सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारतातील वनसंपत्तीविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण भारतातील लोकसंख्येची सामान्य वैशिष्ट्ये तसेच लोकसंख्येचे वितरण आणि घनता प्रभावित करणारे प्रमुख घटक कोणते याविषयी जाणून घेऊया.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

भारतीय लोकसंख्येचा आकार (Size of Indian population) :

२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार एकूण १,२१०.२ दशलक्ष लोकसंख्येसह, भारत हा जगातील (केवळ चीनच्या खालोखाल, ज्याची २०१० मध्ये १,३४१ दशलक्ष लोकसंख्या होती), दुसरा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे. भारत केवळ २.४ टक्के भूभाग व्यापतो. चीनमध्ये राहणाऱ्या जगाच्या लोकसंख्येच्या १९.४ टक्के लोकसंख्येच्या तुलनेत १७.५ टक्के लोक भारतात आहेत. अशा प्रकारे जगातील प्रत्येक सहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती भारतीय आहे. सुमारे ३०८.७ दशलक्ष लोकसंख्येसह, यूएसए लोकसंख्येच्या आकाराच्या बाबतीत भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे.

भारत आणि यूएसए यांच्या लोकसंख्येमध्ये ९०१ दशलक्ष लोकसंख्येचे अंतर आहे, जे यूएसएच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे तिप्पट आहे. भारत आणि चीनच्या लोकसंख्येमधील अंतर केवळ १३०.८ दशलक्ष (म्हणजे १.९%) आहे, तर भारत आणि यूएसए यांच्या लोकसंख्येमध्ये ९०१ दशलक्ष (म्हणजे १३%) आहे. भारताची लोकसंख्या यूएसए, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, बांगलादेश आणि जपानच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे. भारताच्या तुलनेत प्रमुख देशांचे क्षेत्रफळ बघितले तर जगातील रशियन फेडरेशन भारतापेक्षा पाच पट मोठा आहे, कॅनडा तिप्पट आहे, यूएसए २.८ पट आहे, ब्राझील २.६ पट आणि ऑस्ट्रेलिया २.३ पट आहे; पण त्यांची एकत्रित लोकसंख्या फक्त भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ६३ टक्के आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील कृषीची विशिष्ट्ये कोणती? देशात किती प्रकारची हंगामी पिके घेतली जातात?

लोकसंख्येची जनगणना :

जगभरातील लोकसंख्येची माहिती जनगणनेद्वारे गोळा केली जाते. जनगणना ही लोकसंख्येच्या विस्तृत सामाजिक आणि आर्थिक गुणधर्मांच्या विशिष्टतेचा आराखडा देते. १८७२ साली भारतात जनगणना सुरू झाली. जरी ती एक शुभ सुरुवात म्हणून चिन्हांकित केली गेली असली, तरी त्यात संपूर्ण देश समाविष्ट केला गेला नव्हता. संपूर्ण देशाला कव्हर करणारी आणि महत्त्वाची लोकसंख्याशास्त्रीय माहिती देणारी पहिली संपूर्ण आणि समकालिक जनगणना १८८१ मध्ये आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून भारतात दर दहा वर्षांनी नियमितपणे जनगणना केली जाते. २०११ ची जनगणना ही १८७२ पासून गणली जाणारी भारताची १५ वी आणि स्वातंत्र्यानंतरची सातवी जनगणना आहे. जनगणनेच्या डेटाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचे वेळापत्रक आणि प्रश्नावलीमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. भारताची लोकसंख्या इतकी मोठी आहे की, काही राज्यांची लोकसंख्या जगातील अनेक मोठ्या देशांच्या एकूण लोकसंख्येएवढी किंवा जवळजवळ तितकीच आहे.

भारताच्या लोकसंख्येचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे त्याचे असमान वितरण. एकीकडे भारताची लोकसंख्या अत्यंत शहरीकरण आणि औद्योगिक क्षेत्र आणि उच्च कृषी उत्पादकता असलेल्या भागात केंद्रित आहे, तर दुसरीकडे उंच पर्वत, रखरखीत जमीन, घनदाट जंगले आणि काही दुर्गम कोपऱ्यांमध्ये अक्षरशः लोकसंख्या नगण्य आहेत. देशाच्या अशा वितरणाला काही भौगोलिक घटक कारणीभूत आहेत. याशिवाय काही सामाजिक, लोकसंख्याशास्त्रीय, राजकीय आणि ऐतिहासिक घटक लोकसंख्येचे वितरण आणि घनता प्रभावित करण्यात त्यांची स्वतःची भूमिका बजावतात. हे घटक वैयक्तिकरित्या नव्हे, तर एकत्रितपणे प्रभाव टाकतात. काही विद्वान नैसर्गिक घटकांना अधिक महत्त्व देतात, तर क्लार्क आणि झेलिंस्की यांचे मत आहे की, एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्येचे प्रमाण निश्चित करण्यात सांस्कृतिक घटक अधिक प्रमुख असतात. क्लार्कच्या मते, लोकसंख्येच्या वितरणात आर्थिक परिस्थिती, तांत्रिक विकास, सामाजिक संस्था, सरकारी धोरण इत्यादी घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.

