सागर भस्मे

मागील लेखातून आपण वातावरण म्हणजे काय? आणि वातावरणातील थरांविषयीची माहिती घेतली. या लेखातून आपण वाऱ्यांच्या प्रकारांबाबत जाणून घेऊ या. वाऱ्याच्या प्रकारांचे मुख्यत: दोन भागांत वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे वाऱ्यांच्या प्राथमिक गतीनुसार (Primary Wind Movment) आणि दुसरा म्हणजे दुय्यम गतीनुसार (Secondary Wind Movment).

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Astrological Predictions Future of India 2024 and Narendra Modi Government in Marathi
Astrological Predictions India 2024 : ‘आर्थिक झळ ते मानसिक समस्यांमध्ये वाढ’; शनीची वक्रदृष्टी? भारताचे पुढे काय होणार? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
Budh Nakshatra Gochar 2024
Budh Nakshatra Gochar 2024 : बुध ग्रहाच्या नक्षत्र गोचरमुळे चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : वातावरण म्हणजे काय? वातावरणातील थर कोणते?

वाऱ्यांच्या प्राथमिक गतीनुसार (Primary Wind Movment)

१) व्यापारी वारे (Trade Winds)

दोन्ही गोलार्धांत समशीतोष्ण जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना व्यापारी वारे किवा पूर्वेकडील वारे, असे म्हणतात. करोली बलामुळे उत्तर गोलार्धात व्यापारी वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून नैऋत्येकडे; तर दक्षिण गोलार्धात व्यापारी वाऱ्यांची दिशा आग्नेयेकडून वायव्येकडे असते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात व्यापारी वारे अधिक तीव्र असतात. शतकानुशतके जगातील महासागर पार करण्यासाठी जहाजांच्या कप्तानांनी व्यापारी वाऱ्यांचा वापर केला आहे. म्हणून त्यांना अनुक्रमे ईशान्य व्यापारी वारे व आग्नेय व्यापारी वारे, असे म्हणतात.

२) प्रतिव्यापारी वारे / पश्चिमी बारे (Westerlies)

समशीतोष्ण जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रतिव्यापारी वारे किंवा पश्चिमी वारे, असे म्हणतात. उत्तर गोलार्धात हे वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे; तर दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्ष वृत्ताच्या दरम्यानच्या जास्त दाबाच्या पट्ट्यापासून ते ध्रुव वृत्ताजवळ ६० ते ७० अंश उत्तर व दक्षिणेदरम्यान असणाऱ्या ध्रुव वृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यांमध्ये या वाऱ्याचे स्थान आहे. उत्तर गोलार्धात जमिनीचा भाग जास्त असल्यामुळे हे वारे अनियमित असतात आणि उन्हाळ्यात याची तीव्रता कमी प्रमाणात असते. परंतु, हिवाळ्यात हे वारे अधिक तीव्र वेगने वाहतात. दक्षिण गोलार्धात जमिनीच्या मानाने समुद्राचा भाग जास्त असल्यामुळे हे वारे नियमित वाहतात आणि त्यांना जमिनीचा अडथळा नसल्याने ते वेगवान असतात. प्रतिव्यापारी वाऱ्यांना ४० अंश दक्षिण ते ६० अंश दक्षिण या अक्ष वृत्तादरम्यान ते विविध नावांनी ओळखले जातात. जसे की ४० अंश दक्षिण या भागात त्यांना ‘गरजणारे ४०’. ५० अंश दक्षिण या भागात त्या वाऱ्यांना ‘खवळलेले ५०’ व ६० अंश दक्षिण येथे त्या वाऱ्यांना ‘किंकाळणारे ६०’ असे म्हणतात. या भागातील प्रतिव्यापारी वाऱ्याचा उल्लेख ‘शूर पश्चिमी वारे’, असाही केला जातो.

३) ध्रुवीय वारे (Polar Winds)

दोन्ही गोलार्धांत ७० ते ८० अंश अक्ष वृत्ताच्या दरम्यान हे वारे वाहतात. ते सामान्यपणे पूर्वेकडे वाहतात. म्हणून त्यांना ध्रुवीय वारे किंवा पूर्वीय वारे असे म्हणतात. ध्रुवीय वारे जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून उपध्रुवीय कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वाहतात. या वाऱ्यांचे उत्तर ध्रुवीय वारे व दक्षिण ध्रुवीय वारे, असे दोन प्रकार पडतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : अग्निजन्य खडक आणि त्याचे प्रकार

दुय्यम गतीनुसार वाऱ्यांचे प्रकार (Secondary Wind Movment)

१) आवर्त वारे (Cyclone )

ठराविक भागात कमी वायुदाबाचा प्रदेश व सभोवताली जास्त वायुदाबाचा प्रदेश, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास, सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या केंद्राकडे वारे वेगाने व वक्राकार वाहतात; त्या वाऱ्यांना ‘आवर्त वारे’ किंवा ‘चक्रवात’, असे म्हणतात. उत्तर गोलार्धात आवर्तातील वारे घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने; तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्यांच्या दिशेला अनुसरून वाहतात. आवर्त वारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. दक्षिण चीन समुद्राच्या भागात टायफून, कॅरिबियन समुद्रात हरिकेन, अमेरिकेमध्ये टोरनॅडो, उत्तर ऑस्ट्रेलिया भागात विली-विली, मिसिसिपी खोरे येथे ट्रिस्टर आणि हिंदी महासागरात या आवर्तांना उष्ण कटिबंधीय आवर्त (ट्रॉपिकल सायक्लोन) असे म्हणतात. आवर्ताचे उष्ण कटिबंधीय आवर्त आणि समशीतोष्ण आवर्त, असे दोन प्रकार पडतात.

२) उष्ण कटिबंधीय आवर्त

व्यापारी वाऱ्याच्या पट्ट्यामध्ये दोन्ही गोलार्धांत ८ ते २० अंश अक्ष वृत्तादरम्यान ही आवर्ते तयार होतात. उष्ण कटिबंधीय आवर्तांची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असून, ही आवर्ते कमी आकाराची असतात. ती फक्त समुद्रावर आणि उन्हाळ्यात तयार होतात. उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ते उष्ण कटिबंधातून उष्णता आणि ऊर्जा वाहून नेतात आणि समशीतोष्ण अक्षांशांपर्यंत पोहोचवतात.

३) समशीतोष्ण आवर्त

दोन्ही गोलार्धांत ३० ते ६५ अंश अक्ष वृत्तादरम्यान जेथे उपध्रुवीय पट्ट्यात थंड हवा अक्षवृत्तीय गरम हवेबरोबर एकत्र येते, तेथे ही आवर्ते तयार होतात. या आवर्तांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असून, ही आवर्ते मोठ्या आकाराची असतात. जमिनीवर किंवा समुद्रात, तसेच उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातही ही आवर्ते तयार होतात.