मागील लेखातून आपण राष्ट्रपती पदासाठीची पात्रता, अटी, कार्यकाळ, महाभियोग प्रक्रिया, अधिकार आणि त्यांची कार्ये याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण उपराष्ट्रपती पदासाठीची पात्रता, अटी आणि त्यांच्या कार्यकाळाबाबत जाणून घेऊ या. भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या भागातील अनुच्छेद ६३ अंतर्गत उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती हे पद देशातील दुसरे सर्वोच्च पद आहे. या पदाची रचना अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या पदाप्रमाणे करण्यात आली आहे. भारतात उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांच्याकडे दुसरी कोणतीही मोठी जबाबदारी नसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा – UPSC-MPSC : राज्यशास्त्र : भारताचे राष्ट्रपती; महाभियोग, अधिकार आणि कार्य
उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता
कोणत्याही व्यक्तीला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची असल्यास त्याला पुढील अटींची पूर्तता करणे आवश्यक असते.
- तो भारतीय नागरिक असावा.
- त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
- त्या व्यक्तीकडे राज्यसभा सदस्यपदासाठी लागणारी पात्रता असावी.
- महत्त्वाचे म्हणजे त्याने कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे.
वरील पात्रता पूर्ण करणारी व्यक्ती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकते. मात्र, उमेदवारीच्या नामनिर्देशनावर किमान २० मतदारांनी प्रस्तावक म्हणून आणि २० मतदारांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित व्यक्तीने रिझर्व्ह बॅंकेत १५ हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून ठेवणेही आवश्यक असते.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक एकल संक्रमणीय गुप्त मतदान पद्धतीने होते. त्यामध्ये निर्वाचित आणि नामनिर्देशित अशा दोन्ही प्रकारचे सदस्य भाग घेतात. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रपतींप्रमाणे घटक राज्यांच्या विधिमंडळातील सदस्य या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत नाहीत.
उपराष्ट्रपदी पदाची शपथ आणि अटी
शपथ : उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतींद्वारे किंवा त्यांच्या वतीने नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीद्वारे शपथ दिली जाते. संविधानाविषयी विश्वास व निष्ठा बाळगणे आणि आपले कर्तव्य पूर्ण करण्याची शपथ उपराष्ट्रपती घेतात.
अटी : संविधानानुसार उपराष्ट्रपती पदासाठी दोन अटींची तरतूद करण्यात आली आहे. एक म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणारी व्यक्ती कोणत्याही सभागृहाची सदस्य असू नये आणि दुसरे म्हणजे त्याने कोणतेही लाभाचे पद धारण केलेले असू नये.
उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ
उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. त्यांनी शपथ घेतल्याच्या तारखेपासून हा कार्यकाळ सुरू होतो. मात्र, त्यापूर्वी ते केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करू शकतात. तसेच कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांना पदावरून दूरही केले जाऊ शकते. त्यासाठीचा प्रस्ताव राज्यसभेत प्रभावी मताने आणि लोकसभेत साध्या बहुमताने पारित करावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे हा ठराव केवळ राज्यसभेतच मांडला जाऊ शकतो. तसेच त्यापूर्वी १४ दिवसांची पूर्वसूचना देणे आवश्यक असते.
हेही वाचा – UPSC-MPSC : राज्यशास्त्र : भारताचे राष्ट्रपती; पात्रता, अटी अन् कार्यकाळ
उपराष्ट्रपतींचा अधिकार आणि कार्ये
उपराष्ट्रपती प्रामुख्याने दोन प्रकारची कार्ये पार पाडतात. एक म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तसेच राष्ट्रपतींच्या गैरहजेरीत ते राष्ट्रपतींची कार्ये पार पाडतात. महत्त्वाचे म्हणजे या काळात उपराष्ट्रपतींना राज्यसभेच्या अध्यक्षांप्रमाणेच वेतन व भत्ते दिले जातात. २०१८ मध्ये संसदेने राज्यसभेच्या अध्यक्षांचे वेतन १.२५ लाखावरून चार लाखांपर्यंत करण्यात आले.
काही उदाहरणे
माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन झाल्यानंतर तत्कालीन उपराष्ट्रपती व्ही. व्ही.ज्ञगिरी यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. तसेच फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन झाले तेव्हा तत्कालीन उपराष्ट्रपती बी. डी. जट्टी यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.