सागर भस्मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Koppen Climate Classification System : हवामानाचे वर्गीकरण करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणार्या प्रणालींपैकी एक म्हणजे कोपेनचे हवामान वर्गीकरण, २०व्या शतकाच्या सुरुवातीला जर्मन हवामानशास्त्रज्ञ व्लादिमीर कोपेन यांनी विकसित केले. कोपेनची प्रणाली तापमान, पर्जन्य आणि वनस्पतींच्या नमुन्यांवर आधारित हवामानाचे वर्गीकरण करण्यासाठी एक व्यापक फ्रेमवर्क प्रदान करते. हे हवामानशास्त्राच्या क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली आणि व्यापकपणे स्वीकारलेल्या प्रणालींपैकी एक आहे.
कोपेनची हवामान वर्गीकरण प्रणाली जगातील हवामानाची पाच मुख्य गटांमध्ये विभागणी करते, ती अनुक्रमे A, B, C, D आणि E. प्रत्येक गटाला पुढील उपश्रेणींमध्ये विभागले गेले आहेत, जे प्रत्येक हवामानाच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक विशिष्ट माहिती प्रदान करते. वर्गीकरणामध्ये तापमान आणि पर्जन्यमानातील सरासरी आणि हंगामी फरक तसेच अक्षांश, उंची आणि पाण्याच्या शरीराची समीपता यांसारखे घटक विचारात घेतले जातात.
१९१८ मध्ये कोपेनने भारताचे वेगवेगळ्या हवामान प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव मांडला व वार्षिक मासिक तापमान, पावसाचे प्रमाण, स्थानिक वनस्पती हे हवामान क्षेत्राच्या विभाजनाचा आधार मानले. हवामान प्रदेशाच्या मर्यादा ठरवताना त्यांनी पुढील बाबी विचारात घेतल्या, मासिक सरासरी तापमान, मासिक सरासरी पर्जन्यमान आणि वार्षिक सरासरी पर्जन्यमान या बाबींना अनुसरून देशाची विभागणी तीन विस्तीर्ण हवामान प्रदेशात केली.
- आर्द्र हवामान
- शुष्क हवामान
- अर्धशुष्क हवामान
त्यांनी भारतातील हवामानाची पुढील भागात विभागणी केली.
उष्ण कटिबंधीय मान्सून प्रकार (Amw)
या प्रदेशात मलबार आणि कोकण किनारपट्टीचा समावेश होत असून हिवाळा सहसा कोरडा असतो, परंतु उन्हाळ्यात ३०० सेंटिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले या प्रकारात आढळतात.
उष्ट कटिबंधीय सॅव्हाना प्रकार क्षेत्र (Aw)
हे बहुतेक सर्व द्वीपकल्पीय पठार प्रदेश व्यापत असून या प्रदेशामध्ये हिवाळा कोरडा आणि उन्हाळा आर्द्र असतो. मासिक सरासरी तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते.
उष्ण कटिबंधीय कोरडा उन्हाळा (As)
असे वातावरण कोरम मंडळ किनाऱ्यावर आढळत असून हिवाळ्यात या ठिकाणी पाऊस पडतो. या प्रदेशात उष्णकटिबंधीय हवामान आढळते आणि परतीच्या मान्सूनद्वारे पर्जन्य होते.
अर्ध-शुष्क गवताळ प्रदेश स्टेपी हवामान क्षेत्र (Bshw)
राजस्थान आणि हरयाणाचे काही भाग अर्धशुष्क गवताळ प्रदेश हवामान क्षेत्रात येतात. बाष्पीभवनाचा दर उच्च असून वार्षिक तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असून महाराष्ट्र व कर्नाटक पर्जन्यछायेच्या प्रदेशांचा या भागामध्ये समावेश होतो.
उष्ण वाळवंट हवामान क्षेत्र (BWhw)
यामध्ये पश्चिम राजस्थानच्या प्रदेशाचा समावेश होत असून या भागात जास्त तापमान असते आणि पाऊस खूपच कमी असतो म्हणजे पर्जन्यमान १२ सेंटिमीटर पेक्षाही कमी असते.
मान्सूनशुष्क हिवाळा प्रदेश (Cwg)
भारतातील मैदानी प्रदेश या हवामान क्षेत्रात येत असून पर्जन्यमान ७५ सेमीपेक्षा जास्त असते. या प्रदेशात तीनही ऋतू स्पष्टपणे जाणवतात. भारताच्या महामैदानी राज्याव्यतिरिक्त आसाम, मेघालय, मणिपूर आणि नागालॅण्ड या प्रदेशात काही प्रमाणात अशा प्रकारचे हवामान आढळते.
थंड आर्द्र हिवाळी प्रकारचे हवामान (Dcf)
या प्रकारचे हवामान भारताच्या उत्तर-पूर्व भागात आढळत असून सर्व ऋतूंमध्ये या प्रदेशात पाऊस पडतो. उन्हाळा अल्पकालीन असून हिवाळा कडक व दीर्घकाळ असतो.
ध्रुवीय प्रकारचे हवामान (EF)
यामध्ये काश्मीर आणि लगतच्या पर्वतरांगा समाविष्ट होत असून येथील सर्वोच्च तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत जाते. हा प्रदेश हिमवर्षाव होणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
टुंड्रा प्रकारचे हवामान असलेले क्षेत्र (ET)
असे हवामान त्या पर्वतीय प्रदेशात आढळते, जिथे तापमान शून्य डिग्री सेल्सिअस ते १० अंश सेल्सिअसपर्यंत असते. आणि वाढत्या उंचीसह तापमान कमी होते. भारतामध्ये उत्तराखंडमधील प्रदेशात या प्रकारचे हवामान आढळते.