सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील संबंधांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण भारत आणि फ्रान्स या दोन देशांतील संबंधांबाबत जाणून घेऊ या. भारत आणि फ्रान्सचे संबंध सुरुवातीपासूनच घनिष्ठ व मैत्रीपूर्ण राहिले आहेत. या दोन्ही देशांमधील समानता पाहिली, तर दोन्ही देशांमध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले जाते. ज्याप्रमाणे भारत स्वातंत्र्यानिमित्त अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे, त्याचप्रमाणे इंडो-फ्रेंच मैत्रीपूर्ण संबंधालाही ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने फ्रान्सशी केलेला सामरिक भागीदारीचा करार हा द्विपक्षीय संबंधांतील मैलाचा दगड ठरला आहे. दोन्ही देशांतील राज्यप्रमुखांच्या नियमित उच्चस्तरीय बैठकींद्वारे संरक्षण, दहशतवाद, अणुऊर्जा व अंतराळ यांसारख्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.

candidature of Sameer Bhujbal Nirmala Gavit Rajshree Ahirrao remains in nashik
महायुती, मविआ दोघांनाही बंडखोरीचा त्रास; समीर भुजबळ, निर्मला गावित, राजश्री अहिरराव यांची उमेदवारी कायम
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Siddhi Kadam Withdraw Mohol
Siddhi Kadam : मोहोळमधून रमेश कदम आणि सिद्धी कदम यांची माघार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राजू खरेंना दिलासा
Foreign Minister S Jaishankar expressed confidence that he expects progress in relations with China
चीनबरोबरच्या संबंधांमध्ये प्रगतीची अपेक्षा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडून विश्वास व्यक्त
WTC Points Table India Lost 1st Spot After Consecutive 3 Test Defeat in India vs New Zealand
WTC Points Table: भारताने गमावले पहिले स्थान, WTC गुणतालिकेत सलग ३ पराभवांनंतर बसला मोठा धक्का
The Safekeep novel in marathi
सेफकीप – हिमनगाच्या टोकासारखं नाट्य
New record of UPI transactions
UPI Transactions: यूपीआय व्यवहारांचा नवीन विक्रम; ऑक्टोबरमध्ये २३.५ लाख कोटी मूल्याचे १६.५८ अब्ज व्यवहार
us action on 19 Indian companies
१९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध, युक्रेनविरोधी युद्धात रशियाला मदत आरोप

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-अमेरिका संबंध; द्विपक्षीय व्यापार आणि सहकार्याची क्षेत्रे

भारत- अमेरिका नागरी आण्विक सहकार्य कराराच्या आधारे भारताला अणुऊर्जेच्या शांततापूर्ण विकासासाठी आंतरराष्‍ट्रीय सहकार्याची परवानगी मिळताच फ्रान्स हे पहिले राष्‍ट्र होते; ज्याने भारताशी यासंबंधी तत्काळ करार केला होता. १९९८ साली भारताने पोखरणमध्ये केलेल्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र, त्यावेळी फ्रान्स भारताच्या बाजूने उभा राहिला. एवढेच नाही, तर फ्रान्सने भारताला तारापूर अणुभट्ट्यांसाठी युरेनियमचा पुरवठा करून सहकार्य केले. भारत-फ्रान्स आर्थिक भागीदारी काही वर्षांपासून स्थिर आहे. दोन्ही देशांदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार २०२२-२३ या आर्थिक वर्षात १३.४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

व्यापार, गुंतवणूक, संस्कृती, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यांसारख्या इतर क्षेत्रांमध्येही दोन्ही देशांदरम्यान व्यापक सहकार्य वाढले आहे. ‘युनायटेड नेशन’मध्ये भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासह (Permanent Member) आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला फ्रान्सने सातत्याने पाठिंबा दिला आहे. दोन्ही देश बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे (Multi Polar World Order) समर्थन करतात. दोन्ही देशांचे संबंध प्रामुख्याने खालील तीन स्तंभांच्या आधारे मजबूत झाले आहेत.

  • एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे.
  • धोरणात्मक स्वायत्तता आणि परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादावर दृढ विश्वास.
  • दुसऱ्या देशांना स्वतःच्या युती आणि आघाड्यांमध्ये खेचण्यास नकार

या धोरणांमुळे दोन्ही देशांदरम्यानचे संबंध जगभरात असलेल्या इतर प्रमुख भागीदारीपेक्षा वेगळे असल्याचे सिद्ध झाले आहेत. दहशतवाद, धोरणात्मक अर्थव्यवस्था यांवर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांच्या समान दृष्टिकोनापासून ते विविध क्षेत्रांत मजबूत द्विपक्षीय संबंध स्थापित करण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक भागीदारीमुळे हे दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-इराण संबंध; द्विपक्षीय व्यापार आणि सहकार्याची क्षेत्रे

दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी झालेले काही महत्त्वाचे करार :

  1. भारत आणि फ्रान्सने सातत्याने दहशतवादाचा निषेध केला आहे. ‘युनायटेड नेशन’मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील मुद्द्यांवर दोन्ही देश एकत्र काम करीत आहेत.
  2. दोन्ही देशांनी २०१८ साली “Exchange and Reciprocal Protection of Classified or Protected Information” करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत; ज्यामुळे देशाला धोकादायक असलेल्या कृतीची बातमी एकमेकांना मिळताच माहितीची देवाण-घेवाण लगेच केली जाईल; जेणेकरून त्यावर अगोदरच कारवाई करण्यास मदत होईल.
  3. भारत आणि फ्रान्सने दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांना लॉजिस्टिक साह्य वाढवण्यासाठी करार केला आहे.
  4. अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक संबंधांवर आधारित भारत आणि फ्रान्स या दोघांनी २०१८ मध्ये ‘अंतराळ सहकार्यासाठी संयुक्त दृष्टिकोन’ जारी केला आहे; ज्याअंतर्गत दोन्ही राष्ट्रे एकमेकांना अंतराळ क्षेत्रात मदत करतील. भारतातील पहिली मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’च्या सहकार्यासाठी करारावर फ्रान्सने केलेली स्वाक्षरी हे या बाबतीतील अलीकडचेच उदाहरण म्हणता येईल. या सहकार्य करारामुळे अंतराळ मोहिमेत उड्डाण करणाऱ्या फ्लाइट फिजिशियनना फ्रान्सची अंतराळ एजन्सी सीएनईएस ही प्रशिक्षण देणार आहे.

संरक्षण क्षेत्रातील सहकार्य :

दोन्ही देशांतील सशस्त्र दलांमधील सहकार्य सुधारण्यासाठी लष्करादरम्यान दरवर्षी ‘शक्ती (लष्करी), व्यायाम वरुणा (नौदल), गरुड (वायुसेना)’ नावाचे युद्धाभ्यास केले जातात. दोन्ही देशांत या क्षेत्रातील सहकार्यावर नियमित चर्चा चालू राहते. भारत आणि फ्रान्समध्ये २०१६ साली ३६ राफेल विमानांसाठी ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला होता. फ्रान्सने त्या ३६ राफेल विमानांची पूर्तता २०२२ च्या अखेरपर्यंत केली. २००५ मध्ये परवाना कराराद्वारे सहा पाणबुड्या बांधण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यात महत्त्वाचा करार झाला होता. दोन्ही देशांनी माहितीची देवाण-घेवाण, ऑपरेशनल सहकार्य, परस्परक्षमता वाढवणे, द्विपक्षीय सरावांचा विस्तार करणे, तसेच सागरी, अंतराळ व सायबर या क्षेत्रांत नवीन उपक्रम राबवून द्विपक्षीय संरक्षण व सुरक्षा भागीदारी मजबूत करण्याचे मान्य केले आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-जर्मनी संबंध; द्विपक्षीय व्यापार अन् सहकार्याची क्षेत्रे

जुलै २०२३ मध्ये फ्रान्सच्या ‘बॅस्टिल डे’ परेडमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यादरम्यान चर्चिले गेलेले मुद्दे :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी २५ वर्षांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या प्रत्येक क्षेत्रात झालेल्या परिवर्तनाचा व संबंधांच्या विस्ताराचा आढावा घेतला आणि प्रादेशिक जबाबदाऱ्या आणि जागतिक महत्त्वाच्या भागीदारीत त्याची उत्क्रांती अधोरेखित केली.
  • फ्रान्समध्ये पदव्युत्तर पदवी घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी विस्तारित ‘पोस्ट स्टडी वर्क व्हिसा’ची घोषणा करण्यात आली आहे. नवीन व्हिसाचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे; ज्यामुळे विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये नोकरीच्या शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
  • राफेल लढाऊ विमाने आणि नौदलासाठी आणखी तीन स्कॉर्पिन – क्लास पाणबुड्या आणि फायटर जेट इंजिनाचा विकास करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
  • भारताने फ्रान्सकडून समुद्रात उपयोगी असणाऱ्या २६ राफेल सागरी विमानांच्या खरेदीला मान्यता दिली आहे.
  • भारत व फ्रान्सने अनुक्रमे मुंबई व कोलकाता येथे पाणबुडी तयार करण्यासाठी एक सामंजस्य करार केला.
  • फ्रान्सने यूपीआय पेमेंट यंत्रणा वापरण्यास सहमती दर्शविली आहे; जी आयफेल टॉवरपासून सुरू होईल. त्यामुळे फ्रान्समधील भारतीय पर्यटक आता फ्रान्समधील आयफेल टॉवर बघण्यासाठी यूपीआयच्या माध्यमातून रुपयांत पैसे देऊ शकतील.