सागर भस्मे

मागील भागातून आपण पर्वत आणि पठारे म्हणजे काय? आणि ते कोणत्या भागात आढळतात, याबाबत माहिली घेतली. या लेखातून आपण गाळाचे खडक म्हणजे काय? आणि ते खडक कोणत्या भागात आढळतात, याबात जाणून घेऊया.

Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
shilphata road cash 5 crore rupees seized
कल्याण ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात शिळफाटा येथे वाहनातून पाच कोटी जप्त
Thieves run away carrying bullets by pretending to take test drive in Kondhwa
रपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा पसार, कोंढवा भागातील घटना
the survey team of the administration seized gold worth 35 lakhs In Ratnagiri
रत्नागिरीत प्रशासनाच्या सर्वेक्षण पथकाने ३५ लाखांचे सोने पकडले
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
Jagannath temple
Jagannath temple: जगन्नाथ मंदिरात कोणतेही ‘गुप्त तळघर’ सापडले नाही; पुरातत्त्व खात्याने केलेल्या सर्वेक्षणात नेमकं काय आढळलं?

गाळाचे खडक म्हणजे काय?

पर्जन्य, वारा, हिम, नद्या, वनस्पती व प्राणी यांमुळे खडकांचे विदारण होते. ही प्रक्रिया सतत सुरू असते. प्रथम त्यांचे लहान तुकड्यांत व शेवटी मातीत रूपांतर होते. हेच खडकांचे तुकडे, दगड-धोंडे, वाळूकण व माती इत्यादी. वारा, नद्या आणि हिमनद्या वाहून नेतात. या नद्या शेवटी सरोवरे, समुद्रास जाऊन मिळतात. त्यामुळे समुद्रात खडकांचे तुकडे, दगडधोंडे, वाळूकण व माती इत्यादींचे संचयन होते. कालांतराने या गाळांचे थरावर थर साचून जे खडक तयार होतात, त्यालाच ‘स्तरित’ किंवा ‘गाळाचे खडक’ असे म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्वत म्हणजे काय? पर्वतांचे प्रकार कोणते?

निर्मितीप्रक्रिया आणि आढळ

संचयनाच्या या प्रक्रियेत द्रव्याचे त्यांच्या वजन व आकारानुसार विभागीकरण होते. त्यामुळे माती, गाळ, वाळू, दगड व धोंडे यांचे संचयन विविध ठिकाणी घडून येते. विविध थरांमध्ये त्यांचे संचयन होत असल्यामुळे त्यांना स्तरित खडक म्हणतात. या थरांचे संचयन आडव्या पातळीत होत असते. स्तरित खडकांचे द्रव्य काही वेळेस सजीवांपासूनही निर्माण झालेले असतात.
उदाहरणार्थ, वनस्पती द्रव्यांच्या संचयनातून कोळशाची निर्मिती होते. अनेक वेळा शेवाळं, लता-वेली, वृक्षांची पाने, फांद्या, वृक्षांचे बुंधे दलदलीत गाडले जातात व त्यांचे थरांवर थर साचत जातात. काळाच्या ओघात त्यांचा ऱ्हास होऊन त्यातील इतर द्रव्यांचा नाश होतो आणि कार्बन तेवढा शिल्लक राहतो. ही कोळसानिर्मितीची प्राथमिक अवस्था असते. हा कोळसा प्राथमिक अवस्थेतील कोळसा असतो. पुढे त्यावर वरील थरांचा व भूकवचाचा दाब पडून उष्णता निर्माण होते, त्यामुळे या कोळशाचे स्थित्यंतर बिट्युमिनस, लिग्नाईट व अँथ्रासाईट कोळशात होते. यावेळी वाफ, पाणी व वनस्पतींच्या हिरव्या अवशेषांचे प्रमाण कमी कमी होत जाते. अखेर शेवटच्या प्रकारात कार्बनचे प्रमाण जास्त असते, म्हणून शेवटचा प्रकार हा उच्च प्रतीचा कोळसा समजला जातो.

स्तरित खडकांनी भूपृष्ठाचा मोठा भाग व्यापलेला आहे. मात्र, पृथ्वीच्या संपूर्ण भूकवचाचा विचार केला तर अग्निजन्य व रूपांतरित खडकांचे प्रमाण जास्त आहे. भारतीय उपखंडात गंगा-सिंधूचे खोरे हे गाळाच्या खडकांनी तयार झाले आहेत. पंकाश्म खडक दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओरिसा, गुजरात या राज्यांत आहेत. चिनी माती तामिळनाडू, केरळ, म्हैसूर, ओरिसा, गुजरात व बिहारच्या काही भागांत आढळते.

विंध्य प्रकारचा खडक हा पूर्व राजस्थान व मध्य प्रदेशात आढळतो. सातपुडा पर्वताचा पंचमढी पठारी प्रदेश गोंडवाना रेतीखडकांनी तयार झालेला आहे. या खडकांमुळे सपाट माथ्याच्या, पण तीव्र उताराच्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत. विंध्य पठारात रेतीखडक, पंकाश्म व चुनखडक दिसून येतात. विंध्य पर्वताचा उत्तर भाग मंद उताराचा असून, त्या तुलनेने दक्षिणेकडील भाग तीव्र उताराचा आहे. लाल व पिवळ्या रंगाचा रेतीखडक अरवलीच्या रांगांत व त्याच्या दिल्लीकडील विस्तारित रांगांत आहे. रेतीखडकाचे साठे उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा व आंध्र प्रदेशात आणि हिमालयाच्या काही भागांत आहेत. दिल्लीचा लाल किल्ला व आग्रा येथील किल्ला याच तांबड्या रंगाच्या रेतीखडकांनी बांधलेले आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : सागरी लाटांच्या निक्षेपणामुळे भूरूपे कशी निर्माण होतात?

गाळाच्या संचयनात कोळसा हा आपल्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा. कारण ते एक प्रमुख शक्तिसाधन असून, औद्योगिक इंधन म्हणून वापरले जाते. भारतात तो गोंडवन काळात संचयित होऊन दामोदर, महानदी व गोदावरी खोऱ्यात निर्माण झाला आहे. बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात कोळशाचे साठे आढळतात; तर पेट्रोलियम हे दुसरे महत्त्वाचे खनिज शक्तिसाधन असून ते फक्त स्तरित खडकांतच आढळते. दोन अप्रवेश्य स्तरित खडकांचा बहिर्वक्र घडीप्रदेश यासाठी अनुकूल असतो. या स्थितीत दोन प्रवेश्य थरांत आढळतो. रेतीखडकांनी हे प्रवेश्य थर बनलेले असतात, तर अप्रवेश्य थर हा पंकाश्म खडकाचा असतो. आसाम व गुजरात ही भारतातील पेट्रोलियम उत्पादक राज्ये आहेत. तेलसाठे कच्छचे रण, बेचे आखात, कावेरी नदीचे खोरे, गंगेचा त्रिभूज प्रदेश, राजस्थान व हिमालयीन प्रदेशांत आढळण्याची शक्यता आहे.