UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) अबू धाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
आगामी १४ फेब्रुवारी रोजी अबू धाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचेही लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे हे मंदिर नेमकं काय आहे? आणि या मंदिराची वैशिष्ट्ये कोणती? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएसस पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती तसेच पेपर २ आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीठी :
अबू धाबीत बीएपीएस हिंदू मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. आगामी १४ फेब्रुवारी रोजी या मंदिराचे लोकार्पण केले जाईल. बीएपीएस हिंदू मंदिर हे अबू धाबीतील पहिले हिंदू मंदिर असून अबू धाबीची राजधानी अबू मुरैखा या भागात उभारण्यात आले आहे. या मंदिराला एकूण सात शिखर आहेत. या सात शिखरांकडे सात अमिरातींचे प्रतिक म्हणून म्हणून पाहिले जात आहे. या प्रत्येक शिखरातून हिंदू देव-देवतांच्या कथा, शिकवणी दर्शवलेल्या आहेत.
या मंदिरात एका वेळी ८ ते १० हजार भाविक येऊ शकतात. गेल्या तीन वर्षांपासून या मंदिरनिर्मीतीचे काम सुरू आहे. या मंदिरावरील संगमरवरी खांबांवर कोरीव काम करण्यासाठी राजस्थान आणि गुजरातमधील २००० कागागिरांनी गेल्या तीन वर्षांपासून काम केलेले आहे. मंदिर उभारणीसाठी एकूण २० हजार टन दगड आणि संगमरवर अबू धाबीकडे पाठवण्यात आलेले आहेत. अबू धाबीतील या मंदिर परिसरात मंदिराव्यतिरिक्त अन्य इमारतीही आहेत. यामध्ये प्रार्थनेसाठी सभागृह, कम्यूनिटी सेंटर, ग्रंथालय, लहान मुलांना खेळण्यासाठी बाग, अॅम्फीथेटर अशा अनेक इमारती येथे उभारण्यात आल्या आहेत.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) रशियातील ‘पेनाल कॉलोनी’
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधक तथा टीकाकार ॲलेक्सी नवाल्नी सध्या तुरूंगात आहेत. ते गेल्या दोन आठवड्यांपासून गायब होते. त्यांना नेमके कोठे ठेवण्यात आलेले आहे, याची कोणालाही माहिती नव्हती. दरम्यान त्यांना आर्क्टिक समुद्राजवळच्या एका तुरुंगात ( ‘पेनाल कॉलोनी’ ) ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. तशी माहिती नवलेनी यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
खास कैद्यांना ठेवण्यासाठी रशियात पेनल कॉलोनीज (तुरुंग) उभारण्यात आल्या होत्या. स्टॅलिन यांच्या काळात सोव्हियत युनियनमध्ये कैद्यांना (सक्तीचे कामगार) ठेवण्यासाठी गुलॅग्स असायचे. या गुलॅग्समध्ये दहा लाखांहून अधिक कैद्यांचा मृत्यू झाला होता. काळानुसार या कैद्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीत बदल होत गेला. रशियामध्ये अशा प्रकारचे साधारण ७०० तुरुंग आहेत. आजही या तुरुंगांत ५ लाखांपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आलेले आहे. या कैद्यांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्याऐवजी त्यांना एका मोठ्या खोलीत ठेवले जाते. या ठिकाणी असलेल्या कैद्यांकडून सक्तीने काम करून घेतले जाते.
ॲलेक्सी नवाल्नी यांना ठेवण्यात आलेल्या पोलार वुल्फ पेनाल कॉलोनीतील (तुरुंग) आयके-३ या विभागात ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हा तुरुंग रशियातील सर्वांत भीषण तुरुंगांपैकी एक आहे. या तुरुंगाची निर्मिती १९६० मध्ये करण्यात आली. स्टालिन यांच्या आदेशानुसार रशियन आर्क्टिक प्रदेशात रेल्वे रुळ निर्माण करण्यात येत होता. या रुळासाठी काम करणाऱ्या कामगारांना येथे ठेवण्यात येत होते. मात्र शेवटपर्यंत या रेल्वे रुळाचे काम झाले नव्हते.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
पुतीन यांचे विरोधक ॲलेक्सी नवाल्नींना नेमकं कोठे ठेवलंय? ‘पेनाल कॉलोनी’ म्हणजे काय? वाचा…
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.