सागर भस्मे

मागील लेखातून आपण नदीच्या निक्षेपणातून निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण हिमनदीच्या निक्षेपणातून निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी माहिती घेऊ या.

Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
How many hurdles in India way to host Olympics 2036
ऑलिम्पिक २०३६ आयोजनासाठी भारताच्या मार्गात किती अडथळे? सौदी, तुर्कीये, कतारचे आव्हान किती खडतर?
Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?

हिमोढ कटक (Eskers)

हिमनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून निर्माण होणाऱ्या लांब कमी उंचीच्या अरुंद टेकड्यांना ‘हिमोढ कटक’, असे म्हणतात. हिमोढ कटक याचा अर्थ आयरिश भाषेत ‘एस्कस’ म्हणजे ‘मार्ग’ असा होतो. फिनलँड, स्वीडन या देशांमध्ये याचा वापर वाट वा मार्गासाठी केला जातो. ज्या वेळेस जलप्रवाहाबरोबर गाळाचे वहन होते आणि मार्गात अडथळा येऊन, त्यांचा वेग मंदावतो आणि तिथेच गाळाचे निक्षेपण होते व हिमोढची निर्मिती होते.

हिमनदीच्या पात्रात मोठ्या आकाराच्या दगडांपासून चिकणमातीच्या कणाइतक्या बारीक गाळाचा ढीग होतो. तळाशी जाऊन पोहोचणारे दगड हिमनदीच्या प्रवाहामुळे उताराकडे ढकलले जातात आणि त्यांच्यामुळे हिमनदीच्या खोऱ्याचा तळभाग खरवडला जातो. त्यातील खडकांचे लहान-मोठे तुकडे होऊन नदीच्या पात्रामध्ये साठवतात. हिमनदीच्या पात्रात तिच्या तळाशी हिमाचे वितळणे आणि पुनर्गोठण या क्रिया आळीपाळीने चालू असतात. त्यामुळेही तळाच्या खडकांना तडे पडतात. त्यामुळे काही काळानंतर खडकांचे तुकडे सुटे सुटे होऊन हिमनदीच्या पात्रात वाहू लागतात. नद्यांची निक्षेपणाची भूरूपे ही मंद उतार असणाऱ्या सखल प्रदेशांमध्ये आढळतात.

कंकतगिरी (Kames)

स्वतःबरोबर आणलेला गाळ हा नदीपात्राच्या भेगांमध्ये जाऊन बसतो आणि काही काळानंतर त्या भेगा भरून निघतात. ही क्रिया सतत चालू असल्याने त्या ठिकाणी गाळाच्या लहान लहान टेकड्यांची निर्मिती होते. ज्या वेळेस हिम पूर्णपणे वितळलेले असते, त्या वेळेस त्या टेकड्या उघड्या पडतात आणि त्यांना ‘कंकतगिरी’ असे म्हणतात.

हिमजलोढ मैदान (Out Wash Plain)

हिमनदीच्या सुरुवातीच्या भागापासून उगम पावणाऱ्या नद्यांद्वारे वाहून आणलेला गाळ नदीच्या पात्रामध्ये निक्षेपित होत राहतो आणि विस्तृत असे मैदान हिमनदीच्या अग्रभागी तयार होते. त्याला ‘हिमजलोढ मैदान’ असे म्हणतात. आइसलँडमध्ये सामान्यतः हिमजलोढ मैदान आढळतात.

हिमोढगिरी (Drumlins)

हिमनदीच्या निक्षेपणातून तयार होणाऱ्या उलट्या बोटीच्या आकाराच्या टेकड्यांना ‘हिमोढगिरी’ असे म्हणतात. या टेकड्यांची साधारण उंची ही ६० ते ९० मीटरपर्यंत असू शकते. ही हिमोढगिरी आकार लंबगोलाकार आणि एक बाजूला निमुळता झालेला असतो. हिमनदीने वाहून आणलेल्या रेतीयुक्त गाळाने हिमोढगिरी तयार होते. हिमोढगिरीचा मोठा भाग हिमनदी ज्या दिशेत वाहते, त्या दिशेत असतो.

हिमोढगिरीचा सुरुवातीच्या बाजूचा उतार काहीसा तीव्र असतो आणि दुसर्‍या बाजूला तो मंद असतो. काही हिमोढगिरीचा अंतर्गत भाग खडकाळ असून, त्या खडकावर गाळाचा पातळ थर तयार होतो, त्याला खडकाळ हिमोढगिरी असे म्हणतात. काही ठिकाणी हिमोढगिरीच्या रांगा असतात आणि त्या एकमेकींना समांतर असतात. सामान्यत: त्यांचे हजारोंचे समूह आढळतात. अनेकदा ते पट्ट्यांच्या स्वरूपात मांडल्यासारखे दिसतात. हिमोढगिरी भागात काही ठिकाणी सरोवरे तयार झाली असून, इंग्लंडमध्ये अशी सरोवरे मोठ्या प्रमाणात आहेत.

हिमानी गाळाचे मैदान (Till Plain)

हिमनदीचा एक मोठा भाग त्याच्या मुख्य भागापासून अलग होऊन वितळतो, तेव्हा त्यातून वाहून आणलेला गाळ तेथे जमा होतो आणि हिमनदीचे विस्तृत हिमानी गाळाचे मैदान तयार होते. हिमानी गाळाचे मैदान संयुक्त संस्थानाच्या पश्चिम मध्य भागात पसरले आहे. या भागात बऱ्याच प्रमाणात उंच-सखलपणा असल्याने या मैदानाला झोळ किंवा फुगार स्थळरूप असेही म्हणतात.

हिमोढ (Moraines)

हिमनदीने स्वतःबरोबर वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून पात्रामध्ये मोठा ढीग निर्माण होतो, त्याला ‘हिमोढ’ असे म्हणतात. नदीच्या पात्रामध्ये जिथे गाळाचे संचयन झालेले आहे. त्यानुसार हिमोढचे पार्श्व हिमोढ, मध्य हिमोढ, हिमक्षयन हिमोढ, तळ हिमोढ, अंत्य हिमोढ व माघारीचे मोड, असे सहा प्रकार पडतात.