लोकसंख्येचे वितरण आणि घनता प्रभावित करणारे प्रमुख घटक खालीलप्रमाणे वर्णन केले आहेत :

१) भूप्रदेश (Land) : जमिनीचा भूभाग हा एक शक्तिशाली घटक आहे, जो लोकसंख्या वाढीवर आणि घनतेवर प्रभाव पाडतो. साधारणपणे बोलायचे झाल्यास, पर्वतीय प्रदेशांच्या तुलनेत मैदानी प्रदेश लोकसंख्येच्या उच्च घनतेला प्रोत्साहन देतात. डोंगराळ प्रदेशातील उंच उतार, शेती, वाहतूक, उद्योग आणि इतर आर्थिक क्रियाकलापांच्या विकासासाठी जमिनीची उपलब्धता प्रतिबंधित करतात; ज्यामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण आणि त्याची योग्य वाढ होण्यास अडथळा निर्माण होतो. या प्रतिकूल परिस्थितीमुळेच हिमालयीन प्रदेशाने जरी भारताच्या १३ टक्के भूभाग व्यापलेला असला, तरी तो प्रदेश देशाच्या लोकसंख्येच्या केवळ १-२ टक्के लोकांना आधार देतो. याउलट, उत्तर भारतातील ग्रेट प्लेन ही अत्यंत सौम्य/मंद उताराची जमीन असून शेती, वाहतूक आणि उद्योगांच्या वाढीसाठी उत्तम संधी देते. याचा परिणाम लोकसंख्येच्या उच्च घनतेवर होतो. उत्तर भारतातील ग्रेट प्लेन देशाच्या भूभागाच्या एक-चतुर्थांशपेक्षा कमी क्षेत्र व्यापत असला, तरी भारताच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचे हे घर आहे.

२) हवामान (climate) : लोकसंख्येवर प्रभाव टाकण्यात भूभागाइतकेच हवामानाचे महत्त्व आहे. सर्व हवामान घटकांपैकी, पर्जन्य आणि तापमान हे दुहेरी घटक क्षेत्राची लोकसंख्या निश्चित करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. हवामानाने ठरवलेल्या मर्यादेपलीकडे माणूस जाऊ शकत नाही. म्हणून हवामानाचा अतिरेक लोकसंख्येच्या वाढीला निश्चित करतो. अशा हवामानात हिमालयातील अति थंड हवामान आणि थारच्या वाळवंटातील अति उष्ण व कोरडे हवामान यांचा समावेश होतो. दुसरीकडे, मध्यम हवामान लोकसंख्येसाठी अनुकूल आहे. पाऊस आणि तापमान या दुहेरी घटकांपैकी पाऊस हा लोकसंख्येचे वितरण ठरवण्यासाठी अधिक प्रभावी ठरतो. सामान्यतः असे म्हटले जाते की, भारताच्या लोकसंख्येचा नकाशा त्याच्या पावसाच्या नकाशाचे अनुसरण करतो. भारतीय जनतेचा मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीसाठी पावसामुळे पुरेसे पाणी मिळते. जसजसे आपण पूर्वेकडील गंगा-ब्रह्मपुत्रा डेल्टामधून पश्चिमेकडील थारच्या वाळवंटाकडे जातो, तसतसे पावसाचे प्रमाण आणि परिणामी लोकसंख्येची घनता कमी होत जाते. तथापि, या सामान्य निरीक्षणाला काही अपवाद आहेत. ईशान्येकडील आसाम खोरे आणि बंगालच्या उपसागरावरील उत्तर सरकार (Northen Sarkar) किनार्‍यावर मुसळधार पाऊस पडतो, तरीही या भागात लोकसंख्येची मध्यम घनता आहे. त्याचप्रमाणे, हिमालयाच्या दक्षिणेकडे पुरेसा पाऊस असूनही या भागात लोकसंख्या कमी आहे. हा विरोधाभास काही प्रतिकूल घटक जसे की तीव्र उतार, वारंवार येणारे पूर, नापीक माती आणि घनदाट जंगले या घटकांमुळे दिसून येतो. याउलट पंजाबचा समावेश असलेल्या उत्तर-पश्चिम भारतात, सिंचन सुविधांचा वाढलेला वापर लक्षात घेता हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त आहे. भारत हा एक उष्णकटिबंधीय देश असल्याने, तापमान बऱ्यापैकी जास्त आहे. हिमालयीन प्रदेशात, २,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर हवामान थंड आहे आणि तेथे लोकसंख्या विरळ आहे. समुद्रसपाटीपासून ३,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात लोकवस्ती नाही.

