Krishna River System In Marathi : कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. हे स्थान पश्चिम घाटात आहे. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार करता कृष्णाचे खोरे ८% एवढ्या भागावर पसरले आहे. कृष्णा नदीची एकूण लांबी १,४०० किमी एवढी असून ते भारतातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे आहे. जेथे कृष्णा नदीचा उगम होतो, त्या क्षेत्रात पश्चिमेकडे वाहणाऱ्या सावित्री व गायत्री या नद्या, तसेच पूर्वेकडे वाहणाऱ्या कोयना व वेण्णा या नद्यांचा उगम होतो. कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यांमधून वाहते व बंगालच्या उपसागराला मिळते व तेथे त्रिभूज प्रदेश तयार करते. महाराष्ट्रात उगम झाल्यानंतर तिची सुरुवातीची दिशा वायव्येकडून आग्नेयेकडे अशी आहे. मात्र, कर्नाटकमध्ये प्रवेश केल्यानंतर ती पूर्व दिशेला वाहते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली

almatti dam flood
कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
kalyan water pipeline burst near patripul
कल्याणमध्ये पत्रीपूलजवळ जलवाहिनी फुटली, शेकडो लीटर पाण्याची नासाडी
Water supply in Gondia district to remain closed for two days
सावधान! गोंदिया जिल्ह्यातील ‘या’ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार
water cut, Bhiwandi , Mumbai, Thane, water cut Mumbai,
मुंबईसह ठाणे, भिवंडीत १४, १५ डिसेंबर रोजी १५ टक्के पाणीकपात
water storage india
देशात किती पाणी उपलब्ध आणि किती पाणी वापरण्यायोग्य? केंद्रीय जल आयोगाच्या अहवालात काय?
pune Municipal Corporation started thinking of demolishing bridge near famous Omkareshwar temple in central part of city
ओंकारेश्वर जवळचा ‘ तो ‘ पूल पाडणार ? वाहतुकीसाठी झाला धोकादायक
Water supply cut off in Malad Mumbai news
मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

कृष्णा नदीला उजवीकडून म्हणजे दक्षिण दिशेने कोयना, वारणा, पंचगंगा, घटप्रभा, वेण्णा. हिरण्यकेशी, तुंगभद्रा, वेद्रावती, दुधगंगा आणि मलप्रभा या नद्या येऊन मिळतात. तर डावीकडून म्हणजे उत्तर दिशेने भीमा, दिंडी, मूशी, येरळा, हलिआ, पलेरु, मुन्नेर या नद्या येऊन मिळतात.

कोयना

कोयना नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेला असून कोयना नदीची एकूण लांबी ११९ किलोमीटर आहे. या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. याशिवाय शिवसागर नावाचा एक मोठा जलाशय या नदीवर आहे. आशिया खंडातील एकमेव भूमीगत विजगृह कोयना प्रकल्पावर आहे. कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम ज्याला प्रितीसंगम म्हणून ओळखले जाते, तो कराड येथे आहे. कोयना नदीचे पूर्वेकडे वाहणारे पाणी पश्चिमेकडे वळवून पोफळी येथे विजनिर्मिती केली जाते.

वारणा

या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर समुद्रसपाटीपासून ९१४ मीटर उंचीच्या प्रदेशात होतो. वारणा नदी सुरुवातीला वायव्येकडून आग्नेयेकडे व नंतर पूर्वेकडे वाहते. ही नदी कृष्णा नदीला सांगली शहराच्या नैऋत्येस सुमारे दीड किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. वारणा नदी चांदोली धरणासाठी प्रसिद्ध आहे.

पंचगंगा

पंचगंगा या नावावरुनच समजते की हा पाच नद्यांचा संगम आहे. त्या नद्या अनुक्रमे भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी व गुप्त सरस्वती या आहेत. पंचगंगेची उपनदी असलेल्या भोगावती नदीवर राधानगरी हे प्रसिद्ध धरण बांधले आहे. ज्याला लक्ष्मीसागर म्हणून ओळखले जाते. इचलकरंजी व कोल्हापूर ही शहरे पंचगंगा नदीवर वसली आहेत. पंचगंगा नदी नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीला उजव्या काठावर मिळते.

वेण्णा नदी

एकूण ६४ किलोमीटर लांब असलेली ही नदी पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या रांगेत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावते.

मलप्रभा नदी

३०४ कि.मी. लांब असणारी ही नदी कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यात पश्चिम घाटात उगम पावते. ती कृष्णा नदीला दक्षिणेकडून म्हणजेच उजव्या किनाऱ्यावर मिळते.

घटप्रभा नदी

या नदीचा उगम सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील पारबोली नावाच्या एका गावात होतो. घटप्रभा नदीची एकूण लांबी २८३ कि.मी. एवढी असून ती महाराष्ट्र व कर्नाटकमधील सिमा निश्चीत करते. हिरण्यकेशी, ताम्रपर्णी या घटप्रभा नदीच्या उपनद्या आहेत. घटप्रभा नदी कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील कुंडलीग्राम येथे दक्षिणेकडून म्हणजे उजव्या बाजूने कृष्णा नदीला मिळते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : गंगा नदी प्रणाली

दुधगंगा नदी

या नदीचा उगम सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेत झाला आहे. ती कृष्णा नदीला मिळण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून पूर्वेकडे वाहते. त्यानंतर दूधगंगा कर्नाटक व महाराष्ट्राच्या सिमेवरुन वाहत जाऊन बेळगाव जिल्ह्यातील एकरुंबे गावाजवळ उजव्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून कृष्णा नदीला मिळते.

तुंगभद्रा नदी

कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्याच्या कुंडली या गावाजवळ तुंग व भद्रा या नद्यांच्या संगमामधून तुंगभद्रा नदीची निर्मिती होते. या नदीची एकूण लांबी ५३१ किलोमीटर एवढी असून या नदीचे खोरे कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पसरले आहे. कृष्णा नदीला दक्षिणेकडून म्हणजेच उजव्या बाजूने ज्या नद्या मिळतात, त्यापैकी तुंगभद्रा ही सर्वात मोठी नदी आहे. महाभारतामध्ये या नदीचे नाव ‘पंपा नदी’ असे होते. तेलंगणामधील मेहबुबनगर जिल्ह्यात आलमपुर नावाच्या ठिकाणी उजव्या बाजूने ही नदी कृष्णा नदीला मिळते.

Story img Loader