सागर भस्मे

मागील लेखातून आपण गाळाचे खडक म्हणजे काय? आणि भारतात ते कुठे आढळतात, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण रूपांतरित खडक म्हणजे काय? त्याची निर्मिती कशी होते आणि भारतात ते कुठं आढळतात, याबाबत जाणून घेऊया.

pune district transport marathi news
पुणे : जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतुकीसाठी तीस वर्षांचा आराखडा, १.२६ लाख कोटींचा खर्च अपेक्षित
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Iron worth 20 lakhs stolen from Metro supervisor Pune print news
पिंपरी: मेट्रोच्या पर्यवेक्षकाकडून २० लाखांच्या लोखंडाची चोरी
Loksatta kutuhal Black rock caves
कुतूहल: काळ्या कातळातील लेणी
Buddha head Ratnagiri
Buddha head Ratnagiri: भव्य बुद्धशीर्ष व मोठा तळहात रत्नागिरीत सापडण्यामागचा अर्थ काय?
Loksatta kutuhal story of the discovery of dinosaurs
कुतूहल: डायनोसॉरच्या शोधाची कथा
AI in archaeology
AI ने शोधले ५००० वर्षांपूर्वीचे वाळवंटाखाली दडलेले प्राचीन संस्कृतीचे रहस्य; का आहे हे तंत्र महत्त्वाचे?
atomic Mineral Exploration
कुतूहल : आण्विक खनिजांचे अन्वेषण

भूकवचात प्रामुख्याने तीन प्रकारचे खडक आढळतात, १) प्राथमिक किंवा अग्निज खडक, २) द्वितीयक किंवा गाळाचे खडक आणि ३) रूपांतरित खडक. अग्निज व गाळाचे हे दोन्ही प्रकारचे खडक भू- हालचालींमुळे भूपृष्ठालगत तयार होणारे खडक आहेत. या खडकांवर दाब पडला की ते भूकवचात खोल गाडले जातात. त्या खडकांवर भूगर्भातील उष्णता व दाबाचा परिणाम होतो. त्यामुळे खडकांचे मूळ गुणधर्म, रंग, काठीण्य, पोत व खनिजे अंशत: बदलून जातात आणि त्यामुळे रूपांतरित खडक तयार होतो. रूपांतरित खडकांचे खालील प्रकार असतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : गाळाचे खडक म्हणजे काय? हे खडक भारतातील कोणत्या भागात आढळतात?

उष्णतेमुळे रूपांतरित झालेले खडक

भूकवचातील उष्णतेमुळे खडकाचे रूपांतर झालेले असते. उष्णतेमुळे चुनखडीपासून संगमरवर खडक निर्माण होतो. माती व पंकाश्म खडकांचे रूपांतर पाटीच्या दगडात होते. कोळशाचे रूपांतर ग्रॅफाईटमध्ये होते. संगमरवरी दगडात कॅल्साईट हे एकच खनिज असते. याचा उपयोग इमारतीच्या बांधकामासाठी केला जातो. भारतात संगमरवर राजस्थानात अलवार, अजमेर, जयपूर आणि जोधपूर या शहरांच्या परिसरात व मध्य प्रदेशात जबलपूरजवळ आढळतो.

क्वार्टझाईट् हा रूपांतरित खडक अतिशय प्रतिकारक्षम असून तो पर्वतरांगांत निर्माण होतो. काचनिर्मितीसाठी या खडकाचा उपयोग होतो. भारतात हा खडक राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, तामिळनाडू व दिल्ली परिसरात आढळतो. इमारतींच्या छपरांसाठी, पायऱ्यांसाठी व मुलांच्या शाळेतील पाट्यांसाठी तो मोठ्या प्रमाणात उपयोगात आणला जातो. भारतात हा हरियाणातील रेवारी, हिमाचल प्रदेशातील कांग्रा व बिहारमधील खरगपूर टेकड्यांत आढळतो. ग्रॅफाईटचा उपयोग पेन्सिलींसाठी केला जातो. तसेच तो आंध्र प्रदेश व उडीसामध्ये आढळतो.

स्पर्शजन्य रूपांतरित खडक

भूकवचात अति दाबामुळे हे खडक निर्माण होतात. ग्रॅनाईटचे रूपांतर नीसमध्ये, पंकाश्माचे रूपांतर शीस्ट खडकात होते. यामधील खनिजेही समांतर स्थितीत असतात. हे दोन्ही प्रकार भारतात मोठ्या प्रमाणात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश दक्षिण भारत, आसाम, पश्चिम बंगाल व राजस्थानात आढळतात. नीसचा उपयोग इमारतींच्या बांधकामासाठी केला जातो.

हेही वाचा – UPSC-MPSC : सागरी लाटांच्या निक्षेपणामुळे भूरूपे कशी निर्माण होतात?

भारमुळे रूपांतरित खडक

उभ्या दिशेने क्रियाशील असणाऱ्या दिष्ट दाबामुळे म्हणजे प्रामुख्याने वरच्या खडकांच्या भारामुळे आणि वाढती उष्णता आणि रासायनिक क्रियाशील द्रायू यांच्या साहाय्याने खडकांत जे बदल घडून येतात, त्यांना भार रूपांतरण हे नाव आहे. या प्रकारात भूकवचाची प्रत्यक्ष हालचाल होत नसल्यामुळे या रूपांतरणाला ‘स्थितीक रूपांतरण’ ही संज्ञा वापरली जाते.

गति-उष्णीय रूपांतरित खडक

भूकवचात खोल जागी उष्णता आणि दाब याच्या एकत्रित कार्यामुळे प्रभावी रूपांतरण घडून येते. या रूपांतरणात खडकातील खनिजांचे संपूर्ण पुनर्स्फटिकीभवन होऊन अनेक नवी खनिजे तयार होतात. त्याचप्रमाणे खनिजांच्या नव्या संरचना तयात होतात. दाबामुळे खनिजांचे वितळबिंदू स्थानिकरीत्या दाबाचा प्रभाव असेतोपर्यंत तात्पुरते उतरतात. त्यामुळे खनिजांच्या रेणुसमूहांचे विसरण आणि पुनर्स्फटिकीभवन होण्यास हे नाव आहे. सामान्यपणे हालचालींतून निर्माण झालेल्या घडींचं पर्वताच्या प्रदेशात हे रूपांतरण अधिक प्रमाणात आढळते. हे रूपांतर मोठ्या विस्तृत प्रदेशात घडून येत असल्यामुळे त्याला ‘प्रादेशिक रूपांतरीत’ असेही म्हणतात.

Story img Loader