Geographical Indication Tag : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) ‘एल-१’ बिंदूजवळ पोहोचले ‘आदित्य’ यान

nadi tarangini latest news in marathi
‘नाडी तरंगिणी’द्वारे अचूक नाडी परीक्षा! पुण्यातील नवउद्यमीने विकसित केले डिजिटल उपकरण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख
yavatmal Adv Pranav Vivek Deshmukh graduated from London School of Economics
यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
What Uday Samant Said?
Uday Samant : उदय सामंत यांच्या हाती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची अधिसूचना; म्हणाले, “आज अत्यंत आनंदाचा दिवस..”
online exam for post of Clerk and Constable of Cooperative Bank canceled due to technical glitches
चंद्रपूर : परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका मिळताच जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अस्वस्थ; भरती प्रक्रिया…
mpsc comfort zone loksatta
MPSC मंत्र : ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर
ladki bahin yojana inspection of application forms
‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जांची पडताळणी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने २ सप्टेंबर २०२३ रोजी अंतराळात ‘आदित्य एल-१’ हे यान प्रक्षेपित केले होते. हे यान शनिवार, ६ जानेवारी रोजी त्याच्या नियोजित स्थळी म्हणजेच ‘लग्रांज-१’ ( L1 ) बिंदू’जवळ पोहोचले आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अणुऊर्जा, अलीकडील मोहिमांसह अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, डार्क मॅटर, हिग्स बोसॉन, जीएम क्रॉप्स, चालू घडामोडी आणि आयटी, अंतराळ, संगणक, रोबोटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील जागरूकता या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही इस्त्रोची ही मोहीम नेमकी काय आहे? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ‘आदित्य एल-१’ हे अवकाशयान २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केले होते. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवले आहे. यासाठी आदित्य एल-१ मध्ये वेगवेगळी उपकरणे (पेलोड) बसवण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे.

एल-१ बिंदू म्हणजे काय?

अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये (तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते. इटालियन संशोधक जोसेफ लुई लँगरेंज यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे. सूर्य आणि पृथ्वीदरम्यान आतापर्यंत असे पाच बिंदू खगोल अभ्यासकांना सापडले असून त्यांना एल-१, एल-२, एल-३, एल-४ आणि एल-५ अशी नावे देण्यात आली आहेत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

हेही वाचा – यूपीएससी सूत्र : भारताच्या जीडीपीचा पहिला अंदाज अन् इंडियन सायन्स काँग्रेस, वाचा सविस्तर…

२) ओडिशाच्या ७ वस्तूंनी मिळाले जीआय मानांकन

लाल मुंग्यांची चटणी ते एम्ब्रॉयडरी केलेली शाल अशा ओडिशाच्या सात खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी जीआय अर्थात जिऑग्राफिकल मानांकन पटकावलं आहे. जीआय मानांकनासह ओडिशाने आपली गुणवैशिष्ट्यं जपली आहेत.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ओडिशातल्या या गोष्टी काय आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीआय मानांकन म्हणजे नेमकं काय? ते कोणाद्वारे दिलं जातं? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

ओडिशाच्या सात वस्तूंनी जीआय मानांकन पटकावलं आहे. या सात वस्तूंमध्ये कापगंडा शाल, लांजिआ सौरा चित्र, कोरापूट काला जीरा राईस, सिमलीपल काइ चटणी, नारायणगड कांटेमुंडी वांगं, खजुरी गुडा, आणि धेनकनाल मगजी यांचा समावेश आहे.

कापगंडा शाल ही डोंग्रिआ कोंढ समाजातील महिला विणकाम आणि भरतकाम करुन तयार करतात. ओडिशातल्या रायगाडा आणि कालाहंडी जिल्ह्यात नियामगिरी डोंगररांगात डोंग्रिआ कोढ समाजाची माणसं राहतात. लुप्त होत जाणारा असा हा आदिवासी समाज आहे. ही शाल त्यांच्या समाजातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचं प्रतीक आहे.

लांजिआ सौरा चित्र आदिवासी समाजातील कलेचा हा प्राचीन वारसा समजलं जातो. ‘इडीतल’ असं त्याचं नाव आहे. सुंदर, सौंदर्यशास्त्र, परंपरेची मांडणी आणि प्रतिमाशास्त्र या साऱ्याची गुंफण या चित्रात दिसते. रायागाडा जिल्ह्यातल्या लांजिआ सौरा समाज या चित्रांची निर्मिती करतो. मातीच्या घरांच्या बाहेरच्या बाजूला ही चित्रं रेखाटण्यात आली आहेत.

कोरापूट काला जीरा राईस या काळ्या रंगाच्या तांदळाच्या या प्रजातीला तांदळाचा राजा असंही म्हटलं जातं. विलक्षण असा गंध, चव, पोत आणि पोषणमूल्य यासाठी हे तांदूळ ओळखले जातात. कोरापूट भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी १००० अधिक वर्ष तांदळाची ही प्रजात जोपासली आहे. हा तांदूळ जिऱ्यासारखा दिसत असल्याने त्याला काला जिरा म्हणूनही ओळखलं जातं.

ओडिशातल्या मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी लाल मुंग्यांपासून सिमलीपल काइ ही खास चटणी तयार करतात. आशियातील सगळ्यात मोठं जंगल असलेल्या मयुरभंजच्या जंगलात या मुंग्या आढळतात. ही चटणी औषधी आणि पोषणमूल्यांनी भरपूर अशी ओळखली जाते. ही चटणी प्रथिनं, कॅल्शियम, झिंक, जीवनसत्व ब १२, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचा उत्तम स्रोत आहे.

देठाकडच्या भागावरील काटे हे नारायणगड कांटेमुंडी वांग्याची ओळख आहे. हिरव्या रंगाच्या या वांग्याची प्रजातीत भरपूर बिया असतात. या वांग्याची चव अप्रतिम असते आणि अतिशय कमी वेळात ते शिजतं. कीडेकीटक या वांग्याच्या झाडापासून दूर राहतात. कमीत कमी कीटकनाशकं वापरुन या वांग्याची लागवड करता येते. नारायणगड जिल्ह्यात मुबलक प्रमाणात वांग्याचं उत्पादन होतं.

गजापती जिल्ह्यात खजुराच्या झाडापासून निघणारा नैसर्गिक गूळ आहे. दाट आणि घट्ट स्वरुपाचा हा गूळ तपकिरी रंगाचा असतो. त्याची चव वेगळी असते.

धेनकनाल मगजी हा गोड पदार्थ म्हशीच्या दुधापासून तयार केला जाणारा पदार्थ आहे. चव, रुप, आकार यामध्ये हा पदार्थ वेगळा असतो. त्यात प्रचंड पोषणमूल्यं असतात. चीजच्या अन्य पदार्थांच्या तुलनेत तो वेगळा असतो. ब्रिटिश काळात पशूसंवर्धन करुन लोक उदरनिर्वाह करत असत.

जीआय मानांकन म्हणजे काय?

एखादे उत्पादन विशिष्ट भागातच घेतले जात असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला जीआय मानांकन दिले जाते. कोणत्याही उत्पादनाला जीआय मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते. नफा तसेच गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी त्याचा फायदा उत्पादकांना होतो. जीआय मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडित आहे. कारण वेगवेगळ्या भौगौलिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित केले जाणारे एकच उत्पादन वेगवेगळ्या गुणवत्तेचे असू शकते. त्यामुळे गुणवत्तेची ओळख कायम ठेवण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे ठरते.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Story img Loader