सागर भस्मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील लेखातून आपण भीमा नदीप्रणालीविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण महानदीविषयी जाणून घेऊ या. भारतीय द्वीपकल्प पठारावरील महानदी ही महत्त्वाची नदी मानली जाते जाते. महानदीचा उगम छत्तीसगडमध्ये रायपूर जिल्ह्यात असलेल्या सिंहवाजवळील दंडकारण्यामध्ये ४४२ मीटर उंचीवर झाला आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राचा भूगोल : भीमा नदीप्रणाली
महानदीची एकूण लांबी ८०० किलोमीटर असून, तिचे एकूण क्षेत्रफळ ३९ हजार ३३ चौ.किमी आहे. भारताच्या छत्तीसगड व ओडिशा या राज्यांतून वाहणारी आणि बंगालच्या उपसागाला मिळणारी ही एक महत्त्वाची नदी आहे. पुराच्या वेळी या नदीच्या पाण्याचा वेग अतिशय जास्त असल्यामुळे या नदीला ‘महानदी’ किंवा ‘मोठी नदी’ असे म्हटले जाते. तसेच ‘चित्रोत्पला’ असाही या नदीचा नामोल्लेख केलेला आढळतो.
पहिल्या टप्प्यामध्ये महानदी ईशान्येकडे वाहते आणि नंतर ती सेवरी नारायणच्या पुढे पूर्वेकडे वाहत जाऊन ओडिशा राज्यात जाते. ओडिशा राज्यामध्ये महानदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात. ओरिसा राज्यात महानदीवर संबळपूरजवळ हिराकुंड प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पुढे महानदी दक्षिण वाहिनी नदी बनते आणि घळ्यांमधून नागमोडी वळणाने वाहू लागते.
महानदीच्या प्रवाहामध्ये छत्तीसगड व ओडिशा या दोन राज्यांचा समावेश होतो. महानदीच्या क्षेत्रात छत्तीसगडमधील दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड व बस्तर या जिल्ह्यांचा काही भाग आणि ओडिशातील संबळपूर, बोलणगीर, कलहंडी, देनकनल, पुरी व कटक या जिल्ह्यांचा समावेश होतो. शेवटी कटक जिल्ह्याच्या पश्चिम भागात महानदी त्रिभुज प्रदेश निर्माण करून, फॉल्स दिवी पॉइंटजवळ बंगालच्या उपसागराला मिळते. ओडिशामधील कटक जिल्ह्यातून महानदी अनेक शाखांमध्ये विभागली गेल्याने सुमारे २४० किमी रुंदीच्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. महानदीला डाव्या किनाऱ्यावरून इब, मंड, हसदो व शिवनाथ या नद्या मिळतात; तर उजव्या किनाऱ्यावरून औंग, जोंक व तेल या नद्या मिळतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील मृदा आणि तिचे प्रकार
महानदीच्या महत्त्वाच्या उपनद्या :
शिवनाथ : शिवनाथ नदी छत्तीसगडमधील सर्वांत महत्त्वाची नदी असून, तिची एकूण लांबी २९० किमी आहे; तर पाणलोट क्षेत्र २२ हजार ४८४ किमी आहे. शिवनाथ नदी ही महानदीची सर्वांत मोठी उपनदी असून, ती छत्तीसगड राज्यातील राजनंदगावच्या ६२५ मीटर उंचीवर पानाबारस टेकडीवरून उगम पावते. या नदीचा प्रवाह राजनंदगाव, दुर्ग, बिलासपूर व जांजगीर-चंपा जिल्ह्यांतून जातो. शेवटी ती जांजगीर जिल्ह्यातील सोन लोहारसीजवळ रायपूरच्या सीमेवर महानदीला जाऊन मिळते. हंप, मणियारी, खारून, अर्पा, तांदुला, लीलागर, अमनेरा, जामुनियन इत्यादी तिच्या प्रमुख उपनद्या आहेत.
मंड : मंड नदीचा उगम छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील मेणबत गावामध्ये झालेला आहे. या नदीची एकूण लांबी १५५ किमी असून, ही नदी जांजगीर-चांपा जिल्ह्यातील चंद्रपूरजवळ महानदीला मिळते.
हसदो : हसदो नदीचा उगम महिंद्रगड तहसीलमधील कोरिया टेकड्यांजवळ रामगड येथून झालेला आहे. ही नदी छत्तीसगड राज्यातील पोरगा कोळसा क्षेत्र आणि चंपा मैदानावर वाहणारी एक महत्त्वाची उपनदी आहे. ती चंपा येथून वाहत जाऊन पुढे शिवनारायणपासून आठ मैल अंतरावर महानदीला जाऊन मिळते. हसदोचा उत्तरेकडील भाग अरुंद व खोल आहे. ही नदी रिप वाळूसाठी प्रसिद्ध आहे.