सागर भस्मे

मागील लेखातून आपण हिंदी महासागरातील द्विध्रुव (Indian Ocean Dipole) आणि पश्चिमी विक्षोभ (Western Disturbances) म्हणजे काय? त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होतो, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण वॉकर सर्क्युलेशन आणि एन्सो या संकल्पना काय आहेत? आणि त्यांचा भारतीय मान्सूनवर कसा परिणाम होतो, याबाबत जाणून घेऊ.

Unnatural abuse, dog, abuse,
श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, भारतीय न्याय संहितेत कलमाबाबत अस्पष्टता
epilepsy permanent relief marathi news
विश्लेषण: ‘एपिलेप्सी’च्या झटक्यांपासून कायमची मुक्ती? ब्रिटनमधील क्रांतिकारी संशोधन काय आहे?
what is stage 3 cancer
Hina Khan : अभिनेत्री हिना खानला स्टेज-३ स्तनाचा कर्करोग; स्टेज-३ कर्करोग नेमका काय असतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
Loksatta kutuhal Maculochpitts neuron Intelligence
कुतूहल: मॅक्युलोचपिट्स न्यूरॉन
mp supriya sule comment on growing variety of reels
सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रील्सवर भाष्य… म्हणाल्या, पाच मिनिटे…
Mpsc Mantra Gazetted Civil Services Joint Prelims Common
Mpsc मंत्र: राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षासामान्य विज्ञान
microplastics in penise
पुरुषांच्या अंडकोषानंतर आता लिंगातही आढळले प्लास्टिक; इरेक्टाईल डिसफंक्शनचा धोका वाढला का?
Fitch revised its growth forecast to 7 2 percent
‘फिच’कडून ७.२ टक्क्यांच्या विकासदराचा सुधारित अंदाज

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘हिंदी महासागरातील द्विध्रुव’ ही संकल्पना काय आहे? त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होतो?

वॉकर सर्क्युलेशन (Walker Circulation) :

पृथ्वीच्या खालच्या वातावरणात म्हणजेच तपांबरामध्ये हवेच्या विशिष्ट दिशेने होणाऱ्या परिसंचरणाचा शोध गिल्बर्ट वॉकर या हवामानशास्त्रज्ञाने १९२० मध्ये लावला होता. तर, १९६९ साली नॉर्वेजियन-अमेरिकन हवामानशास्त्रज्ञ जेकब बरकनेस (Jacob Bjerknes) यांनी ‘वॉकर सर्क्युलेशन’ हा शब्द प्रथम वापरात आणला.

भारतीय हवामान विभागाचे प्रमुख म्हणून काम बघत असताना गिल्बर्ट वॉकर यांच्या असे लक्षात आले की, जेव्हा दक्षिण प्रशांत महासागरावर उच्च दाब निर्माण होतो, तेव्हा दक्षिण हिंदी महासागरावर कमी दाब असतो. या दोन्ही महासागरांवरील दाबाच्या भिन्नतेमुळे (Pressure Gradient) हवा उच्च दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच प्रशांत महासागरावरून हिंदी महासागराच्या दिशेने वाहते. या हवेच्या अभिसरणाला ‘वॉकर सर्क्युलेशन’ असे म्हटले जाते. हे वायुसंचरण भारतीय मान्सूनसाठी अनुकूल ठरते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले, तर हिवाळ्याच्या महिन्यात जेव्हा हिंदी महासागरावर कमी दाब निर्माण होतो, तेव्हा भारतात येणारा मान्सून चांगला राहण्याची व पुरेसा पाऊस पाडण्याची शक्यता असते.

अशा प्रकारचे सामान्य अभिसरण कधी कधी काही कारणांस्तव भिन्नता दिसून येते आणि त्यामुळे भारतीय मान्सून वाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम घडतात. हे कसे ते बघू :

ला निना (La Nina) : याला गर्ल चाइल्ड म्हटले जाते. ही बाब ‘वॉकर सर्क्युलेशन’च्या सामान्य स्थितीला आणखी प्रबळ बनवते. म्हणजेच दक्षिण प्रशांत महासागराच्या उच्च दाबाला तीव्र रूप देऊन नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना गतिमान करते. त्यामुळे भारतात मुसळधार पाऊस पडतो.

एन्सो (El Nino Southern Oscillations ENSO) / दक्षिण दोलन : यालाच ‘चाइल्ड ख्रिस्त’ म्हटले जाते, कारण- तो ख्रिसमसच्या आसपास दिसतो. हीसुद्धा वॉकर सर्क्युलेशनची सामान्य स्थिती असून, त्यामध्ये विपरीत बदल होऊन एल निनोची परिस्थिती निर्माण होते. जेव्हा दक्षिण प्रशांत महासागराच्या पूर्व किनाऱ्याला कमी दाब निर्माण होतो, त्यावेळी दक्षिण हिंदी महासागरावर उच्च दाब निर्माण होतो आणि वाऱ्यांची दिशा सामान्य अभिसरणाच्या विरुद्ध होते. वारे प्रशांत महासागरावरून हिंदी महासागराकडे न येता, उलट हिंदी महासागरावरून प्रशांत महासागराकडे वळतात आणि पेरूच्या किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पाडतात. या कारणास्तव भारतीय नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची तीव्रता कमी होऊन भारतीय उपखंडात पाऊस कमी पडतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : मान्सूनचे आगमन कधी होते? भारतात त्याचा प्रवास असतो?

दक्षिण दोलनाची (ENSO) मुख्य अडचण अशी आहे की, ते कोणत्या वर्षी घडून येणार याची निश्चितता नसते. त्याचा कालावधी दोन ते पाच वर्षांपर्यंत बदलत राहतो. कधी दोन वर्षांतच ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होते; तर कधी पाच वर्षांनंतरही ती घडून येऊ शकते. ज्या प्रकारे हवेची दिशा एल निनोला प्रभावीत करते, त्या प्रकारे समुद्री प्रवाहसुद्धा एल निनोला प्रभावीत करतो. एल निनो वर्षामध्ये विषुवृत्तीय उष्ण समुद्री प्रवाह पेरू किनाऱ्यावर येतो आणि येथील वातावरणीय दाब कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे एल निनो आणखी उग्र रूप धारण करतो. या परिस्थितीत भारतात दुष्काळ पडण्याची शक्यता असते; तर पेरू किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता असते. परिणामत: पेरू देशातील मासेमारी जवळपास बंद होऊन लोकांचे आर्थिक जीवन धोक्यात येते.