UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) करोनाचा जेएन-१ उपप्रकार

मागील काही दिवसांपासून करोना विषाणूचा उप प्रकार असलेला जेएन-१चा प्रसार वाढताना दिसतोय. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना एन्फ्लुएंझासारखे आजार झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिल आहेत. अशा रुग्णांची योग्य ती चाचणी करून या चाचण्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे करोनाचे जेएन-१ (JN-1) हे रुप नेमके काय आहे? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्यय पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधने, गरिबी आणि भूक यांच्याशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या, या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

जेएन-१ हा उपप्रकार नवा नसून करोना विषाणूच्या बीए.२.८६ (BA.2.86 ) या उपप्रकाराचाच एक भाग आहे. या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत जेएन-१ या उपप्रकाराचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला होता. जगात हा उपप्रकार २०२३ सालाच्या जानेवारी महिन्यातच आढळला होता. महत्त्वाचे म्हणजे जेएन-१ हा उपप्रकार वेगाने पसरू शकतो किंवा तो आधीच्या उपप्रकारांपेक्षा धोकादायक असल्याचा कोणताही पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

हेही वाचा – यूपीएससी सूत्र : स्वदेश दर्शन योजना आणि पोस्ट ऑफीस विधेयक २०२३, वाचा सविस्तर…

२) महिलांच्या आरोग्यासंदर्भतील लॅन्सेट ग्लोबल हेल्थ रिपोर्ट

प्रसूतीनंतर महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू असल्याचं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे. जगभरात दरवर्षी सुमारे चार कोटी महिलांना प्रसूतीनंतर दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा त्रास होत असल्याचं या संशोधनात म्हटलंय. लॅन्सेट ग्लोबल हेल्थमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून जागतिक आरोग्य संघटनेनेही या संशोधनाबद्दल माहिती जाहीर केली आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्यय पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधने, गरिबी आणि भूक यांच्याशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या, या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

लॅन्सेट ग्लोबल हेल्थ रिपोर्टनुसार, प्रसूतीनंतर महिलांमध्ये काही महिने अथवा काही वर्षे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यात प्रामुख्याने शारीरिक संबंधांवेळी वेदना होण्याचा त्रास ३५ टक्के महिलांना जाणवतो. त्याखालोखाल ३२ टक्के जणींना पाठदुखीची समस्या सुरू होते. मलविसर्जनावर नियंत्रण न राहण्याची समस्या १९ टक्के महिलांमध्ये जाणवते. मूत्रविसर्जनावर नियंत्रण न राहण्याची समस्या ८ ते ३१ टक्के महिलांमध्ये आढळते. याचबरोबर इतर समस्यांमध्ये तणाव ९ ते २४ टक्के, नैराश्य ११ ते १७ टक्के, विटप वेदना ११ टक्के, मूल जन्माला घालण्याची भीती ६ ते १५ टक्के, वंध्यत्व ११ टक्के असे प्रमाण आहे.

दरवर्षी जगभरात १४ कोटी महिलांची प्रसूती होते. मागील तीस वर्षात मातामृत्यूंचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेला सहा ते आठ आठवड्यापर्यंत वैद्यकीय सेवा मिळते. त्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी वैद्यकीय मदत मिळत नाही. सिझेरियन शस्त्रक्रियेसह इतर वैद्यकीय प्रक्रियेने होणाऱ्या प्रसूतीनंतर हा त्रास प्रामुख्याने होताना दिसतो, असंही या संशोधनात म्हटले आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.