मागील लेखातून आपण केंद्रीय मंत्रिमंडळासंदर्भात संविधानातील तरतुदी, मंत्र्यांच्या नियुक्ती, त्यांचे वेतन आणि त्यांच्या जबाबदाऱ्या यांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण मंत्रिमंडळ व कॅबिनेट यांच्यात नेमका काय फरक आहे. तसेच त्यांची रचना आणि कार्ये कोणती याबाबत जाणून घेऊ.

हेही वाचा – UPSC-MPSC : संसदेची रचना कशी असते? राष्ट्रपती हे संसदेचा भाग असतात का?

कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Pankaja Munde
Pankaja Munde : महायुतीत ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरुन दोन मतप्रवाह; अजित पवारानंतर आता पंकजा मुंडेंनीही मांडली भूमिका
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
Congress response to Fadnavis criticism of the Prime Minister print politics news
‘पंतप्रधानांना बदलायचे आहे हे तेच संविधान’; फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

मंत्रिमंडळ : रचना आणि कार्ये

साधारणत: मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट हे दोन्ही शब्द एकमेकांना पर्यायी शब्द म्हणून वापरले जातात. मात्र, या दोन्हींमध्ये फरक आहे. मंत्रिमंडळ ही एक मोठी संस्था असून, त्यात ६० ते ७० जणांचा समावेश असतो, तसेच यात कॅबिनेट, राज्यमंत्री व उपमंत्रीही असतात. मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते. कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे मंत्रिमंडळाचे प्राथमिक कार्य आहे. तसेच मंत्रिमंडळाची इतर कार्ये ही कॅबिनेटद्वारे निश्चित केली जातात.

मंत्रिमंडळ ही एक घटनात्मक संस्था असून, तिची निर्मिती संविधानातील अनुच्छेद ७४ अंतर्गत केली जाते. मंत्रिमंडळातील सदस्यांच्या संख्येबाबत मूळ संविधानात कोणतीही तरतूद नव्हती. मात्र, २००३ च्या ९१ व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे यात सुधारणा करून मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, अशी तरतूद करण्यात आली.

हेही वाचा – UPSC-MPSC : केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना कशी असते? त्यात किती प्रकारच्या मंत्र्यांचा समावेश होतो?

कॅबिनेट : रचना आणि कार्ये

कॅबिनेट ही एक लहान संस्था असून, त्यामध्ये १५ ते २० मंत्र्यांचा समावेश समावेश होतो. देशाच्या धोरणनिर्मितीमध्ये कॅबिनेटची महत्त्वाची भूमिका असते. एक संस्था म्हणून कॅबिनेटच्या वारंवार (साधारणत: प्रत्येक आठवड्याला) बैठका होतात. या बैठकांमध्ये घेतलेले निर्णय सर्व मंत्र्यांना बंधनकारक असतात. दरम्यान, मूळ राज्यघटनेत कॅबिनेटचा समावेश नव्हता. १९७८ मध्ये करण्यात आलेल्या ४४ व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे अनुच्छेद ३५२ मध्ये याचा समावेश करण्यात आला. अनुच्छेद ३५२ मध्ये कॅबिनेटची व्याख्या ‘अनुच्छेद ७५ नुसार नियुक्त झालेले पंतप्रधान आणि कॅबिनेट दर्जाचे मंत्री असलेले मंडळ’, अशी व्याख्या करण्यात आली आहे.