UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) पुरुषांसाठीचे गर्भनिरोधक इंजेक्शन कितपत फायदेशीर?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) पुरुषांसाठी टोचता येणाऱ्या (इंजेक्टेबल) गर्भनिरोधकाच्या संशोधन चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) पूर्ण केल्या आहेत. त्यात हे गर्भनिरोधक सुरक्षित व अत्यंत परिणामकारक असल्याचे तसेच कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे दिसून आले आहे.

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
india struggles to meet soybean procurement goals
विश्लेषण : सोयाबीन खरेदीची उद्दिष्टपूर्ती का नाही?
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
Tokyo subsiding epidurals for pregnant women
वेदनारहित प्रसूतीसाठी ‘या’ देशात महिलांना पैसे का दिले जातायत? काय आहे एपिड्युरल?
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुरुषांसाठी असलेले गर्भनिरोधक इंजेक्शन नेमके काय आहे? ते कशाप्रकारे काम करते? त्याचे फायदे आणि तोटे याविषयी माहिती असणे गरजेचं आहे.

गर्भनिरोधक इंजेक्शन कसे काम करते? :

सद्यस्थिती पुरुषांसाठी गर्भनिरोधाचे दोन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. एक म्हणजे निरोधचा नियमित वापर ( कंडोम ) आणि दुसरं म्हणजे नसबंदी. मात्र, आता आणखी एक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ते म्हणजे गर्भनिरोधक इंजेक्शन. या इंजेक्शनमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन नैसर्गिक स्रावांचा (हॉर्मोन्स) वापर करण्यात आला आहे. हे इंजेक्शन पुरुषांना दर ४ ते ६ आठवड्यांनी द्यावे लागते.

या इंजेक्शनमुळे पुरुषांच्या शरीरातील शुक्राणू संख्या कमी होण्यास मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे हे इंजेक्शन घेतल्यावर कामोत्तेजनामध्ये कोणताही बदल होत नाही. शिवाय, शुक्राणूंची कमी झालेली संख्या एक वर्षापर्यंत टिकते. याबरोबरच गर्भनिरोधक इंजेक्शनचे नेमके फायदे आणि तोटे कोणते? तसेच यापद्धतीतील मर्यादा कोणत्या? यासंदर्भातील माहिती असणेही आवश्यक आहे.

यासंदर्भातील इतर लेख :

२) अमेरिकेतील ३३ राज्यांची ‘मेटा’ कंपनीविरोधात तक्रार

अमेरिकेतील एकूण ३३ राज्यांनी ‘मेटा’ या कंपनीविरोधात तक्रार केली आहे. इन्स्ट्राग्राम, फेसबूकच्या अतिवापरामुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे, असा दावा या राज्यांनी केला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचा का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ आणि ३ च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेतील ३३ राज्यांनी मेटा कंपनीविरोधात तक्रार केली आहे. यामध्ये कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क यासारख्या राज्यांचाही समावेश आहे. या तक्रारीत ‘मेटा कंपनीकडून इन्स्ट्राग्राम आणि फेसबूक वापरासंदर्भात लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह तरुण मुले, किशोरवयीन मुलांना समाजमाध्यमांची सवय लागावी, यासाठी मेटाकडून मुलांना प्रवृत्त केले जात आहे,’ असल्याचेही या तक्रारीत म्हटलं आहे. याशिवाय इन्स्ट्राग्राम, फेसबूकवर लाईक्स, अलर्ट, फिल्टर्स अशा वेगवेगळ्या सुविधा देऊन तरुण मुला-मुलींमध्ये ‘बॉडी डिसमॉर्फिया’च्या भावनेला प्रोत्साहित केले जात असल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.

बॉडी डिसमॉर्फिया म्हणजे काय?

बॉडी डिसमॉर्फिया अशी मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वत:च्या शरीराविषयी चिंता करते. माझ्या शरीरात काहीतरी अभाव आहे, असा भास संबंधित व्यक्तीला होत असतो. मात्र या व्यक्तीसंदर्भात अशा प्रकारच्या कोणत्याही लक्षणांकडे आजूबाजूंच्या लोकांचे लक्ष नसते. बॉडी डिसमॉर्फियामध्ये संबंधित व्यक्ती स्वत:च्या शरीराची काळजी करण्यात वेळ घालवते. तसेच बाह्यरुपात काहीतरी कमतरता आहे, असा भास या व्यक्तीला होत असतो.

दरम्यान, सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात भारतात नेमके कोणते कायदे आहेत? भारत सरकारची यासंदर्भातील नेमकी भूमिका काय? यासंदर्भात माहिती असणेही आवश्यक आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

३) चीनकडून ‘घोस्ट पार्टिकल’च्या शोधासाठी मोठी तयारी

‘घोस्ट पार्टिकल’ (भूताचा कण) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘न्यूट्रिनो’चे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत आहे. त्यासाठी चीन खोल समुद्रात एक महाकाय दुर्बीन बसवणार आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचा का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील तंत्रज्ञान, पर्यावरण जैवविविधता, या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

‘घोस्ट पार्टिकल’ (न्यूट्रिनो) म्हणजे काय?

सध्या आपल्याला जे काही दिसते, ते सर्वकाही अणूंपासूनच बनलेले आहे. अणू हा कुठल्याही पदार्थाचा, वस्तूचा अतिशय छोटा कण असतो. तुम्हाला दिसणारी प्रत्येक वस्तू ही अणूंपासून बनलेली असते. यापूर्वी संशोधकांना वाटायचे की अणू हा कोणत्याही वस्तू किंवा पदार्थाचा सर्वाधिक छोटा कण असतो. मात्र, सखोल संशोधनानंतर अणूपेक्षाही आणखी सूक्ष्म कण अस्तित्वात आहेत, हे शास्त्रज्ञांना लक्षात आलं आहे.

साधारणत: अणूमध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे दोन उपकरण असतात. प्रोटॉन्सवर धन भार ( Positive Charge) तर इलेक्ट्रॉन्सवर ऋण भार (Negative Charge) असतो. मात्र, आता संशोधनानंतर अणूमध्ये न्यूट्रॉन्स नावाचा आणखी एक उपकण असल्याचे संशोधकांच्या लक्षात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या न्यूटॉन्सवर कोणताही भार नसतो. म्हणजेच तो भाररहित (No Charg) असतो.

न्यूट्रिनोचा अभ्यास करणे ही एक आव्हानात्मक बाब आहे. कारण न्यूट्रिनोचे वस्तूमान नगण्य आहे. जेव्हा न्यूट्रिनो अन्य कणांच्या संपर्कात येतात, तेव्हाच ते विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने दिसू शकतात आणि त्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. मात्र न्यूट्रिनो जेव्हा अन्य कणांच्या संपर्कात येतो, तेव्हा तो क्षण पाहणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे त्याला घोस्ट पार्टिकल असे म्हटले जाते.

शास्त्रज्ञांकडून घोस्ट पार्टिकलचा शोध कसा घेतला जातो आणि ‘घोस्ट पार्टिकल’चा शोध घेतल्यानंतर नेमका काय फायदा होईल? यासंदर्भातील माहिती जाणून घेणेही गरजेचं आहे.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Story img Loader