत दरी निर्माण होणाऱ्या क्रियांना ‘निदरी’ असे म्हणतात. जेव्हा नदीपात्रामध्ये खोल दऱ्यांची निर्मिती होते आणि त्या दरीतच तशीच दुसऱ्या प्रकारची घळई निर्माण होते, तेव्हा तिच्या खोलीमध्ये वाढ होते, त्याला ‘निदरी’ असे म्हणतात.

धावत्या : नदीपात्रात जर कठीण आणि मृदू खडकाचे थर जवळजवळ असतील, तर अशावेळी कठीण खडकांच्या प्रमाणात मृदू खडकाची झिज मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दोन खडकांच्या उंचीमध्ये फरक आढळतो. यावेळी नदीचे पात्र ओबडधोबड होऊन कमी जास्त उंची बनते व नदीपात्रामध्ये पायऱ्या-पायऱ्यांसारखी संरचना तयार होते. या संरचनेमुळे या भागात लाटांसारखी स्थिती निर्माण होते. तसेच पाणी वेगाने खळखळाट करत पुढे वाहते, म्हणून त्याला ‘धावत्या’ असे म्हणतात. धबधब्यांच्या पायथ्यालगतच्या भागात ‘धावत्या’ निर्माण झालेल्या दिसतात, कारण धबधब्याच्या पायथ्याच्या भागात पाण्याच्या आघातामुळे खड्ड्यांची निर्मिती होते. कालांतराने ऊर्ध्व खडकांची झीज होऊन धबधब्याचा खालचा खडक कोसळतो आणि धबधबा मागे-मागे सरकतो.

धबधबा : नदीच्या प्रवाहमार्गात असलेली निरनिराळ्या प्रकारची भूस्तररचना धबधब्यांच्या निर्मितीस प्रामुख्याने कारणीभूत ठरते. नदीपात्रामध्ये कठीण खडक आडवा किंवा क्षितिज समांतर असल्यास आणि त्याच्यानंतर मृदू खडक असेल तर नदीपात्रामध्ये कठीण खडकाचा एक कडा तयार होतो. त्या कड्यावरून नदीचे पाणी कोसळल्याने धबधब्याची निर्मिती होते. यावेळी नदीचे पाणी उंचावरून खाली पडल्याने तळातील मृदू खडकाचे क्षरण होते. धबधब्याची उंची वाढत जाते.

रांजणखळगे : नदीच्या पात्रामध्ये कठीण आणि मृदू खडकाचे एका पाठोपाठ एक असे थर असल्यास वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे मृदू खडकाचे क्षरण होते आणि रांजणखळग्यांची निर्मिती होते. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वाहत येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच राहतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : अधातू खनिजे म्हणजे काय? भारतात ही खनिजे कुठे आढळतात?

गुंफित गिरीपाद : गुंफित गिरीपातमध्ये नदीला वळणे घ्यावी लागतात. कारण डोंगराच्या बाहेरील भाग एकमेकांमध्ये ज्या प्रकारे हाताची बोटे गुंतवावी तशाप्रकारे गुंतल्यासारखे असतात. म्हणून याला गुंफित गिरीपात असे म्हणतात.

नागमोडी वळणे : हे नदीच्या खनन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. मंद गतीने वाहणाऱ्या नदीच्या प्रवाह मार्गात एखादा अडथळा आल्यास तेथे नदी आपली दिशा बदलते. वळणामधून नदीचा प्रवाह वाहत असताना बाहेरच्या बाजूला अपक्षरण मोठ्या प्रमाणात होते.

नालाकृती सरोवरे : काही वेळेस पूर्वजन्य परिस्थितीमुळे नागमोडी वळणांमधील प्रवाह वळणात न वाहता सरळ मार्गाने वाहू लागतो आणि प्रवाहापासून अलग झालेली वळण C आकाराची दिसतात, म्हणून त्यांना ‘नालाकृती’ किंवा ‘चंद्रकृती’ सरोवर असे म्हणतात.