सागर भस्मे

मागील काही लेखांतून आपण वने आणि नदीप्रणालींविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण अधातू खनिजांविषयी जाणून घेऊ या. अभ्रक, जिप्सम, चुनखडी, डोलोमाईट व हिरे ही खनिजे अधातू खनिजे आहेत.

Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Uttar Pradesh Sambhal Excavation
Uttar Pradesh Sambhal Excavation : उत्तर प्रदेशातील संभलमध्‍ये उत्खननावेळी आढळली १५० वर्षे जुनी पायऱ्या असलेली विहीर
winter will take break Meteorological Department predicts
थंडीला लागणार ‘ब्रेक’, हवामान खात्याचा पावसाचा अंदाज
Jewellery worth 50 tolas stolen from apartment in Salisbury Park
सॅलिसबरी पार्कमधील सदनिकेतून ५० तोळ्यांचे दागिने चोरीला
Mumbai Boat Accident
Elephanta Caves: घारापुरी (एलिफंटा) लेणींना एवढे महत्त्व का? हजारो पर्यटक त्यांना रोज भेट का देतात?

अभ्रक :

अभ्रकाचे सर्वाधिक उत्पादन भारतात घेतले जात असून, विद्युत उपकरणांमध्ये अभ्रकाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधे व रंगनिर्मितीमध्येही अभ्रक वापरतात. मस्कोव्हाईट, फ्लेगोपाईंट, बायोटाईट, लेपिडोलाईट व पेरागोनाईट या स्वरूपात ते आढळते. भारतात आंध्र प्रदेश, राजस्थान, झारखंड व बिहार ही राज्ये अभ्रकाबाबत अग्रेसर आहेत. आंध्र प्रदेश राज्य अभ्रकाच्या उत्पादनात अग्रेसर असून, या राज्यातील पश्चिम गोदावरी, विशाखापट्टणम, कृष्णा खम्माम या जिल्ह्यांतून अभ्रकाचे उत्पादन घेतले जाते. राजस्थान राज्यात जयपूर व उदयपूर या जिल्ह्यांत अभ्रक आढळते. बिहार व झारखंड या राज्यांतील गया, हजारीबाग, मुंगेर व भागलपूर या भागांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : सातपुडा पर्वतरांग; भूवैज्ञानिक निर्मिती आणि खनिजे

जिप्सम

जिप्समचे सर्वाधिक साठे राजस्थानमध्ये आढळतात; तर उर्वरित साठे तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांत आढळतात. राजस्थान राज्यात नागोर, बिकानेर, गंगानगर भरतपूर, जैसलमेर व जोधपूर या जिल्ह्यांत जिप्समचे साठे आढळतात. गुजरात राज्यामध्ये पोरबंदर व भावनगर या जिल्ह्यांत जिप्समचे साठे आढळतात. तर, तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली, कोईम्बतूर व रामनाथपुरम येथेही जिप्समचे साठे आहेत.

चुनखडी

चुनखडीचा सर्वाधिक वापर सिमेंट उद्योगात होतो. तसेच उर्वरित वापर पोलाद उद्योग, रासायनिक उद्योग, खत व कागद निर्मितीसाठी केला जातो. कर्नाटक राज्यात चुनखडीचे सर्वाधिक साठे आढळत असून, राज्यातील शिमोगा, चित्रदुर्ग, तुमकूर, म्हैसूर, गुलबर्गा, तसेच बेळगाव जिल्ह्यात चुनखडीचे साठे आढळतात. राजस्थानातील अल्वार, चित्तोडगड, झुनझुन, अजमेर, जोधपूर व बिकानेर या जिल्ह्यांत चुनखडीचे साठे आढळतात. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, सतना, बैतुल, सागर, रेवा धार व भोपाळ या जिल्ह्यांत, आंध्र प्रदेशमध्ये कर्नूल, गुंटूर, कृष्णा, नलगोंडा, वारंगळ व कड्डाण्या या जिल्ह्यांत, तर, गुजरातमधील अमरेली, सुरत, जुनागढ़, कच्छचे आखात, जामनगर व बडोदा या ठिकाणीही चुनखडीचे साठे आढळतात.

डोलोमाईट

चुनखडीमध्ये जर ४५% पेक्षा अधिक प्रमाणात मॅग्नेशियमचा अंश असेल, तर त्यास डोलोमाईट असे म्हटले जाते. कॅल्शियम व मॅग्नेशियम यांच्या मिश्रणाने डोलोमाईट बनते. डोलोमाईट नुसत्या डोळ्यांनी बघून चुनखडीपासून वेगळे ओळखता येत नाही; तर त्यासाठी रासायनिक परीक्षण करावे लागते. डोलोमाइटमध्ये जिप्सम, ॲनहायड्राइट, लोहाची सल्फाइड्स व ऑक्साइड्स, सेलेस्टाइट, ओपल, कॅल्सेडोनी, मॅग्नेसाइट, फ्ल्युओराइट, कार्बनी पदार्थ यांपैकी मूलद्रव्ये असू शकतात. ओडिशा राज्यात सुंदरगड, संबळपूर व कोरापुट येथे डोलोमाईटचे साठे आढळतात. छत्तीसगड राज्यात बस्तर, दुर्ग बिलासपूर व रायगडा, कर्नाटक जिल्ह्यात चित्रदुर्ग, शिमोगा व तुमकूर, झारखंड राज्यात पालमाऊ व सिंघभूम, राज्यस्थान राज्यात उदयपूर आणि आंध्र प्रदेश राज्यातील कर्नूल, कडप्पा व अनंतपूर जिल्ह्यात डोलोमाईटचे साठे आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राचा भूगोल : भीमा नदीप्रणाली

हिरे

हिरा हे कार्बनचे अपरूप असून, जगातील सर्वांत कठीण पदार्थ म्हणून हिरा ओळखला जातो. मध्य प्रदेश राज्यात पन्ना, सतना व छतरपूर या जिल्ह्यांत हिऱ्याच्या खाणी आहेत. तर, आंध्र प्रदेशातील कर्नूल, गुंटूर, वारंगळ, कडप्पा या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात हिरे आढळतात. तसेच गोदावरी व महानदी या नद्यांच्या क्षेत्रांतही काही प्रमाणात हिरे आढळतात. हिऱ्याच्या प्रकारांमध्ये रंगहीन हिरे सर्वोच्च गुणवत्तेचे मानले जातात आणि ते दुर्मीळ असून, मूल्यवान असतात. बरेचसे हिरे हे पिवळसर रंगाचे तसेच काळा, निळा, हिरवा, गुलाबी, जांभळा व तांबडा या रंगांमध्ये आढळतात.

Story img Loader