UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) आयएमएच्या लोगोत धन्वंतरीचा समावेश

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) नुकतेच आपल्या बोधचिन्हात बदल केला आहे. आयोगाने नव्याने जारी केलेल्या बोधचिन्हात धन्वंतरी या आरोग्याच्या देवाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या नव्या बोधचिन्हाला डॉक्टर तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) विरोध केला जातोय.

When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
Home Schooling Education System
होम स्कुलिंग शिक्षण व्यवस्थेचे भविष्य ठरू शकेल का?
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
air Shivajinagar , Shivajinagar air bad , mumbai ,
मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी शिवाजीनगरची हवा ‘वाईट’, परिसरावार मॉनिटरिंग व्हॅनची नजर
nexus
धोक्याच्या टप्प्यावरचा इतिहास…
Sharad Pawar Ajit Pawar
BJP : शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची ना…”

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील आर्थिक आणि सामाजिक विकास-शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधने यांच्याशी संबंधित समस्या या घटकाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आयएमएच्या नवा लोगोत नेमकं काय आहे? त्याला डॉक्टरांचा विरोध का होतो? या यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नव्याने जारी केलेल्या बोधचिन्हात धन्वंतरी या आरोग्याच्या देवाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच नव्या लोगोत ‘इंडिया’ हा शब्द वगळून त्याऐवजी ‘भारत’ या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. मात्र, या नव्या बोधचिन्हाला डॉक्टर तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) विरोध करण्यात येत असून इंडियन मेडिकल असोसिएशनने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला पत्र लिहिले आहे. “कोणत्याही राष्ट्रीय संस्थेच्या बोधचिन्हातून देशातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा समान प्रमाणात दिसून आल्या पाहिजेत. तसेच या बोधचिन्हात तटस्थ राहणे गरजेचे आहे. समाजातील कोणत्याही वर्गाला या बोधचिन्हातून वाईट वाटायला नको, त्यांच्या भावना दुखायला नकोत याची काळजी घेतली पाहिजे,” असे आयएमएने आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच एनएमसीच्या बोधचिन्हात करण्यात आलेले बदल गेल्या महिन्यात चर्चेत आले. त्यानंतर हे केलेले बदल डॉक्टरांच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात आहेत, अशी भूमिका आयएमने घेतली आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

हेही वाचा – यूपीएससी सूत्र : सायबर गुन्ह्यात २५ टक्क्यांनी, तर महिलांवरील अत्याचारात ४ टक्क्यांनी वाढ; NCRB चा अहवाल जाहीर, वाचा सविस्तर…

२) गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च!

गुगलने आपले नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल जेमिनी लाँच केले आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक व्हिडीओ आणि एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे गुगल जेमिनी नेमकं काय आहे? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

जेमिनी हे एक एआय टूल्स असून ते एखादी वस्तू किंवा गोष्ट माणसांप्रमाणे समजवून सांगण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. जेमिनी हे एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे जे समजून घेणे, तर्क करणे, कोडिंग आणि नियोजन यांसारख्या कार्यांमध्ये इतर मॉडेल्सपेक्षा जास्त चांगले काम करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल जेमिनी हे प्रो, अल्ट्रा आणि नॅनो या तीन आवृत्त्यांमध्ये सादर केले गेले आहे. प्रो व्हर्जन आधीच उपलब्ध आहे आणि अल्ट्रा व्हर्जन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होईल असे सांगण्यात येत आहे. गुगलने नवीन जेमिनी प्रोला त्याच्या चॅटबॉट बार्डसह एकत्रित केले आहे. जेमिनी प्रो (Gemini Pro) ची आवृत्ती चॅटबॉट ‘Bard’ मध्ये वापरली जाऊ शकते ; जी भारतासह १७० देश आणि प्रदेशांमध्ये इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल. गुगलचा दावा आहे की, जेमिनी ओपन एआयच्या (Open AI) चॅट जीपीटी ४ (ChatGPT 4) पेक्षाही चांगले आहे आणि अधिक चांगले कामसुद्धा करू शकते. नवीन एआय मॉडेल मजकूर, ऑडिओ, प्रतिमा आणि व्हिडीओ व इतर अनेक प्रकारची माहिती सहजपणे समजू देण्यास मदत करेल.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

हेही वाचा – यूपीएससी सूत्र : निटाझीन ड्रग्जचा वापर अन् शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाला पसंती, वाचा सविस्तर…

३) मुंबईतील निःक्षारीकरण प्रकल्प

पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने मनोरी येथे निःक्षारीकरण प्रकल्प उभा करण्याची घोषणा केली आहे. समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा हा प्रकल्प महागडा असून यासाठी साडेतीन हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी पालिकेने आता निविदा मागवल्या आहेत.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील सरकारची कार्यकारी आणि न्यायपालिका मंत्रालये आणि विभागांची रचना, संघटना आणि कार्यप्रणाली या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प नेमका काय आहे? याची गरज का पडली? तसेच हा प्रकल्प नेमका कुठं होणार आहे? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

हा प्रकल्प मुंबईतील मनोरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत उपलब्ध असलेल्या १२ हेक्टर जागेवर उभा केला जाणार आहे. मनोरी येथील प्रस्तावित प्रकल्पस्थळ समुद्रसपाटीपासून ३४ मी. उंचीवर आहे. दररोज २०० दशलक्षलीटर म्हणजेच २० कोटी लीटर पाणी मिळवण्याची क्षमता असलेल्या या मूळ प्रकल्पाची क्षमता नोव्हेंबर २०२१ मध्ये वाढवण्यात आली. दररोज ४०० दशलक्षलीटरपर्यंत पाणी मिळेल अशी या प्रकल्पाची क्षमता आहे. तब्बल साडेतीन हजार कोटींचा हा प्रकल्प असून त्यात १६०० कोटी भांडवली खर्च व १९२० कोटी हा प्रचालन व परिरक्षण खर्च आहे. चालू आर्थिक वर्षात प्रकल्पासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्यातरी आपण फक्त पावसावर आणि धरणाच्या साठवण क्षमतेवर अवलंबून आहोत. मात्र हवामान बदलामुळे एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तर पाण्याचा अन्य स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. परदेशातील अनेक मोठ्या शहरात जशी व्यवस्था असते तशी पर्यायी व्यवस्था मुंबईत असावी यासाठी हा प्रकल्प पालिकेने आणला आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख:

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Story img Loader