सागर भस्मे

मागील लेखातून आपण वायू राशी म्हणजे काय? आणि त्याचा हवामानावर कसा परिणाम होतो, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण चक्रीवादळ म्हणजे काय याविषयी जाणून घेऊ. चक्रीवादळ हे कमी दाबाचे केंद्र असते. या कमी दाबाच्या केंद्राला ‘चक्रीवादळाचा डोळा’, असे म्हणतात. या डोळ्याभोवती हवा गोल गोल फिरून विध्वंसक वादळ निर्माण करते. हवा उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने फिरून चक्रीवादळ निर्माण करते. चक्रीवादळांना वातावरणातील विचलन (Atmospheric Disturbances), असेही म्हणतात. या चक्रीवादळांचा आकार गोलाकार, लंबवर्तुळाकार ते ‘V’ आकारापर्यंत असतो.

Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
shani gochar
Shani Gochar 2024 : ३० वर्षानंतर शनि बनवणार दुर्लभ राजयोग, २०२५ पर्यंत ‘या’ राशींना मिळणार पैसाच पैसा!
Tulsi Vivah 204 Date Time Puja Vidhi Shubh Muhurat in Marathi
Tulsi Vivah 2024 Date Time: १२ की १३, तुळशी विवाह नक्की कधी? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त

हेही वाचा – UPSC-MPSC : वायू राशी म्हणजे काय? त्याचा हवामानावर कसा परिणाम होतो?

चक्रीवादळाची श्रेणी गतीनुसार खालीलप्रमाणे ठरते :

  • तीव्र चक्रीवादळ (Severe Cyclonic Storm)- ९० ते १२४ किमी/तास (घर, पिके व झाडे यांचे नाममात्र नुकसान होते.)
  • अतितीव्र चक्रीवादळ (Very Severe Cyclonic Storm)- १२५ ते १६४ किमी/तास (लक्षात येण्याइतपत नुकसान होते.)
  • सुपर सायक्लॉन (Super Cyclone)- १६५ ते २२४ किमी/तास (छपरे उडणे व वीजपुरवठ्यास धोका, जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान)

स्थानानुसार चक्रीवादळांना असलेली नावे :

चक्रीवादळांना त्यांच्या स्थानांवरून नावे दिली जातात. जसे हिंदी महासागरातील वादळाला चक्रीवादळ (Cyclone) म्हटले जाते. तर, वेस्ट इंडिज आणि अटलांटिकमधील वादळाला हरिकेन (Hurricane), पॅसिफिक महासागर व चिनी समुद्रातील वादळाला टायफून (Typhoon), तसेच ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील वादळाला विली-विली (Willy-Willy) या नावाने ओळखले जाते.

चक्रीवादळाचे नामकरण :

चक्रीवादळाला नाव देण्याची पद्धत आहे. हवामान तज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून चक्रीवादळाचे नामकरण केले जाते. प्रत्येक विभागानुसार नावांची यादी ठरते. जसे हिंदी महासागरातील वादळांसाठी २००४ मध्ये एकूण आठ देशांनी मिळून यादी तयार केली. तेच २०१८ मध्ये आणखी पाच देश सामील होऊन एकूण १३ देशांनी १६९ नावांची यादी दिली. हे देश भारत, बांगलादेश, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिरात आणि येमेन आहेत.

स्थानिक दृष्टिकोनातून चक्रीवादळांचे दोन प्रमुख प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. १) उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे आणि २) समशीतोष्ण चक्रीवादळे

उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ : विषुववृत्तापासून ३०° उत्तर ते ३०° दक्षिणच्या पट्ट्यात उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांच्या घटना घडतात. उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांचा सरासरी व्यास ८० किमी ते ३०० किमीदरम्यान असतो. परंतु, काही वेळा ती इतकी लहान होतात की, त्यांचा व्यास ५० किमी किंवा त्याहूनही कमी होतो. सामान्यतः ही चक्रीवादळे समुद्रावर निर्माण होतात आणि नंतर ती जमिनीवर पोहोचतात. चक्रीवादळे जमिनीवर पोहोचल्यावर तीव्रता कमी होऊन लोप पावतात. त्याउलट समशीतोष्ण वादळे जमीन किंवा पाणी दोन्हींवर निर्माण होऊ शकतात.

भारतातील उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ : जगातील एकूण चक्रीवादळाच्या सुमारे सहा टक्के चक्रीवादळे भारतीय उपखंडात निर्माण होतात. भारताच्या एकूण भूभागापैकी सुमारे आठ टक्के भूभागाला, विशेषत: पूर्वेकडील किनारा आणि गुजरात किनारपट्टीला, उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांचा धोका आहे. खरे तर हिंदी महासागर जगातील सहा प्रमुख चक्रीवादळप्रवण प्रदेशांपैकी एक आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दरवर्षी सरासरी पाच तस्सा सहा उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे तयार होतात. अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात जास्त चक्रीवादळे निर्माण होतात. त्यामुळे पूर्वेकडील किनारपट्टी अधिक चक्रीवादळप्रवण आहे. या कारणास्तव हिंदी महासागरात निर्माण झालेल्या एकूण चक्रीवादळांपैकी सुमारे ८० टक्के चक्रीवादळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकतात. उत्तर हिंद महासागरात उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांचे मे ते जून आणि मध्य सप्टेंबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत, असे दोन निश्चित हंगाम आहेत.

मे, जून, ऑक्टोबर व नोव्हेंबर हे तीव्र वादळांसाठी ओळखले जाणारे महिने आहेत. ओडिशा ते तमिळनाडूपर्यंतचा संपूर्ण पूर्व किनारा चक्रीवादळांमुळे असुरक्षित आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : वॉकर सर्क्युलेशन ही संकल्पना काय आहे? त्याचा भारतीय मान्सूनवर कसा परिणाम होतो?

समशीतोष्ण चक्रीवादळ : यांनाच एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स (Extra-Tropical Cyclones) किंवा वेव्ह सायक्लोन (Wave Cyclones), असे म्हणतात. या प्रकारची चक्रीवादळे दोन्ही गोलार्धांतील ३५° ते ६५° अक्षांशादरम्यान आढळतात. समशीतोष्ण चक्रीवादळांच्या उत्पत्ती आणि विकासासाठी दोन विरोधी वायू राशीमुळे (Air Masses) निर्माण झालेल्या ध्रुवीय आघाड्या (Polar Fronts) जबाबदार आहेत. समशीतोष्ण चक्रीवादळांमध्ये टोनार्डोचा (Tornado) समावेश होतो.