सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारत-रशिया यांच्यातील संबंधांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारत आणि जपान यांच्यातील संबंधांबाबत जाणून घेऊया. भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीला दीर्घ इतिहास आहे. सुमारे १४०० वर्षांपूर्वी भारत आणि जपान यांच्यातील संपर्काला सुरुवात झाल्याचं इतिहासाच्या विविध टप्प्यांमध्ये आढळून आलं आहे. इ. स. पूर्व ७५२ मध्ये भारतीय भिक्षू ‘बोधीसेना’ यांनी जपानच्या ‘नारा’ येथील तोडाईजी मंदिरात भगवान बुद्धांच्या मूर्तीचा अभिषेक केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध हे वैचारिक, सांस्कृतिक किंवा प्रादेशिक अशा कोणत्याही प्रकारच्या वादापासून मुक्त राहिले आहेत.

proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Maharashtra Breaking News Updates
Maharashtra News : “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका”, उदय सामंतांचं वक्तव्य

आधुनिक काळात स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, जेआरडी टाटा, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि न्यायाधीश राधा बिनोद पाल यांनी जपानी राज्यकर्त्यांशी भेटून दोन्ही देशांतील संबंध सुरू ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जपानमध्ये १९०३ साली स्थापन झालेली ‘जपान इंडिया असोसिएशन’ ही दोन्ही देशांदरम्यानची सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय मैत्री संस्था आहे. आधुनिक भारतातील भारतीय नेतृत्वाने व जपानी राज्यकर्त्यांनी हा वारसा पुढे चालवला आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-रशिया संबंध; सहकार्याची क्षेत्रे

स्वातंत्र्यानंतर भारत-जपान संबंध :

२८ एप्रिल १९५२ रोजी जपान आणि भारताने ‘शांतता करारावर’ (Peace Treaty) स्वाक्षरी केली आणि राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. हा करार दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने केलेल्या पहिल्या शांतता करारांपैकी एक होता. आशियातील सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धी तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि न्याय्य विकासाला चालना देण्यासाठी दोन्ही देश प्रतिबद्ध आहेत. तसेच दोन्ही देश शांततेचे पुरस्कर्ते आहेत.

२१ व्या शतकाच्या सुरुवातीला जपान आणि भारताने त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी आणि भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ऑगस्ट २००० मध्ये मोरी यांच्या भारत दौऱ्यात “२१ व्या शतकात जागतिक भागीदारी” (Global Partnership in 21st Century) स्थापन करण्यासाठी सहमती दर्शवली होती. ही भागीदारी दोन्ही देशांच्या दीर्घकालीन राजकीय, आर्थिक आणि धोरणात्मक हितसंबंधांची दिशा ठरवणारी होती. अलीकडच्या काळात, भारताची मोठी आणि वाढणारी बाजारपेठ आणि त्यातील संसाधने बघता जपानचे भारतात स्वारस्य वाढत आहे.

आर्थिक संबंध (Economic Relation) :

अलीकडच्या वर्षांत, जपान आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंध सातत्याने विस्तारले आणि अधिक दृढ झाले आहेत. ऑगस्ट २०११ मध्ये दोन्ही देशांदरम्यान “Comprehensive Economic Partnership Agreement” (CEPA) या करारावर स्वाक्षरी झाल्यापासून व्यावसायिक संबंधांना गती मिळाली आहे. २०२१ मध्ये भारत हा जपानसाठी १८ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश होता आणि जपान भारतासाठी १३ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश होता. आर्थिक वर्ष २०२० – २१ वर्षात जपान भारतासाठी पाचवा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश होता. जपानच्या खासगी कंपन्यांचे भारतातील स्वारस्य वाढत आहे, त्याचाच परिणाम म्हणजे २०२१ पर्यंत सुमारे १४३९ जपानी कंपन्यांनी भारतात आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, जपान आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २१.९६ अब्ज डॉलर इतका होता. त्यात जपानची भारतातील निर्यात १६.४९ अब्ज डॉलर इतकी होती, तर भारतातील आयात ५.४६ अब्ज डॉलर एवढी होती. (भारतातील जपानची निर्यात भारताच्या एकूण आयातीपैकी २.३१% होती आणि जपानला भारताची निर्यात भारताच्या एकूण निर्यातीपैकी १.२१% होती.)

संरक्षण क्षेत्रातील सहकार्य (Defence Cooperation) :

जपान अशा काही देशांपैकी एक आहे, ज्यांच्याशी भारताने २+२ मंत्रीस्तरीय संवाद साधला आहे. (२+२ संवाद हा वर्षातून एकदा दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांच्यादरम्यान संबंधातील चर्चा करण्यासाठी बैठक असते) जपान आणि भारताच्या सशस्त्र दलांमधील सहकार्य सुधारण्यासाठी दोन्ही लष्करांदरम्यान JIMEX (नौदल सराव), मलबार सराव (नौदल सराव), वीर गार्डियन (हवाई दलांचा सराव) आणि धर्मा गार्डियन (लष्करी सराव) हे युद्ध अभ्यास दरवर्षी आयोजित केले जातात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-चीन संबंध; १९६२ चे युद्ध, सीमावाद व व्यापार

भारत-जपान संबंधातील काही सकारात्मक पैलू :

  • भारत आणि जपान हे दोन्ही देश QUAD, G20, G-4 आणि इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपेरिमेंटल रिएक्टर (ITER) चे सदस्य आहेत. यामुळे एकमेकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मुद्दे मांडताना मदत होते.
  • IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज), AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रात संयुक्त प्रकल्पांच्याद्वारे डिजिटल अर्थव्यवस्था वाढविण्याच्या उद्देशाने दोन्दी देशांदरम्यान “भारत-जपान डिजिटल भागीदारी” करारासाठी चर्चा सुरू आहे.
  • गेल्या दशकांपासून भारत हा जपानच्या ‘Official Development Assistance’ (ODA) कर्ज योजनेचा सर्वात मोठा प्राप्तकर्ता देश आहे. यामुळे भारतातील वीज, वाहतूक, पर्यावरणीय प्रकल्प आणि मूलभूत मानवी गरजांशी संबंधित प्रकल्प यांसारख्या क्षेत्रांमध्ये विकासाला चालना मिळाली आहे.
  • मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) सेवेला जपानने अर्थसाहाय दिले आहे. तसेच जपानने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी ९० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

Story img Loader