सागर भस्मे

मागील काही लेखांतून आपण भारतातील हवामान वर्गीकरणाविषयीची माहिती घेतली. या लेखातून आपण समुद्रकिनाऱ्यावर उदभवणाऱ्या नुकसानकारक लाटांबद्दल म्हणजेच त्सुनामीबाबत जाणून घेऊ या. त्सुनामी हा जपानी शब्द ‘त्सू’ म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लहर यावरून आला आहे. आपत्ती व्यवस्थापनावरील उच्चाधिकार समितीच्या अहवालानुसार (२००१) भूकंप, भूस्खलन किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या समुद्रातील एखाद्या घटनेमुळे निर्माण होणारी त्सुनामी ही महाकाय लाट आहे. त्सुनामी ही एकच लाट नसून समुद्राच्या तळाजवळ किंवा खाली भूवैज्ञानिक बदलांमुळे निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका आहे. या लाटा प्रचंड आकार धारण करू शकतात आणि त्या महासागर ओलांडून जमिनीवर पोहोचतात.

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

त्सुनामीची निर्मिती :

१) समुद्राखालील भूकंप (Undersea Earthquakes) : भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा महासागरावर पडणाऱ्या मोठ्या उल्कापिंडाच्या प्रभावामुळे त्सुनामी उदभवू शकते. परंतु, बहुतेक विनाशकारी त्सुनामी समुद्राखालील भूकंपांमुळे निर्माण होतात; ज्यांचा केंद्रबिंदू फॉल्ट लाइनजवळ किंवा ५० किमीपेक्षा कमी खोलीवर होतो. जेव्हा दोन अभिसरण करणाऱ्या भूपट्टी (Lithospheric Plates) एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा हलक्या प्लेटच्या खाली जड प्लेट दबली जाते आणि शिलावरणाचे विस्थापन सबडक्शन झोनमध्ये होते. या प्रक्रियेदरम्यान भूकंप होतो; ज्यामुळे ‘त्सुनामी’ येते.

२) भूस्खलन (Landslides) : भूस्खलन, तसेच खडकांचे कोसळणे, बर्फाचे कोसळणे (Avalanches) इत्यादींमुळे समुद्रातील पाण्याचे विस्थापन झाल्यामुळे त्सुनामी लाटा निर्माण होतात. १९८० च्या दशकात दक्षिण फ्रान्सच्या किनारपट्टीवर विमानतळाच्या धावपट्टीच्या बांधकामामुळे पाण्याखाली भूस्खलन झाले. त्यामुळे थेब्स बंदरात विनाशकारी त्सुनामीच्या लाटा उसळल्या. समुद्राच्या तळाला भूकंप होऊन पाण्याखाली भूस्खलन होते. त्यामुळेदेखील त्सुनामी तयार होते.

३) ज्वालामुखीचा उद्रेक (Volcanic Eruptions) : जेव्हा जेव्हा समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा तेव्हा समुद्राच्या पाण्याचे अचानक विस्थापन होते आणि त्सुनामीच्या लाटा तयार होतात. इंडोनेशियातील क्राकाटोआच्या ज्वालामुखीचा स्फोट २६ ऑगस्ट १८८३ रोजी नोंदवलेल्या सर्वांत मोठ्या आणि सर्वांत विनाशकारी त्सुनामींपैकी एक होता. या स्फोटामुळे सुमारे ४० मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या; ज्याने जावा व सुमात्रा या दोन्ही बेटांमधील सुंदा सामुद्रधुनीलगतच्या किनारपट्टीच्या भागात विनाशात्मक परिस्थिती निर्माण केली आणि त्यामुळे ३६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

४) उल्का आणि लघुग्रह (Meteorites and Asteroids) : समुद्रात उल्का आणि लघुग्रह पडून त्सुनामी निर्माण होण्याचा संभाव्य धोका असतो.

त्सुनामींचा प्रसार (Propagation of the Tsunami) :

त्सुनामीमध्ये खूप लांबलचक लाटांची मालिका असते; जी महासागराच्या पृष्ठभागावर त्यांच्या उत्पत्तीच्या ठिकाणापासून सर्व दिशांनी जाते. त्यांची हालचाल तळ्यात गारगोटी टाकून निर्माण झालेल्या तरंगांसारखी असते. खोल समुद्रात त्सुनामी खूप वेगाने प्रवास करतात (म्हणजे ५००-८०० किमी प्रतितास), जेवढा जेट विमानाचा वेग असतो. त्यांची तरंगलांबी (Wavelength) खूप लांब असते; जी अनेकदा ५००-७०० किमीपेक्षा जास्त असते.
भौतिकदृष्ट्या ते पुढे दिलेल्या गतीने लांब लाटा म्हणून प्रसारित करतात –

त्सुनामीची गती = (पाण्याची खोली x गुरुत्वाकर्षण प्रवेग)^१/२

त्सुनामी महासागराचे खोल पाणी सोडून उथळ पाण्याच्या दिशेने प्रवास करीत असताना त्यांचे दोन प्रकारे रूपांतर होते. प्रथमतः त्यांचा वेग बराच कमी होतो आणि दुसरे म्हणजे ते १० मीटरपेक्षा जास्त उंची गाठतात. कधी कधी त्या ३० मीटर उंचीपर्यंत पोहोचतात.

हिंदी महासागरातील त्सुनामी (Tsunamis in the Indian Oceans) :

हिंदी महासागरात अनेक वेळा त्सुनामी निर्माण झाल्या आहेत. १८८३ मध्ये क्राकाटोआच्या ज्वालामुखी उद्रेकाने त्सुनामीला उत्तेजन दिले; ज्यामुळे इंडोनेशियाच्या जावा व सुमात्रा बेटांवर ३६ हजार लोक मारले गेले. १८८० मध्ये भूकंप झाला; ज्याचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी होता, तेव्हाही त्सुनामीची नोंद झाली. १६ जून १८१९ च्या कच्छच्या भूकंपामुळे त्सुनामी आली; ज्यामुळे किनारी भाग बुडाला आणि मच्छीमारांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले. तेव्हा २४ किमी लांबीचे जमिनीचे क्षेत्र भूकंपामुळे उदभवलेल्या टेक्टोनिक हालचालीमुळे वरच्या दिशेने आले; जेथे अनेक जण मरून पडले होते, तसेच अडकलेल्या अनेक लोकांना आश्रय मिळाला होता. तेव्हापासून लोक या वर आलेल्या जमिनीला ‘अल्लाहचा बंध’ (Allah’s Bund) (देवाने तयार केलेला बांध), असे म्हणतात. २६ डिसेंबर २००४ रोजी हिंद महासागराला त्सुनामीचा तडाखा बसला होता. रिश्टर स्केलवर ८.९ तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे ही त्सुनामी उद्भवली होती.