३) माती (Soil) : भारतासारख्या कृषीप्रधान देशात लोकसंख्येची घनता ठरवण्यासाठी माती हा महत्त्वाचा घटक आहे. सुपीक माती जास्त लोकसंख्येच्या घनतेला आधार देते, तर नापीक माती कमी घनतेकडे नेत असते. भारताच्या उत्तरेकडील मैदानात सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्यांच्या वार्षिक पूरांमुळे माती नियमितपणे सुपीक होते. म्हणून हे उच्च लोकसंख्येच्या घनतेचे क्षेत्र आहे. किनारपट्टीच्या मैदानातही सुपीक माती आहे आणि ते जास्त लोकसंख्येच्या घनतेचे क्षेत्र आहेत. दख्खनच्या पठारावरील काळी मातीदेखील उच्च लोकसंख्येच्या घनतेला आधार देते. दुसरीकडे वाळवंटातील माती, पर्वतीय माती, लॅटराइट माती या नापीक माती आहेत आणि उच्च लोकसंख्येच्या घनतेला आधार देण्यास सक्षम नाहीत. तथापि, कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानामुळे भविष्यातील लोकसंख्येची परिस्थिती काही प्रमाणात बदलू शकते.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील सात राज्यांची निर्मिती कशी झाली? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?

४) जलकुंभ (Water bodies) : क्षेत्राची लोकसंख्या निश्चित करण्यात पाण्याची उपलब्धता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सिंचन, उद्योग, वाहतूक आणि घरगुती वापरासह अनेक कारणांसाठी पाणी ही मूलभूत गरज आहे. नद्या हे पिण्यायोग्य पाण्याचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत. त्यामुळे बहुतांश लोकसंख्या नदी खोऱ्यात एकवटलेली आहे.

५) खनिज संसाधने (Mineral resources) : खनिजे विविध क्षेत्रांतील लोकांसाठी आकर्षणाचा स्रोत म्हणून काम करतात, ज्यामुळे लोकसंख्येची घनता त्या क्षेत्रात जास्त असते. झारखंडच्या छोटा नागपूर पठारावर आणि ओडिशाच्या लगतच्या भागात लोकसंख्येची घनता मुख्यत्वे खनिजांच्या उपलब्धतेमुळे जास्त आहे.

६) उद्योग (Industries ) : औद्योगिक वाढ मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी देते आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी एक उत्तम साधन म्हणून काम करते, विशेषत: याचा परिणाम शेजारच्या भागातील लोकसंख्येची घनता वाढण्यात होतो. एक हेक्टर औद्योगिक जमीन हजारो लोकांना आधार देण्यास सक्षम असते, तर शेतीला समर्पित असलेले सर्वात सुपीक क्षेत्र प्रति हेक्टर काही शंभरपेक्षा जास्त लोकांना आधार देऊ शकत नाही. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये लोकसंख्येच्या उच्च घनतेचे एक प्रमुख कारण म्हणजे या राज्यांमधील उद्योगांची अभूतपूर्व वाढ होय.

७) वाहतूक (Transportation) : लोकसंख्येची वाढ ही वाहतूक सुविधांच्या विकासाशी थेट संबंधित असते. भारताच्या उत्तरेकडील मैदानात वाहतूक मार्गांचे जाळे दाट आहे आणि हा एक दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. द्वीपकल्पीय पठारावर वाहतूक मार्गांचे मध्यम जाळे आहे आणि ते मध्यम लोकसंख्येचे क्षेत्र आहे. हिमालयीन प्रदेशात वाहतूक सुविधांचा अभाव आहे आणि लोकसंख्या विरळ आहे.

८) शहरीकरण (Urbanisation) : शहरीकरण आणि लोकसंख्या एकाग्रता एकमेकांशी जवळून संबंधित आहेत. सर्व शहरी केंद्रे लोकसंख्येच्या उच्च घनतेचे आहेत. जे क्षेत्र शहरी म्हणून नियुक्त केले जावे, त्याची किमान घनता ४०० व्यक्ती प्रति चौ.कि.मी. असायला पाहिजे. कोलकाता, चेन्नई, बृहन्मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि चंदीगड या मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये लोकसंख्येची घनता ६,००० व्यक्ती प्रति चौ.कि.मी. आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार दिल्लीची लोकसंख्येची घनता सर्वाधिक ११,२९७ व्यक्ती प्रति चौ. किमी आहे.

सामाजिक-आर्थिक आणि ऐतिहासिक घटक :

स्थायिक शेती आणि कृषी विकासाची उत्क्रांती, मानवी वसाहतीचा पॅटर्न, वाहतूक नेटवर्कचा विकास, औद्योगीकरण आणि शहरीकरण हे काही महत्त्वाचे सामाजिक-आर्थिक आणि ऐतिहासिक घटक आहेत. साधारणपणे बोलायचे झाल्यास, मानवी वसाहती आणि वाहतूक नेटवर्कच्या विकासाच्या सुरुवातीच्या इतिहासामुळे नदीचे मैदान आणि किनारी भागात लोकसंख्येचे प्रमाण अधिक आढळून येत होते. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, पुणे, अहमदाबाद, चेन्नई आणि जयपूर या शहरी भागात औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाच्या उच्च पातळीमुळे लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातून शहरी भागात लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात.

Story img Loader