सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारत आणि जपान यांच्यातील संबंधांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यानच्या संबंधांबाबत जाणून घेऊया. ऑस्ट्रेलिया हा देश दक्षिण गोलार्धात पॅसिफिक आणि भारतीय महासागरांमध्ये वसलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या ऑस्ट्रेलिया भारताच्या शेजारी नसला, तरी सामरिकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाचा भागीदार देश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेक समानता आहेत. त्यातील प्रकर्षाने दिसणारी बाब म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि बहुसांस्कृतिक लोकशाही. दोन्ही देशांत माध्यमांना असलेलं स्वातंत्र्य आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. क्रिकेट आणि आता मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी जातात, हे भारत – ऑस्ट्रेलिया संबंध वाढवणारे महत्त्वपूर्ण घटक आहेत.

Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार रद्द, कारण काय? याचा काय परिणाम होणार?
India Bangladesh relations, Foreign Secretary talks
भारत-बांगलादेश संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत हिंदूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
Indian Foreign Secretary Vikram Misri visits Bangladesh
परराष्ट्र सचिव मिस्राी आज ढाक्यात; बांगलादेशला दोन्ही देशांतील तणाव निवळण्याची आशा

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-जपान संबंध; ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आर्थिक संबंध

स्वातंत्र्यपूर्व काळात ऑस्ट्रेलिया आणि भारताने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. १९४१ मध्ये सिडनी येथे भारताचे महावाणिज्य दूतावास प्रथम व्यापार कार्यालय म्हणून उघडण्यात आले होते. ऑस्ट्रेलियातील भारताचे पहिले उच्चायुक्त कॅनबेरा येथे उघडण्यात आले. भारताची संविधान सभा राज्यघटना तयार करत होती, तेव्हा विविध देशांच्या घटनेचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची, देशात आणि राज्यांमधील व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य, लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक या बाबी घेतल्या. यावरून भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या संबंधातील लोकशाहीचे मूळ लक्षात येते. १९९० च्या दशकात भारताने केलेल्या आर्थिक सुधारणांनंतर दोन्ही देशांतील संबंध बळकट झाले आणि व्यापार, ऊर्जा आणि खाणकाम, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती केली.

१९६२ मध्ये चीनसोबतच्या सीमा विवादादरम्यान ऑस्ट्रेलियाने भारताला पाठिंबा दिल्याने दोघांमधील संबंध आणखी मजबूत झाले. १९८५ साली ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीमुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. १९९२ मध्ये स्थापन झालेल्या ऑस्ट्रेलिया-भारत परिषदेमुळेही हे संबंध अधिक व्यापक झाले. २००८ मध्ये दोन्ही देशांदरम्यान ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’वर (Stratergic Partnership) स्वाक्षरी झाली आणि तेव्हापासून दोन्ही देशांदरम्यानचे संबंध मोठ्या प्रमाणात विस्तारले आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-रशिया संबंध; सहकार्याची क्षेत्रे

द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार संबंध :

दोन्ही देशांनी आर्थिक संबंध विकसित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारत हा ऑस्ट्रेलियाचा आठवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. ऑस्ट्रेलियातून भारताची आयात १७ अब्ज डॉलर इतकी आहे; तर ऑस्ट्रेलियाला भारताकडून निर्यात १०.५ अब्ज डॉलर इतकी केली जाते. ऑस्ट्रेलियामधून भारताची ९६% आयात प्रामुख्याने कच्चा माल आणि मध्यवर्ती वस्तूच्या माध्यमातून केली जाते. दोन्ही देशांदरम्यान आयात निर्यात होणाऱ्या वस्तूचा विचार करता – पेट्रोलियम, औषधी, मोती आणि रत्ने, दागिने, टेक्सटाइल आर्टिकल्स, कपडे, बेस मेटलची निर्मिती ही भारताची ऑस्ट्रेलियाला होणारी मुख्य निर्यात आहे. कोळसा, तांबे धातू, नैसर्गिक वायू, नॉन-फेरस कचरा व भंगार आणि शिक्षणाशी संबंधित सेवा ही भारताची प्रमुख आयात आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त मंत्रीस्तरीय आयोग (JMC) ची स्थापना १९८९ मध्ये व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित मुद्द्यांवर सरकारी आणि व्यावसायिक स्तरावर परस्पर संवाद सक्षम करण्यासाठी करण्यात आली होती.

संरक्षण सहकार्य :

२०१४ मध्ये भारतीय पंतप्रधानांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान, दोन्ही बाजूंनी संशोधन, विकास आणि उद्योग गुंतवणुकीसाठी संरक्षण सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला. संरक्षण मंत्र्यांच्या स्तरावर नियमित बैठका घेणे आणि नियमित सागरी सराव आयोजित करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले. ‘पिच ब्लॅक’ हा द्विवार्षिक युद्ध अभ्यास रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स (RAAF) द्वारे आयोजित केला जातो, त्यात ऑस्ट्रेलिया व भारताच्या हवाई दलाच्या सैन्यांचा सहभाग असतो. दोन्ही देशांतील सशस्त्र दलांमधील सहकार्य सुधारण्यासाठी लष्करादरम्यान दरवर्षी ‘AUSINDEX’ नावाचा युद्ध अभ्यास केला जातो. अलीकडेच, दोन्ही देशांत संरक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी २+२ मंत्रीस्तरीय संवाद सप्टेंबर २०२१ मध्ये पार पडला. तसेच संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी जून २०२० मध्ये वर्च्युअल समिटदरम्यान म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्ट करारावर (MLSA) स्वाक्षरी करण्यात आली होती.

भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांतील काही सकारात्मक पैलू :

  • २०२० मध्ये, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी धोरणात्मक भागीदारीपासून सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीपर्यंत (Comprehensive Strategic Partnership) द्विपक्षीय संबंध उन्नत केले.
  • दोन्ही देश QUAD, कॉमनवेल्थ, इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA), ASEAN रीजनल फोरम, आशिया पॅसिफिक पार्टनरशिप ऑन क्लायमेट अँड क्लीन डेव्हलपमेंट अशा आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्य आहेत.
  • म्युच्युअल रिकग्निशन ऑफ एज्युकेशनल क्वॉलिफिकेशन्स (MREQ) वर मार्च २०२३ मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणास जाण्या-येण्यासाठी सुलभता येईल.
  • २०१४ मध्ये दोन्ही देशांदरम्यान ‘नागरी आण्विक सहकार्य करारावर’ स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यामुळे भारतात ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी दिसून आली आहे.
  • दोन्ही देशांदरम्यानच्या वाढत्या संबंधाचे उदाहरण म्हणजे – अलीकडच्या वर्षांत ऑस्ट्रेलियाने भारताला भारताच्याच प्राचीन अशा अनेक कलाकृती भेट दिल्या. त्यामध्ये आर्ट गॅलरी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलियामधील नटराजाची कांस्य मूर्ती, नागराज पाषाण शिल्प, दोन द्वारपाल दगडी शिल्पे (2020) यांचा समावेश आहे.

Story img Loader