सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारत आणि ब्रिटन या दोन देशांतील संबंधांचा इतिहास आणि पार्श्वभूमी याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण दोन्ही देशांमधील राजकीय तसेच अर्थिक संबंध आणि इतर सहकार्याच्या क्षेत्राबाबत जाणून घेऊया.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
mazhi maitrin
माझी मैत्रीण : …आणि मैत्रीचे बंध दृढ झाले
maharashtra richest candidate for assembly election 2024
पायाला फ्रॅक्चर, गोल्फ कार्टवर मतदारसंघात प्रचार; महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवाराची जोरदार चर्चा!
Aditya Thackeray at mumbai first
मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत; ‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका
india, taliban, importance of Afghanistan
विश्लेषण : भारताची अखेर तालिबानशी चर्चा! अफगाणिस्तान आपल्यासाठी का महत्त्वाचा?

भारत-ब्रिटन यांच्यातील राजकीय संबंध :

भारताचे लंडनमध्ये उच्चायुक्त (High Commission) आहेत आणि बर्मिंगहॅम आणि एडिनबर्ग येथे दोन दूतावास (consulates) आहेत. तसेच ब्रिटनचे नवी दिल्ली येथे मुख्य उच्चायुक्त आहेत आणि मुंबई, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद व कोलकाता येथे पाच उप उच्चायुक्त (Deputy High commissions) आहेत. ब्रिटनमध्ये भारतीय लोकसंख्या १.५ दशलक्षाहून अधिक वास्तव्यास आहे, यावरून दोन्ही देशांमधील सकारात्मक ‘Peoples to Peoples’ संबंध दिसून येतात. दोन्ही देश जागतिक व्यापार संघटना आणि आशियाई विकास बँकेचे सदस्य आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-ब्रिटन संबंध; इतिहास आणि पार्श्वभूमी

दोन्ही देशांमधील संबंध उच्च स्तरावर नेण्यासाठी जून १९६३ मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑक्टोबर १९९० मध्ये वेंकटरामन आणि २००९ मध्ये प्रतिभा पाटील या भारताच्या तीन राष्ट्रपतींनी ब्रिटनला भेटी दिल्या आहेत. तसेच मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यासह भारताच्या इतर पंतप्रधानांनीही आपल्या कार्यकाळात ब्रिटनला भेटी दिल्या आहे. २००४ मध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये सुधारणा केल्यामुळे ब्रिटनसोबतचे भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक घट्ट झाले. ब्रिटन युनायटेड नेशनच्या स्थायी सदस्यत्वाच्या भारताच्या प्रस्तावाला समर्थन देतो. यावरून असे दिसून येते की, भारत-ब्रिटन संबंधांना मजबूत करण्यात दोन्हीही तत्कालीन राज्यकर्त्यांची सकारात्मक भूमिका महत्त्वाची आहे.

भारत-ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध :

व्यापार आणि त्यातील अडथळे दूर करण्यासाठी व व्यावसायिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी २००५ मध्ये दोन्ही देशांदरम्यान संयुक्त, आर्थिक आणि व्यापार समिती (JETCO) ची स्थापना करण्यात आली. यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंधांना एक मजबूत दिशा मिळाली. २०२१ मध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यातील एकूण व्यापार १३.११ अब्ज डॉलर इतका होता. २०२१ पर्यंत भारत हा ब्रिटनचा १५ वा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश होता, तर ब्रिटन हा भारताचा १८ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश होता. ब्रिटनमध्ये भारताची मुख्य निर्यात तयार कपडे आणि कापड, रत्ने आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उत्पादने, वाहतूक उपकरणे, मसाले, यंत्रसामग्री आणि उपकरणे, औषधी आणि सागरी उत्पादने आहेत. अलीकडेच दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करारा (FTA) साठी वाटाघाटी आणि चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान व्यापाराला वेगळी दिशा मिळेल.

भारत-ब्रिटन संरक्षण संबंध :

दोन्ही देशांतील सशस्त्र दलांमधील सहकार्य सुधारण्यासाठी लष्करादरम्यान दरवर्षी ‘अजय वॉरियर’ नावाचा युद्ध अभ्यास केला जातो. संरक्षण तंत्रज्ञानामध्ये विशेषत: जेट इंजिन विकास आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन तंत्रज्ञानामध्ये ब्रिटनला जागतिक स्तरावर अग्रेसर मानले जाते. ब्रिटनने संबंधित उद्योगांद्वारे भारतासोबत हे कौशल्य सामायिक (Technology Transfer) करण्याची तयारी दर्शविली आहे. २०२२ मध्ये ब्रिटनने भारताला प्रगत मूलभूत तंत्रज्ञान ऑफर केले आहे. ज्याद्वारे भारत हा स्वदेशी जेट इंजिन तयार करण्यास सक्षम असेल व भारत त्याचे स्वतंत्र्यरित्या उत्पादन आणि निर्यात करू शकेल.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-इस्रायल संबंध; द्विपक्षीय व्यापार अन् सहकार्याची क्षेत्रे

भारत-ब्रिटन यांच्यातील इतर क्षेत्रातील सहकार्य :

  • दोन्ही राष्ट्रांनी २०१० मध्ये ‘नागरी आण्विक सहकार्य’ या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली आहे, जी आण्विक व्यापारासह आण्विक क्षेत्रात दोन्ही देशांच्या वैज्ञानिक संस्थांमधील सहकार्याला सुलभ करण्यास मदत करेल.
  • विज्ञान व तंत्र क्षेत्रातील सहकार्यासाठी १९९६ मध्ये ‘Science and Technology Agreement’ वर स्वाक्षरी केली. त्यानंतर २००६ मध्ये, ‘Science and Innovation Council’ ची स्थापना करून सहकार्याला एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न झाला.
  • मंत्रिस्तरीय ऊर्जा संवाद तसेच हवामान, ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा यांवर संयुक्त कार्यगटांसह विविध यंत्रणांद्वारे भारत आणि ब्रिटन हवामानाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करते.
  • आरोग्य क्षेत्रातील सहयोग हा भारत-ब्रिटन संबंधातील धोरणात्मक भागीदारीचा प्रमुख घटक आहे. अलीकडचेच उदाहरण घ्यायचे म्हटले तर, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अॅस्ट्राझेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यातील कोविड १९ लसीवरील यशस्वी भागीदारीमुळे आंतरराष्ट्रीय आव्हाने सोडवण्यासाठी भारत आणि ब्रिटनचे संबंध एकत्रितपणे काम करण्याची क्षमता दाखवून देते.
  • भारत आणि बिटनने २०१० मध्ये सांस्कृतिक सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.